भारतातलं पहिलं शेतकरी आंदोलन एका संन्यासी महाराजांनी सुरू केलं होतं.

स्वामी सहजानंद सरस्वती यांनी भारतातल्या पहिल्या शेतकरी आंदोलनाचे जनक मानले जातात.

स्वामी सहजानंद सरस्वती यांनी संन्यासाचा अर्थ धर्म न लावता देशसेवा लावला आणि त्यादृष्टीने कार्य केलं. देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम स्थान दिलं आणि शेतकऱ्यांसाठी विपुल काम केलं. सावकारांवर वचक बसवला आणि अन्न, शेतकरी यांना प्रथम प्राधान्य दिलं.

स्वामी सहजानंद सरस्वती यांनी एक पुस्तक लिहिलं होतं किसान क्या करे आणि यात त्यांनी काही मंत्र दिलेले होते

१. खान-पान सीखें

२. इंसान की तरह जीना सीखें

३. हिसाब रखें भी

४. डरें कतई नहीं

५. लड़ना सीखें 

६. वर्गचेतना हासिल करें.

हे पुस्तक भलेही बराच काळ आधी लिहिलं गेलेलं आहे पण ते आजही लागू होतं.

भारतात पहिल्यांदा शेतकरी आंदोलन उभारून स्वामी सहजानंद सरस्वती यांनी मोठा लढा दिला. त्यांना भुकेले, वैतागलेले, शोषित पीडित शेतकऱ्यांमध्ये देव दिसला आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य केलं. महात्मा गांधी यांनी चंपारण्यमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारलं. पण शेतकऱ्यांना मोठ्या क्षमतेने देशपातळीवर एकजूट करून मोठा लढा उभारण्याचं श्रेय स्वामी सहजानंद सरस्वती यांना जातं. 

हे आंदोलन उभं कस राहिलं तर स्वामी सहजानंद सरस्वती हे पूर्ण भारतभर फिरलेले संन्यासी होते. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांचं चालणारं शोषण त्यांनी पाहिलेलं होतं, शेतकऱ्यांना गुलामासारखी वागणूक दिली जात होती. त्यावेळी स्वामी सहजानंद सरस्वती यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने लढायचं ठरवलं.

१९२७ साली सहजानंद यांनी पश्चिमी शेतकरी सभेत शेतकरी आंदोलनाचं बिगुल वाजवलं. १९३६ साली अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचे स्वामी सहजानंद सरस्वती हे प्रमुख होते.

जो अन्न वस्त्र उपजाएगा, अब सो कानून बनाएगा
यह भारतवर्ष उसी का है, अब शासन वही चलाएगा

अशा प्रकारच्या घोषणा देऊन त्यांनी आपला लढा बुलंद केला. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नावर सावकार, दलाल, इंग्रज इतकंच काय तर प्राणी पक्ष्यांचा सुद्धा अधिकार असतो पण त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही याच शल्य त्यांच्या मनात होतं. शेतकरी आंदोलन हे क्रांती बनून लोकांसमोर आलं.

सहजानंद यांनी आपल्या भाषणांमध्ये शेतकर्यांनासुद्धा सावध आणि जागरूक राहायला सांगितलं होतं. शेतकऱ्यांनी आपल्या दुष्मनाला वेळीच ओळखायला हवं, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं कि शेतकऱ्यांनी आपली लढाई तोपर्यंत चालू ठेवावी जोवर शोषण करणारे नष्ट होत नाही. 

शेतकऱ्यांचे दुष्मन फक्त इंग्रज नव्हते तर सावकार लोकं सुद्धा होते. १९३४ च्या बिहारमध्ये झालेल्या भूकंपात स्वामी सहजानंद काम करत असताना बऱ्याच सावकरांनी शेतकऱ्यांकडून जोरदार वसुली चालवली होती. तेव्हा स्वामी सहजानंद सरस्वती यांनी घोषणा केली जी देशभर गाजली आणि या नावाने आंदोलन सुद्धा होऊ लागली. ती घोषणा होती

कैसे लोगे मालगुजारी, लट्ठा हमारा ज़िंदाबाद…..

१९५० साली स्वामी सहजानंद यांचं निधन झालं तेव्हा प्रसिद्ध कवी रामधीर सिंह दिनकर म्हणाले होते कि दलितोका संन्यासी चला गया. देश स्वतंत्र झाल्यावर जमीनदारीची पद्धत संपली मात्र शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबला नाही. आजसुद्धा शेतकऱ्यांचं विविध रूपात शोषण चालूच आहे. स्वामी सहजानंद सरस्वती यांनी शेतकरी आंदोलनाचा पाया घातला हीच शेतकऱ्यांसाठी मोठी प्रेरणा होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.