भाजपने शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी सुशांतसिंह केसचा वापर केला

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने जून मध्ये आत्महत्या केली आणि त्यानंतर देशभरात त्यांच्या हत्येच्या आरोपावरून एक मोठे वादळ उसळले. जवळपास देशातील सर्व चॅनेल सोशल मीडिया आणि राजकारणातही त्याचे पडसाद रोजच्यारोज उमटले.

आत्महत्या वरून या विषयाला इतके फाटे फुटत गेले की मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि बॉलिवूडमधील घराणेशाही व त्यांनी बाहेरील अभिनेत्याला संधी नाकारण्याची कथा बंगाली लोक आणि त्यांची काळी जादू सिनेअभिनेत्यांकडून वापरण्यात येणारे ड्रग्ज आणि मुंबई पोलीस अकार्यक्षम असल्याचा केलेला आरोप!

एक ना एक आरोपांची राळ या प्रकरणाने उडवली गेली.

शनिवारी मात्र दुर्दैवाने या सर्वच प्रकरणावर पडदा पडला आणि देशाचा मनोरंजन बंद झालं कारण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेने मुंबई पोलिसांची बाजू खरी ठरवली आणि आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली होती असा निष्कर्ष दिला.

त्याचा खून झाल्याच्या सर्व शक्यता फेटाळण्यात आल्या आहेत.

मग गेले तीन महिने आपण सगळे नेमकं काय करत होतो? रोज रोज आपण न्यूज चॅनेलवर त्याच त्याच कव्हरेज ला पाहत होतो ते नक्की काय होतं? कुटुंबासोबत जेवायला बसताना आपण एकमेकांशी या विषयावरती जेवढ्या चर्चा केल्या त्याचा नक्की निष्कर्ष काय होता?

आणि आपण हे सगळ्या आपल्या मर्जीने करत होतो की कोणीतरी आपल्याकडून हे करून घेत होतं?

नुकतेच मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केल्या आहेत या नुसार जवळपास 80 हजार सोशल मीडिया अकाउंट या गॅस चा तपासाला विरुद्ध दिशेने नेण्यासाठी कार्यरत होती असा निष्कर्ष गुन्हे शाखेने काढला आहे.
14 जून ते 12 सप्टेंबर या दरम्यान भारतात सोशल मीडियावर नेमके काय घडले याचा विस्तृत रिपोर्ट बनवला गेलाय.

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये शिकवणारे जोयोजित पाल, जे मायक्रोसोफ्ट रिसर्च इंडिया संस्थेतील प्रमुख संशोधक आहेत, यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. मुख्य न्यूज चॅनल्सनी आपल्या युट्युब पेजस वर टाकलेल्या व्हिडिओज, भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींनी व पत्रकारांनी केलेले ट्विट्स-चालवलेले ट्रेंड, लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींनी आणि मोठमोठ्या मीडिया हाऊसेसनीही प्रसिद्ध केलेल्या खोट्या बातम्या आणि भारतातील तथाकथित फॅक्ट चेकर यूट्यूबवाल्या लोकांनी सोडलेले लोकांच्या डोक्यात किडे करणारे व्हिडीओज या सर्वांचा अभ्यास पाल यांनी केला.

आणि याचा सर्वात जास्त मूल्यवान वापर कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या महाराष्ट्र सरकारवर ओढलेले ताशेरे आणि केलेले आरोप!

ह्या बातम्यांनी चहुकडून रान उठवलं आणि लोकही जीवावर उदार होऊन त्याचा खून झाल्याचं सांगणाऱ्या लोकांना पाहत बसले.

भाजपचा ह्यात काय रोल होता का?

स्क्रोल ह्या ऑनलाइन वेब पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या इन डेप्थ रिपोर्टिंगनुसार, सुरुवातीला जेव्हा इतर न्यूज चॅनल्सचे न्यूज रिपोर्ट सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली या बातम्या दाखवत होते, तेव्हा अचानक या बातम्यांना सुशांत सिंग यांची हत्या झाल्याच्या थियरीकडे वळवण्यात आले.

पाल यांनी केलेल्या अभ्यासातून यामागे भाजपाचा हात होता असे सिद्ध झाले आहे.

यातील काही ट्विट्सचा अभ्यास खाली दिलेल्या लिंक वरून तुम्हाला पाहता येईल यामधून त्याच्या आत्महत्येला अचानक हत्या आणि हत्येचे गूढ अशा विषयांची जोडले गेल्याची आकडेवारी मिळेल:

https://arxiv.org/pdf/2009.11744.pdf

आकडेवारीतून निष्कर्ष काढला जाऊ शकतो की भाजपने या मागे आपली चांगलीच ताकत उभी केली होती आणि ज्या बाजूला काँग्रेस कडून आत्महत्या या विषयावर जास्तीत जास्त ट्विट्स आली त्याच्याविरुद्ध भाजपकडून मात्र हत्या आणि गूढ असे शब्द जास्त वापरण्यात आले.

जुलैपर्यंत जेव्हा या केसमध्ये फक्त आत्महत्या हाच शब्द वापरण्यात येत होता, त्यानंतर भाजपने यात उडी घेतली व तिथूनच त्याची हत्या झाल्याच्या आरोपांना सुरवात झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

पण एखादा राजकीय पक्ष एखाद्या अभिनेत्याच्या हत्येवर किंवा आत्महत्येवर एवढे वादळ का उठवेल? आणि ह्यात मधूनच शिवसेनेचा संबंध कसा काय आला?

या संपूर्ण काळात जर आपण न्यूज रिपोर्ट पाहिले तर आपल्याला लगेच कळून येईल की सुशांतसिंग आत्महत्या या केसचा वापर महाराष्ट्र सरकारवर आणि त्यातल्या त्यात शिवसेनेच्या विरुद्ध करण्यासाठीच ही सर्व खेळी केली गेली होती.

मुंबई पोलिसांवर ती या वेळी फार मोठ्या प्रमाणात जहरी टीका करण्यात आली आणि यामागे हात होता तो राज्यात विरोधी पक्षात बसणाऱ्या भाजपाचा. मुंबई पोलिसांवर अति अकार्यक्षमतेचा आरोप केला गेला आणि बिहारच्या पोलिसांनी मुंबईत तसेच सुशांत सिंह च्या घरावर तळ ठोकून स्वतंत्रपणे हत्या आणि यासंदर्भातील पुराव्यांचा तपास केला.

आता या लिंकवर तुम्ही मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस हे शब्द वापरले गेलेले ट्विट्स नक्की कोणाकडून कितीदा कोणत्या तारखांना वापरले गेले आहेत हे पाहू शकता 

https://arxiv.org/pdf/2009.11744.pdf

आणि यावेळी हल्ला फक्त मुंबई पोलिसच नाही तर सोशल मीडिया कडून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर देखील चिखलफेक करण्यात आली.

ट्विटर वापरणाऱ्या लोकांना माहीत असेल की त्या काळात

#UddhavResignOrCBI4SSR, #ShameOnMahaGovt

हे सर्व हॅशटॅग खूप प्रसिद्ध झाले होते व ट्रेंडिंगमध्ये आले होते.

यावरून हे सिद्ध होते की मुंबई पोलिसांवर ती केल्या गेलेल्या आरोपांचा रॉक हा पूर्णपणे महाराष्ट्र सरकार वरती होता हा हल्ला मोठ्या प्रमाणात भाजपा कडूनच झाला होता असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

पण नुसती तुम्ही त्यांची भांडणे लावूनही लोक ह्या तितकेच रस घेत नाहीत हे पाहिल्यानंतर या केसला अजून एक फोडणी देण्यात आली व ती म्हणजे रिया चक्रवर्ती! भारतातील मोठ्या नेत्यांकडून, मोठमोठ्या मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांकडून केल्या गेलेल्या सर्व स्वीट्स चा हा आलेख पहा – ऑगस्टनंतर या प्रकरणाचा रोग हळूहळू रिया चक्रवर्ती तिच्याकडे वळला गेला व लोकांची उत्सुकता चाळवण्यात आली –

https://arxiv.org/pdf/2009.11744.pdf

वर्तमानपत्रे आणि विशेषता टीव्ही चॅनेलचा सुद्धा यात सर्वात मोठा हातभार होता.

कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ या आरोपांचा जोरावर घरी आल्यावर तिला अटक करण्यात आली आणि काहीही संबंध नसताना इतर कित्येक लोकांवरती चिखलफेक करण्यात आली.

भाजपच्या बाजूने बातम्या देण्याची चढाओढ करणाऱ्या रिपब्लिक टीव्ही या चॅनेलवरून दिल्या जाणाऱ्या जवळपास सर्व प्राईम टाईम शो आणि रिपोर्टिंग वरून ही गोष्ट सिद्ध होते की त्यांनी आपल्या चॅनेलवर दिवसभर दाखवलेले ट्विटरचे हॅशटॅग हेच मोठ्या प्रमाणात वापरून ट्रेंडिंग होत होते.

इतर कोणत्याही चॅनल पेक्षा रिपब्लिक टीव्ही या चॅनेलला ऑनलाइन आणि त्यातही ट्विटर कडून मिळणारा पाठिंबा सर्वाधिक जास्त आहे.

चॅनेलने जो हॅशटॅग आपल्या शोमध्ये दाखवला असेल तोच दुसऱ्या दिवशी ट्रेंडिंगला जात असे व कोट्यावधी ट्विटर हँडल्स कडून वापरला जात असे.

अर्थात टाईम्स नाऊ सीएनएन न्यू 18 आणि इंडिया टुडे या मोठमोठ्या चॅनल्सनी सुद्धा सुशांत सिंग वर ट्विट केले होते. लोक या प्रकाराला इतके चिकटून होते की सर्व चॅनेलमध्ये या विषयावर टाईम टाईम करण्याची चढाओढ लागली होती म्हणून आपले दर्शक टिकवण्यासाठी चॅनेलला या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या.

जो चॅनेल सुशांत सिंग राजपूत यासंबंधी काहीही दाखवील या चॅनेलवर लोक दिवसभर पडून असत व म्हणून सुशांत सिंग शिवाय दुसरे काहीही दाखवणाऱ्या चॅनेलचे रेटिंग ह्या काळात खूप कमी झाले होते.

एकूणच काय तर आपलं राजकारण आता आपल्या घरातून, टीव्ही-मोबाईलवरून लढलं जात आहे आणि आपणही ह्याचा भाग झालो आहोत असंच म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.