शेतमजूर आईची मूले : एकजण करोडपती तर दुसरा कॅबीनेट मंत्री !

भिडूनों तासगाव तालुक्यातील पेडगावातल्या अशोकची ही गोष्ट आहे. चर्मकार समाजात जन्माला आलेला अशोकने लहानपणापासून  घरात हलाखीची गरीबी पाहिली . वडील गावकी करायचे म्हणजे गावातल्या लोकांच्या चपला शिवायचे.  त्या बदल्यात वर्षातून एखद पायलीभर धान्य मिळत असे. आई व बहिण रोजंदारीवर कामाला जात असे. शाळेला जातांना सकाळीच अशोकला सांगण्यात येई,

” अशोक आज महारकीत ये ,आज मांग मळ्यात ये ,आज पाटलाच्या मळ्यात ये.”

सांगितल्या प्रमाणे अशोक शाळा सूटताच त्या मळ्यात पोहचे आणि आईने काढलेलं गवत ,कधी शेंगा तर कधी जळणं डोक्यावरून  घरी घेऊन येई. आईला व बहिणीला दिवसभराचा सव्वा रुपया मिळायचा. हे सर्व काबाड कष्ट अशोकने लहानपणीच पहिले होते .

शेती संपूर्ण कोरडवाहू होती अगदी थोडसं धन्य त्यातून निघत असे. दुष्काळ जणू पाचवीलाच पुजलेला. १९७२ चा दुष्काळ भयानक होता. खाडे कुटुंबाला ही त्याची झळ  बसली. अनेकदा घरात खायला नसायचं. आपली पोरं मनापासून अभ्यास करतात पण त्यांच्या पोटाला  नीट  मिळत नाही म्हाणून अशोकचे वडील चिंता ग्रस्त होत.

एकदा असच भावनिक होऊन ते आपल्या मुलांना म्हणाले,

“मुलांनो ही परिस्थिती हा दुष्काळ मी घेऊन आलो नाही. हा ईश्वरानेच निर्माण केला आहे. काहीही होवो आपल्या घरातली सर्व जर्मन आणि पितळेची भांडी जरी आपल्याला विकायला लागली तरी चालतील. माळावरच्या पळसाच्या पानांचा द्रोण आणि पत्रावळी बनवून मी तुम्हाला वाढेन पण तुम्हाला उपाशी ठेवणार नाही .”

बापाचे ते शब्द अशोकच्या डोक्यात कायमचे बसले. अशोकने मनापसून दहावीची परीक्षा दिली. अभ्यास इतका चांगला झाला होता कि पेपरातील सर्व प्रश्न पर्यायासहित अशोक सोडवत वर लिहित “कोणतेही तपासा.”

बापाच्या त्या वाक्यांनी अशोकला एक वेगळाच आत्मविश्वास दिला होता .

१९७२ सालीच अशोकचे मोठे भाऊ मुंबईत आले, त्यांनी माजगाव डॉकला नौकरी सुरु केली. अशोकला पुढचं शिक्षण सांगलीत घेणं शक्य नव्हतं. कारण पैसेच नव्हते. त्यामुळे ते ही भावा जवळ मुंबईला येऊन राहू लागले .

ashok khade with employees

१९७५ ला अशोक खाडे design drawing ऑफिसला माजगाव डॉक मधेच जॉईन झाले. त्यांचे लहान भाऊ सुरेश जे आज भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत. ते ही माजगाव डॉकला कामाला लागले. अशोक चे मोठे भाऊ दत्ता हे माजगाव डॉकला पाण्याखालचे वेल्डिंग करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना काम करताना बघण्यास लांब लांबून  लोक यायचे इतकं चांगलं काम ते करीत. लहान भाऊ सुरेश ही या कामात तरबेज होते ते अवघड असं मानलं जाणारं Magnetic वेल्डिंग अगदी सहज मारत. अशोक खाडे याचं श्रेय आपल्या ग्रामीण पार्श्वभूमीला देतात,

” आम्ही गावाकडचे असल्याने आमची शारीरिक क्षमता जास्त होती त्यामुळे आम्ही पाण्याखी जास्ती वेळ श्वास रोखू शकत होतो .”

अशोक खाडे यांचे सिलेक्शन जर्मनीला झाले व ते एक वर्ष जर्मनीत काम करून आले .एकदा सहज त्यांच्या हातात त्यांच्या बॉसची पगाराची स्लीप पडली त्यांचा एक महिन्याचा पगार पाहून ते अचंबित झाले, आपला एका वर्षाचा पगार आणि बॉसचा एका महिन्याचा पगार सारखाच होता .

पहिली ठिणगी इथं पडली आपल्याकडे एवढं ज्ञान आहे ह्या क्षेत्रातलं. आपण जर्मनीत सर्व शिकून आलो आहोत आपण आपली स्वताचीच कंपनी का काढू नये ? हा विचार सुरु झाला . त्यांनी लगेचच माजगाव डॉक मधील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला .

कंपनी काढायची ठरलं नाव दिलं DAS OFFSHORE दत्ता, अशोक, सुरेश तिन्ही भावांची नावं मिळून ते नाव बनलं होतं.

पहिलं कामही मिळालं दीड कोटीचं पण कंपनी कडे काहीच भांडवल नव्हतं. काम पूर्ण करण्यासाठी लागणारी सामग्री इस्माईल भाई नावाच्या एका सप्लायर कडे मिळत. अशोक खाडे इस्माईल भाई जवळ जाऊन पोहचले. हातात प्लास्टिक ची बॅग पायात तुटकी चप्पल घातलेलं पोरगा दीड कोटीचा काम मिळालय म्हाणून सांगतंय इस्माईल भाईला काही कळेना. त्याने विचारले,

” तुम्हारा नाम क्या है ?”

ह्यांनी सांगितले अशोक खाडे इस्माईल भाईंनी लगेच विचारले,

“वो माजगाव  डॉक मैं जो दत्ता खाडे है वो तुम्हारा कोण है ?”

अशोक खाडेनीं सांगितलं तो माझा मोठा भाऊ आहे ओळख पटली दत्ता खाडेंनी  इस्माईल भाईचं आधी एक काम केला होतं. खाडेनां सर्व साहित्य मिळाले आणि विक्रमी नव्वद दिवसात त्यंनी काम पूर्ण केले. मग मात्र अशोक खाडेंनी मागे वळून पहिले नाही. प्रामाणिक पणे काम करत गेले लोकांचे पैसे वेळेत पोहोच करीत लोकांचा विश्वास संपादित करत गेले.

बघता बघता DAS OFFSHORE मोठी झाली. आज ‘लार्सेन आणि टुब्रो’ पेक्षा हि मोठी कामं DAS OFFSHORE कडे आहेत .

नियतीने कूस बद्दली होती.आज गावाकडे कोणतीही जमीन विकायला निघाली कि अशोक खाडे आईला विचारतात,” आई तू त्या शेतात काम केलं होतंस काय?” आई सांगते हो , मग अशोक खाडे कोणताच मोल भाव न करता ती जमीन विकत घेतात.

dalit jumbo v2

अशी जवळपास त्यांच्याकडे शंभर एकर जमीन आहे. त्यातल्या जवळपास सर्वच जमिनीत त्यांच्या आईने सव्वा रुपयांसाठी रोजगार केला होता. अशोक खाडे आपल्या मोठे पणाचे श्रेय आपल्या आईला देतात. तिने सोसलेल्या अनेक यातनांची त्यांना जाण आहे . ते सांगतात,

” आईला आजही हजार रुपये मोजायला येत नाहीत इतकी ती साधी आहे .पण शेतात निघालेलं उत्पन्न बघून तिला निस्सीम आनंद मिळतो अणि तिचा आनंदा साठी मी जगतो. “

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. ज्ञानेश्वर आर्दड says

    खाडेंच्या कर्तृत्वाला सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.