चिरंजीवी, समंथा सारखे सुपरस्टार्सही या आजींसोबत काम करायला उत्सुक असतात

स्वस्तात इंटरनेटनं आपला फायदा केला कीं तोटा हेच आपल्याला काळात नाही. रोज रात्री रील्स स्क्रोल करत झोपेचं खोबरं होतं तरी त्याची लत सुटत नाही. पण याचा फायदा पण अनेक जणांना झालाय. कानाकोपऱ्यात लपलेलं टॅलेंट आज स्वस्तात मिळालेल्या इंटरनेटमुळं जगापुढं आलंय. युट्युबवर असं टॅलेंट तुम्हाला खूप दिसेल.

त्यातलाच एक शो आहे माय व्हीलेज शो.

तेलंगणातल्या लंबाडीपल्ली नावाच्या छोट्याश्या गावातुन हे चॅनेल चालतं. अस्सल गावरान तेलगू भाषेतून कॉमेडी स्केच बनवणारं हे चॅनेल मिलिअन्समध्ये व्ह्यूज घेतं. अन्य या चॅनेलच्या स्टार आहेत गंगव्वा अम्मा.मिलकुरी गंगाव्वा नावाची या खेडेगावातील आज्जी आंतरराष्ट्रीय इंटरनेट सेन्सेशन बनल्या आहेत. उदरनिर्वाहासाठी आधी शेतमजुरी, विड्या वळणे अशी कामे करणाऱ्या या आज्जी आता यूट्यूब स्टार बनल्या आहेत.

याची सुरवात झाली जेव्हा त्यांच्या जावयाने, चित्रपट निर्मात्याने २०१२ मध्ये एक YouTube चॅनेल सुरू केले . त्यांनी या YouTube चॅनेलला माय व्हिलेज शो असे नाव दिले आणि लवकरच दक्षिण भारतीय गावांमधील लोकांच्या जीवनावर आधारित विविध रेखाचित्रे अपलोड करण्यास सुरुवात केली.

 लवकरच, गंगव्वा एक अभिनेत्री म्हणून या चॅनेलच्या टीममध्ये सामील झाल्या आणि त्यांचे व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होऊ लागले.

CNN ला दिलेल्या मुलाखतीत, गंगाव्वा यांनी खुलासा केला की त्यांचा जावई श्रीराम गावात झाडे आणि झाडे चित्रित करत असताना त्या बघत असत आणि त्यांना वाटत असे की असे व्हिडिओ करून तो वेळ वाया घालवत आहे. पण एके दिवशी त्याच या व्हिडिओंचा भाग होतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. गंगव्वा यांनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकांपासून सुरुवात केली आणि २०१७ पर्यंत त्या मेन हेरॉईन झाल्या.

 

आज २ मिलिअनपेक्षा जास्त फॉलवोर्स असलेल्या गंगव्वा यांच्याबरोबर कोलॅब करण्यासाठी  वाटच पाहत असतात. महेशबाबू,समंथा, चिरंजीवी, विजय देवरकोंडा हे सगळे सुपरस्टार्स गंगव्वा अम्मांसोबत दिसत असतात. तेलगू जनतेत तुफान लोकप्रिय असलेल्या गंगव्वा तेलगू बिग बॉसमध्ये ही झळकल्या होत्या. तेलंगणाच्या बोलीभाषेतील गंगव्वा यांच्या अनोख्या बोलीभाषेमुळे ती तेलगू लोकांमध्ये लोकप्रिय झाली. २०१९ मध्‍ये, गंगाव्‍ह यांनी मल्‍लेशमसोबत तेलगू सिनेमात पदार्पण केले आणि नंतर त्याच वर्षी त्या iSmart शंकरमध्‍ये दिसल्या होत्या. त्यांनतर सुपरस्टार चिरंजीवीनेही त्यांच्या बरोबर चित्रपटाची घोषणा केली आहे.

त्यामुळं फ्री चं इंटरनेटचा कसा वापर करावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गंगव्वा अम्मा. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.