फिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू शकला…!!!

जेव्हा युद्धांना सुरवात होते तेव्हा वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे गट पडतात. त्यानंतर एक गट दूसऱ्या गटाची नाकेबंदी करतो. आत्ता काहीसा असाच प्रकार रशिया-युक्रेन युद्धावरून रशियाच्या बाबतीत होत असल्याचं दिसत आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादलेले आहेत.

अशा वेळी इतिहासातला किस्सा सांगू वाटतो, अमेरिकेने अशाच प्रकारचे निर्बंध क्यूबा वर लादले होते व क्यूबाची मदत करण्यासाठी भारत पुढे आला होता. 

साल होतं १९९१ चं.

बाल्कनायझेश होवून USSR चं विघटन झालं होतं. जगभरातील कम्युनिस्ट देशांना हा मोठा हादरा होता. इथून पुढचं जग भांडवलशाही देशाचं असणार हे स्पष्ट होतं होतं.

USSR च विघटन झालं आणि जगभरातील कम्युनिस्ट देशांवर संकट कोसळलं. या देशांमध्ये सर्वात वरचा क्रमांक होता क्यूबाचा. 

भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ मात्र मनातून USSR सोबत जोडलेलं राष्ट्र म्हणजे क्यूबा. फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्यूबा अमेरिकेला टशन देत होता. काहीही करुन क्यूबाला नमवण्याच स्वप्न अमेरिकेचा पाहत राहिला पण ते शक्य झालं नाही. USSR चा पाडाव झाला आणि क्यूबाला USSR कडून मिळणारी मदत बंद झाली. 

क्यूबासोबत आतंराष्ट्रीय व्यापार करण्यावर अमेरिकेकडून बंधने आणण्यात आली होती. क्यूबा आतंतराष्ट्रीय वस्तू बाजारातून घेवू शकत नव्हता की न व्यापार करू शकत होता.

त्या काळात क्यूबामध्ये ना खाण्यासाठी ब्रेड मिळत होता न अंघोळीसाठी साबण. 

अशा या संकटाच्या काळात क्यूबासाठी धावून गेले ते कॉम्रेड हरकिशन सिंह सुरजीत.

हरकिशन सिंह सुरजीत यांनी क्यूबाला गहू आणि साबण पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घोषणा केली की, आपण क्यूबाला दहा हजार टन गहू पाठवू. बघता बघता पंजाबच्या शेतकऱ्यांनी या कार्यासाठी पुढाकार घेतला आणि पंजाबमधून दहा हजार टन गहू आणि दहा हजार साबणांनी भरलेली रेल्वे कलकत्ताच्या बंदरामध्ये पोहचली. 

इतक्यावरतीच न थांबता हरकिशन सिंह सुरजीत यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना विनंती केली की आम्ही दहा हजार टन गहू पाठवत आहोत तर सरकारने पण तितकाच गहू क्युबाला मदत म्हणून पाठवावा.

नरसिंह राव यांनी त्यांच्या विनंतीचा सन्मान राखत सरकारमार्फत दहा हजार टन गहू कोलकत्ता बंदरात पोहचवला. 

हि सर्व मदत कॅरेबियन प्रिसेंज या जहाजावर लादण्यात आली व हे जहाज क्यूबाच्या दिशेने रवाना करण्यात आले. 

हे जहाज क्युबामध्ये पोहचणार होतं तेव्हा या जहाजाच्या स्वागतासाठी फिडेल केस्ट्रोंनी खास हरकिशन सिंह सुरजीत यांना आमंत्रित केलं. हरकिशन सिंह सुरजीत क्युबाला गेले.

तिथे क्युबन नागरिकांमार्फत सोहळा आयोजित करण्यात आला तेव्हा फिडेल केस्ट्रो म्हणाले होते, 

सुरजीत सोप आणि सुरजीत ब्रेडमुळे क्यूबा जिवंत राहिलं.

 

कॉम्रेड हरकिशन सिंह सुरजीत. 1992 ते 2005 च्या दरम्यान ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी होती. CPM ची लाईन बदलणारे नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

किसान सभेचे ते सहसंस्थापक होते. सुंदरैया लाईन सोडून क्रांन्तीचा मार्ग सोडून लोकशाही मार्गाने सत्ता मिळवण्याचा मार्ग मिळवणारी लाईन त्यांनी १९७८ च्या सल्किया अधिवेशनात स्वीकारली होती. राजकारणात पीसमेकर आणि पीसब्रेकर अशा दोन्ही भूमिका त्यांनी निभावल्या.

हे ही वाच भिडू. 
  
Leave A Reply

Your email address will not be published.