ममता दीदी बॉलीवूडच्या तारणहार ठरणार का ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा चांगलाच चर्चेत आहे. याच दौऱ्यातील त्यांची  शरद पवार भेट असो कि आदित्य ठाकरे यांची भेट. शिवाय आता याच सबंधित आणखी एक गोष्ट विशेष चर्चली जातेय ती म्हणजे, स्वरा भास्कर. 

स्वरा भास्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्वरा आपले म्हणणे मांडताना दिसत आहे.

ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील वाय. बी. सेंटरमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या.. त्यात  चित्रपट, राजकीय आणि लेखनाशी संबंधित प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण यांच्यासोबतच स्वरा भास्कर देखील सहभागी होती. स्वरा भास्करने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांच्यासमोर UAPA आणि देशद्रोहाच्या आरोपांबाबत काही गोष्टी सांगितल्यात. 

या चर्चेत सर्वच जण सहभागी झाले. पण ममता बॅनर्जींसमोर बोलतांना अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच संतापली होती. देशात काय चालूये, कशा पद्धतीने दडपशाही चालूये याबाबतीत तिने आवाज उठवला.

तिने ममता दिदिंसमोर कलाकारांची सद्यस्थितीच मांडली. ” आम्ही करिअर पणाला लावून लढा सुरू केला आहे. 

 “प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध इथला प्रत्येक कलाकार आपलं करिअर, रोजगार पणाला लावून लढा देतोय, ती पुढे असंही म्हणाली कि, मी तुम्हाला खात्री देते की या खोलीतले सर्वजण त्यांच्या पातळीवर लढा देत आहेत. अनेकांनी त्यांचा रोजगार, करिअर पणाला लावून हा लढा त्यांना शक्य तितका सुरू ठेवला आहे. हे सर्वजण चित्रपट सृष्टीमध्ये काम करतात. भारतात काय घडतंय, हे सांगताना या सगळ्यांना मोठा विरोध सहन करावा लागतोय. या लढ्याच्या बदल्यात आम्हाला केंद्र सरकार आम्हाला यूएपीए आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यांचा प्रसाद वाटतंय, अशी तीव्र भावना तिने व्यक्त केल्यात. 

तिने असंही पुढे म्हणलं आहे कि, “सद्या आम्ही अशा परिस्थिती मध्ये अडकलो आहोत, जिथे एकीकडे एक पूर्णपणे बेजबाबदार गट आहे. सत्ताधाऱ्यांना अशा जमावाचा/गटाचा आपल्या फायद्यासाठी हवा तसा वापर कसा करता येईल हे कळतं. अन दुसरीकडे, आम्ही यावर आवाज उठवतोय तर आमच्यावर   यूएपीए आणि देशद्रोहाचे गुन्हे आमच्यावर लागू करत आहेत. पण यातून वाचण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारची भक्ती करायची नाही. पण त्यामुळे आमच्या सर्वांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे”, अशा पद्धतीने सर्व मर्मकहाणीच तिने  ममता बॅनर्जींसमोर मांडली आहे.

आता स्वरा भास्कर असू देत अथवा तिच्या म्हणण्यानुसार सर्व कलाकारांचं म्हणणे ऐकून ममता बॅनर्जी काय भूमिका घेतील यावर आता चर्चा चालूये. याचाच भाग म्हणजे, ममता बॅनर्जी सत्तेत आल्यात तर यूएपीए कायदा रद्द केला जाईल, असंही बोललं जातंय. कारण ममता यांनी यानिमित्ताने असं विधान केलं आहे कि, यूएपीए समाजासाठी चांगले नसून आता त्याचा गैरवापर होत आहे.

UAPA कायदा काय आहे, ज्यामुळे कलाकारांना बंधनं येतायेत.

UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) कायद्यांतर्गत अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. दहशतवादी कारवाया रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. त्याची व्याप्ती इतकी विस्तृत आहे की हा कायदा केवळ गुन्हेगारी प्रकरणातच नाही तर वैचारिक विरोध आणि आंदोलन किंवा दंगल भडकावण्याच्या बाबतीतही लादला जातो. हा कायदा १९६७ मध्ये आला, २०१९ मध्ये एनडीए सरकार आलं असतांना त्यात सुधारणा करण्यात आली, त्यानंतर तो अधिक मजबूत झाला. २०१९ मध्ये संसदेत दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले, त्यानंतर तपासाच्या आधारे दहशतवादी घोषित केले जाऊ शकते अशी तरतूद यात समाविष्ट केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.