सुरेश पुजारीला मुंबईवर राज्य करणारा अंडरवर्ल्डचा शेवटचा डॉन म्हणून ओळखलं जायचं

मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अनेक डॉन आले, काही स्वतःहून डॉन बनले,काही इथंच मेले,काही पळून गेले. मुंबईवर सत्ता गाजवण्याच्या नादात त्यांनी भयंकर रक्तपात घडवून आणला मुंबई खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्याचा पुरुन मुंबई तशीच ठाम उभी आहे.

तर विषय आहे मुंबई अंडरवर्ल्ड मधला शेवटचा डॉन समजल्या जाणाऱ्या सुरेश पूजारीला फिलिपीन्स मध्ये पोलिसांनी अटक केली आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी एका बिल्डिंग खाली सुरेश पुजारी उभा होता पोलिसांनी धाड टाकत त्याला आपल्या ताब्यात घेतलं.

निम्म्या मुंबईत आणि बार मालकांवर आपली तुफ्फान दहशत बसवणारा सुरेश पुजारी नक्की कोण होता ?

सुरेश पुजारी हा अगोदर डॉन रवी पुजारीच्या टोळीत होता.बऱ्याच वर्षांअगोदर तो रवी पुजारीच्या टोळीतून वेगळा झाला आणि त्याने स्वतःची गँग बनवली. नवी मुंबई,मुंबई आणि ठाण्यामध्ये डान्स बार मालकांवर त्याने जब्रि दहशत बसवली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तो खंडणी उकळत असे. त्याच्या नुसत्या फोनवर खंडण्या वसूल केल्या जायच्या आणि जो डान्स बार मालक खंडणी देण्याला नकार द्यायचा त्याला तो गोळ्या घालायचा.

2018 ला सुरेश पुजारीच्या शूटर लोकांनी कल्याण भिवंडी हायवेवरच्या के.एन. पार्क हॉटेलला निशाणा बनवत गोळ्या झाडल्या होत्या. यातली एक गोळी रिसेप्शन वर बसलेल्या एका व्यक्तीला लागली होती. या घटनेनंतर सुरेश पुजारीने त्याच हॉटेल मालकाला फोन करत 25 लाखांचा हफ्ता मागितला होता. या केसमध्ये मुंबई क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर अजय सावंत आणि सचिन कदम यांनी पुजारी गँगमधील बऱ्याच लोकांना जेरबंद केलं होतं. सुरेश पुजारीच्या गँगमधील बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या केसमध्ये अटक करण्यात आली होती.त्याच्या लोकांना पोलीस ट्रॅक करत होते.

सुरेश पुजारी हा मूळचा उल्हासनगरचा होता. 2007 मध्ये तो भारतातून पळून गेला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये तो नाव बदलून सुरेश पुजारी सोडून सुरेश पुरी,सतीश पै नावाने तो फिरत असे. सूत्रांच्या मदतीने पोलिसांना कळलं की सुरेश पुजारी हा सध्या फिलिपिन्स मध्ये लपून आहे. गुप्त एजन्सीला खबर लागली आणि त्याला पकडण्यात आलं.

सुरेश पूजारीला पकडल्याने मुंबई अंडरवर्ल्ड जवळपास संपुष्टात आलं आहे. छोटा राजन, रवी पुजारी आणि एजाज लकडावाला सारखे डॉन भारतात डीपोर्ट केल्याने जवळपास मुंबई अंडरवर्ल्ड संपल्यात जमा आहे असं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.