सुशीलकुमार शिंदेंनी गृहमंत्री म्हणून घेतलेली शपथ कसाबच्या फाशीच्या वेळेस चोख पाळली.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

मा. सुशीलकुमार शिंदे !!! नाव घेताच नजरेसमोर एक हसतमुख व्यक्तिमत्व उभं राहतं. 

आत्ता ते सत्तेत नाहीत मात्र लोकांच्या आठवणीत जरूर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते घडून गेलेत जे सत्ता असो वा नसो त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. सत्ता मिळाली म्हणून हुरळून गेले नाहीत कि नाही मिळाली म्हणून कधी आत्ताच्या राजकीय नेत्यांसारखे अस्वस्थ झाले नाहीत…नेहेमीच प्रसन्न व्यक्तिमत्व. 

कोर्टात शिपाई म्हणून आपल्या संघर्षमय आयुष्याची सुरुवात केली. वकिलीची पदवी घेतली आणि ज्या कोर्टात ज्या शिपाई होते. तिथेच वकील म्हणून उभे राहिले. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर स्पर्धा परीक्षा देऊन पी. एस. आय. झाले. 

शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात आले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले…….देशाचे गृहमंत्री झाले आणि संसदे नेते सुध्दा झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील अनेक कार्ये आणि त्यांचे निर्णय आजही कौतुकाने सांगितले जातात.  सुशीलकुमार हे राजकारणा सोडता एक उत्तम रसिक होते, त्यांना संगीताची, कवितेची आवड होती.

आपले पद आणि त्या पदाचे गांभीर्य याचे भान असलेले मंत्री क्वचितच आढळतात. त्यातच एक नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे. याबाबतचा एक किस्सा सांगावासा वाटतो जो २६/११ च्या हल्ल्याच्या वेळीचा आहे जो ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी एका लेखात सांगितला होता.

२०१२ सालची घटना. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी २६/११ च्या मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातला मुख्य आरोपी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली होती. त्या आधी कुणालाही याची साधी कुणकुण देखील लागली नव्हती. त्याचं श्रेय जाते ते या तपासाच्या सबंधित असणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांना ज्यांनी हि गुप्तता काटेकोरपणे पाळली. 

तेंव्हा सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते….त्या आधीचा काही घटनाक्रम असा काहीसा होता, 

११ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:चा मोबाईल बंद करून ठेवला होता. आपले घरातील कामे आटपून न जेवताच घराबाहेर निघाले. दुपारचं जेवण करायला देखील ते घरी आले नव्हते. फोन करावा तर त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता. त्यांच्या पत्नी उज्ज्वला वहिनींची फोनाफोनी सुरू झाली. फोन लागेना. घरी जेवायला येणार की नाही समजेना. बघता बघता रात्र झाली. पण सुशीलकुमार शिंदे काही घरी आलेच नाहीत.

उज्ज्वला वहिनींनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारणा केली मात्र तिकडून उत्तर ‘ऑफिसमध्ये नाहीत’ असं आलं. आता रात्रीचे १२ वाजून गेले वाहिनी जेवायच्या थांबल्या, आता त्यांना टेंशन तर येतच होतं आणि रागही येत होता.

त्या जेवायच्या थांबल्या होत्या. पहाटे ३ वाजता सुशीलकुमार शिंदे घरी आले. वहिनींनी विचारलं कुठे होतात?, फोन का बंद होता?  त्यावर शांतपणे सुशीलकुमार म्हणाले… ‘मला भूक लागलीय, मला जेवायला वाढ आणि मग मला झोपू दे… सकाळी सांगेन…’ 

सकाळी ७ वाजता मुंंबईचा फोन उज्ज्वला वहिनींना आला. फोनवर त्यांची मुलगी म्हणजेच स्मृती. तिने सांगितलं कि, कसाबला फाशी दिली गेली आहे… ’

ही बातमी ऐकून उज्ज्वला वहिनी सुशीलकुमारांना उठवायला गेल्या, त्यांनी जोरात सांगितले… ‘अहो, कसाबला फाशी दिली… ’ झोपेतून उठलेले सुशीलकुमार म्हणाले, ‘अगं याचसाठी गेले २४ तास मी बाहेर होतो, आणि याचमुळे मी माझा मोबाईल बंद ठेवलेला…’ वहिनी म्हणाल्या ‘मग मला का नाही सांगितलं… ’ ते शांतपणे म्हणाले, 

‘मी गृहमंत्री म्हणून जेंव्हा गुप्ततेची शपथ घेतली…त्यामुळे अशा महत्वाच्या आणि संवेदनशील गोष्टी पत्नीलासुध्दा सांगता येत नसतात..’ 

सुशीलकुमारांनी कसाबची फाशी एवढी गुप्त ठेवली होती कि त्याची खबर त्यांनी आपल्या पत्नीला देखील कळू दिली नव्हती.

आत्ताची परिस्थिती पाहता तर असंच चित्र दिसतंय कि ज्याही कुणा अतिरेक्यांना मोदी सरकार फाशी देते ती वाजतगाजत दिली जाते…असो, तर सुशीलकुमारांनी घेतलेला निर्णय, आणि दाखवलेली कमालीची गुप्तता असामान्य स्वरूपाची होती.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.