सरोगसी म्हंटलं कि, गुजरातची ती ‘बेबी फॅक्टरी’ अजूनही चर्चेत असते

२००१ साली भाईजान सलमान खानचा एक पिक्चर आलेला ‘चोरी चोरी चुपके चुपके’. भाईजान या पिक्चरमध्ये प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी या दोन हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहायला मिळाला. आता भाईजानचा पिक्चर म्हंटल्यावर चांगलाच गाजलाच. पण त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या पिक्चरची स्टोरी त्यावेळच्या सगळ्याच पिक्चर्सना तोड देणारी होती. पिक्चरने भारतात सहसा न बोलल्या जाणाऱ्या एका मुद्द्याला हात घातला होता. तो विषय म्हणजे सरोगसी….

म्हणजे भिडू असं म्हणतात कि तो पिक्चर पाहिल्यापासूनच बऱ्याच जणांना सरोगसी हा विषय समजला. आणि त्यांनतर तो चर्चेत सुद्धा आला. आता असं नाही कि त्या आधी सरोगसीचे प्रकार समोर येत नव्हते. पण तेव्हा कुठलाही कायदा देशात नव्हता. त्यामुळे अनेक गैरप्रकार सुद्धा समोर यायचे.

म्हणजे २०१८ च्या एका अहवालानुसार, देशभरात ७ ते ८ हॉस्पिटल या सरोगसीशी संबंधित होती, त्यातली जास्त तर अवैध होती. वर्षाला जवळपास २००० मुलं ही सरोगसीद्वारे  जन्माला यायची. आणि यात करोडो रुपयांची उधळपट्टी व्हायची. म्हणूनच सरकारने अशा चुकीच्या घटनांना आला घालण्यासाठी २०१९ साली सरोगसी कायदा आणला. 

आता सरोगसी हा विषय सगळ्यांनाच माहितेय, तरी थोडक्यात सांगायचं झालं तर सरोगसी म्हणजे भाड्याचा गर्भ, जे जोडपं पालक बनू शकत नाहीत, ते सरोगसीच्या मदतीने म्हणजे पालक बनू शकतात. यात सरोगेट आई आपला गर्भ त्या पालकांना भाड्याने द्यायला तयार असते. त्या दोघांमध्ये एक करार होतो. त्यानंतर ९ महिने ती त्या बाळाला आपल्या गर्भात वाढवते या दरम्यान जोडप्याला त्या महिलेची पूर्ण जबाबदारी घेणं भाग असत.

असो… पण आता काल पासून हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. कारण बॉलिवूडची फेमस अभिनेत्री प्रियांका झिंटा आणि निक जोनास आई – बाप बनलेत आणि हे जोडपं सरोगसीच्या मदतीनेच पालक झालेत.  प्रियांकाच नाही तर बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटी या सरोगसीच्या मदतीने आई- बाप बनलेत.  

आता सरोगसीचा विषय निघाला कि, गुजरात मधलं आनंद हा भागसुद्धा चर्चेत असतो , ज्याला एकेकाळी गुजरातची बेबी फॅक्टरी म्हंटल जायचं. ही फॅक्टरी म्हणजे सरोगेटेड मदर्सच हॉस्टेल असायचं. जिथे दरवर्षी हजारो गरजू महिला पैसे मिळतायेत म्हणून सरोगेट मदर्स होण्यासाठी तयार व्हायच्या आणि आपला गर्भ भाड्याने द्यायच्या. 

इथे एकाच वेळी जवळपास १०० सरोगेट मदर्स राहायच्या, म्हणजे एका खोलीत १० मदर्स. तिथल्या नर्स त्यांना ठरलेल्या वेळेत जेवण, व्हिटॅमिन आणि औषधे पुरवायच्या. पण मूल जन्माला येईपर्यंत त्यांना घरी जाण्याची परवानगी नसायची.

जर सरोगेट आईने जुळ्या मुलांना जन्म दिला तर तिला सुमारे ६.१५ लाख रुपये मिळायचे आणि जर आधीच गर्भ पडला तर तिला ३८,००० रुपये देऊन पाठवले जायचे. पण मूल हवं असणाऱ्या  जोडप्याकडून हे हॉस्पिटल १८ लाख रुपयांच्या आसपास पैसे उकळायचं.

तिथल्या आसपासच्या लोकांनी या रुग्णालयाविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या, इथे सरोगसीचा नावाखाली महिलांचं शोषण केलं जायचं, महिलांना कमी मोबदला देऊन स्वतः मात्र त्या बदल्यात जास्त पैसे उकळायचे, ही पोर जन्माला घालण्याची फॅक्टरी आहे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. 

पण तिथल्या डॉक्टरांनी नेहमी हे सगळे आरोप फेटाळून लावले. आम्ही महिलांना शिवणकाम आणि भरतकाम यांसारखी कौशल्ये शिकवतो, असे तिथले डॉक्टर्स सांगायचे. जेणेकरून त्या बाहेर गेल्यावर आपला उदरनिर्वाह करू शकतील. 

पण हळू – हळू या रुग्णालयाचा काळाबाजार समोर आला. एकप्रकारे त्यांनी खरच व्यवसाय सुरू केला होता. अख्ख्या भारतात हा भाग सरोगसीची अड्डा म्ह्णून ओळखला जायला लागला. आता त्यावेळी कुठलाही कायदा नव्हता त्यामुळे कारवाई होती नव्हती. याचाच फायदा घेऊन हॉस्पिटलने काहीच कालावधीत करोडो रुपयांची उलाढाल केलेली आढळली.

याच दरम्यान अशी बरीच प्रकरण समोर आली सरोगसीच्या नावाखाली फसवणूक केली गेली. त्यामुळे सरकारला यात लक्ष घालणं  भाग पडलं. त्यामुळे २०१९ साली सरोगसीवर कायदा बनवण्यात आला. आणि ही बेबी फॅक्टरी बंद पडली. याच बरोबर देशभरातला सरोगसीचा सगळा काळाबाजार सुद्धा बंद झाला. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.