आणिबाणीच्या काळात हुकूमशाहीला विरोध करत बहरलेली त्यांची लव्हस्टोरी.
सुषमा स्वराज. स्वराज हे त्यांच्या नवऱ्याच नाव. लग्न झाल्यानंतर महिला नवऱ्याकडच आडनाव लावतात. आपल्या वडिलांच्या जागेवर नवऱ्याच नाव येतं. सुषमा स्वराज यांनी स्वत: आडनाव देखील लावलं नाही. त्यांनी आपल्या नावासमोर नवऱ्याच नाव लावलं. अनेकांना आजही वाटतं की स्वराज हे त्यांच आडनाव, पण ते त्यांच्या नवऱ्याच नाव, आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीला विरोध करत बहरलेली त्यांची लव्हस्टोरी.
स्वराज कौशल हे आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. जेव्हा सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांनी एक भावनिक ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते,
“थैंक्यू मैडम, अब चुनाव न लड़ने का फैसला लेने के लिए. एक समय ऐसा भी आया था जब मिल्खा सिंह ने भागना छोड़ दिया दिया था. 41 साल से तुम इस मैराथन में हो. 1977 से एक भी इलेक्शन नहीं है जो तुमने न लड़ा हो, दो बार छोड़कर. मैं भी तुम्हारे पीछे 47 साल से भाग रहा हूं. मेरी सांस फूलने लगी है. ये तो सोचो मैं अब 19 बरस का नहीं रहा. शुक्रिया.”
सुषमा स्वराज यांच्या घरचं वातावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. त्यांचे वडिल स्वयंसेवक होते. संघाच्या मुशीतल्या घरातल्या सुषमा स्वराज यांच्या हिंदीचे दाखले जसे आज दिले जातात तशेच कॉलेजच्या काळात दिले जायचे. BA झालेल्या सुषमा स्वराज यांनी पंजाब युनिव्हर्सिटीत LLB ला अॅडमिशन घेतलं. इथच त्यांची ओळख स्वराज कौशल यांच्यासोबत झाली होती.
स्वराज कौशल हे इंग्लिश डिपार्टमेंटला होते ते सुषमा स्वराज या हिंदी डिपार्टमेंटला. दोघेही कॉलेजचे टॉपचे विद्यार्थी. इथे डिबेटच्या स्पर्धांमध्ये दोघांचा नंबर ठरलेला असायचा.
स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे नातेवाईक. जॉर्ज तेव्हा इंदिरा गांधीच्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्के देत होते. इंदिरा गांधींच्या अनिर्बंध सत्तेला आव्हान म्हणून हे कॉलेजचे विद्यार्थी विरोध करत होते. घरातून आलेले संघाचे विचार आणि तिकडे जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रभाव.
हे कारण दोघांना एकमेंकांच्या जवळ आणण्यास पुरेस होतं.
साल होतं १९७३. त्या वेळी बांग्लादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली होती. भारतात एकमुखाने इंदिरा नेतृत्व मान्य झालं होतं. त्याच वेळी भारताची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली होती. हुकूमशाही प्रवृत्ती वाढली होती. मनमानी कारभाराविरोधात देशभरात निदर्शने होत होती. इंदिरा सत्तेच्या विरोधात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलनाने जोर पकडला होता. जयप्रकाश नारायण यांनी विरोधात आवाज देण्यास सुरवात केली होती.
या दरम्यानच्या काळात पंजाब युनिव्हर्सिटीतून हे सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी हजर झाले होते. स्वराज कौशल हे आज भारतातील मोठ्या वकिलांपैकी एक आहेत. हूशार असणाऱ्या स्वराज कौशल यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी आली होती. ती म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर लादलेले आरोप खोडून काढणं.
जॉर्ज फर्नांडिस इंदिरा सत्तेच्या विरोधात कट रचत आहेत. त्यांनी भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली आहे. रेल्वेचा उपयोग त्यांनी डायनामाईट घेवून जाण्यासाठी केला अशा प्रकारचे ते आरोप होते. यामध्ये स्वराज कौशल जॉर्ज फर्नांडिस यांची बाजू मांडत होते. तर सुषमा स्वराज त्यांची मदत करत होत्या.
या काळात नेमकं काय झालं तर अनियमित सत्तेला विरोध करण्याच कारण त्यांना एकत्र येण्यास कारणीभूत ठरलं. झालं तसच २६ जून १९७५ रोजी भारतात आणिबाणी लागू करण्यात आली. आणि पुढच्या पंधरा दिवसातच म्हणजे १३ जूलै १९७५ हि सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या लग्नाची तारिख होती.
लग्नाला दोनच वर्ष झाली आणि सुषमा स्वराज यांनी राजकारणात प्रवेश केला. पहिल्याच दणक्यात त्यांचा हरियाणाच्या कॅबिनेटमध्ये प्रवेश झाला. सर्वात तरुण कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यावेळी त्यांच वय होतं फक्त २५ वर्ष.
इकडे स्वराज कौशल वयाच्या ३४ व्या वर्षी सुप्रीम कोर्टात अॅडव्होकेट जनरल झाले. सर्वात तरुण वयात अॅडव्होकेट जनरल होणारे ते वकिल होते. वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरामचे गव्हर्नर झाले. पुढे स्वराज कौशल १९९८ ला राज्यसभेचे खासदार देखील झाले. २००४ ते २००४ सुषमा स्वराज देखील राज्यसभेच्या खासदार होत्या.
नवरा आणि बायको दोन्हीही राज्यसभेत खासदार असण्याची भारतीय इतिहासातील हि पहिली वेळ असावी. स्वराज कौशल हे त्यांच्या मागे कायमच होते, अगदी नावापासून ते वकिली असो कि राजकारण.
हे हि वाच भिडू.
- नाही तर हा भाजपचा नेता मोदींना कडवी टक्कर असता
- कुलभूषण जाधवांसाठी धावून जाणारे हरिष साळवे याकुब मेमनच्या बाजूने देखील लढले होते.
- भाजपच्या पराभवामागे आहे वाजपेयींची पुतणी