हिटलरने आपलं १०० टन सोनं थेट स्विस बँकेत दडवून ठेवलं होतं…

स्विस बँक आणि त्याविषयी चालणाऱ्या चर्चा आपल्याला काही नवीन नाही. भारतीय लोकांचं स्विस बँकेत अकाउंट म्हणजे गैरमार्गाने मिळवलेला पैसा त्या बँकेत असतो असं समीकरण सेट झालंय. म्हणजे स्विस बँकेची फॅसिलिटी तशी असल्या कारणाने अनेक लोकांनी स्विस बँकेत आपला पैसा ठेवला होता. कुठल्याही देशातील नागरिकांशी स्विस बँक व्यवहार करते याच कारण म्हणजे कुठल्याही देशाबरोबर स्वित्झर्लंडचे युद्ध झाले नाही.

पण स्विस बँकेबद्दल अजून एक मोठी गोष्ट म्हणजे या स्विस बँकेने हिटलरच्या १०० टन सोन्याचं रक्षण केलं होतं. हि बातमी बऱ्याच उशिराने जगाला कळली. हिटलर हा जितका धूर्त आणि क्रूर होता तितकाच तो हुशार होता, त्याच्या राजवटीमध्ये ज्या नागरिकांकडे तो विदेशी चलन पाहत असे त्याला तो थेट मृत्युदंड देत असायचा. 

हिटलरच्या अधिकाऱ्यांची स्विस बँक अकाउंटवर नजर असायची, हिटलरच्या भीतीने जर्मन लोकांनी बँकेत पैसे ठेवणे बंद केले होते. इतका दरारा हिटलरचा होता पण दुसऱ्यांना स्विस बँकेत अकाउंट उघडू न देणारा हिटलर मात्र स्वतः स्विस बँकेसोबत व्यवहार करायचा.

स्विस बँकेने त्याकाळात सोने आणि इतर किमती वस्तू ठेववून घ्यायला सुरवात केली होती याचं कारण होतं इतर देशांनीही स्विस बँकेसोबत जोडलेलं राहावं. १९४० साली हिटलरने विश्व युद्धाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक धोरण स्वीकारलं. आपली ताकद लावून त्याने बँक स्ट्रॅटर्जी बदलली आणि बँकांना लुटायला सुरवात केली. यात ज्यू लोकांच्या संपत्तीवर हमला चढवला प्रामुख्याने सोन्यावर. 

यावर कोणीही आक्षेप घ्यायला तयार नव्हतं कारण हिटलर कडून ज्युईश लोकांना मिळणारी ट्रीटमेंट सगळ्यांना माहिती होती. कुठलीही बँक हे लुटीत आलेलं सोनं स्वीकारायला तयार नव्हतं शिवाय स्विस बँक. स्विस बँकेने नाझी गोल्ड स्वीकारायला सुरवात केली.

हिटलरच्या या धोरणामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी ज्युईश लोकांना काढून तिथे जर्मन लोक भरती केले. १९३८ साली स्विस पोलिसांनी सुचवलं कि ज्युईश लोकांच्या पासपोर्टवर J असा शिक्का देण्यात यावा जेणेकरून त्यांना जर्मनीत प्रवेश आणि बँकेत खाते उघडता येणार नाही पण त्यांच्याकडील सोनं राखून ठेवता येईल. 

या धोरणाबद्दल स्विस नागरिकांना काहीही माहिती नव्हतं कि स्विस बँक नाझी बरोबर व्यवहार करत आहे. हे व्यवहार इतक्या गुप्त पद्धतीने सुरु होते कि कुणालाही याबद्दल माहिती नव्हतं. कारण सगळीकडे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. १९४५ साली जेव्हा युद्ध संपलं तेव्हा सगळ्या जगाचं लक्ष स्विस बँक आणि हिट्लरकडे वेधलं गेलं.

स्विस बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी या लुटीत आलेलं सोनं राखून ठेवलं होतं. जागतिक आर्थिक व्यवहारानुसार हे गैर होतं मात्र कुठल्याही नियमाचं बंधन न घालता स्विस बँकेने हिटलरच्या ६० मिलियन डॉलरचं डिपॉजिट ठेवलं होतं. 

१९९६ साली वर्ल्ड ज्युईश काउन्सिल तर्फे नेमण्यात आलेल्या स्पेशल कमिटीने स्विस बँकेच्या गैरव्यवहाराबद्दलचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाहि धक्का बसला.

स्विझर्लंडच्या साथीने नाझीने तब्बल १०० टन सोनं स्मगलिंग करून आणलं होतं. पण यातील केवळ ४ टन सोनंच पेबॅक करण्यात आलं. यात स्विस बँकने १.२५ बिलियन डॉलरची सेटलमेंट केली होती. या सेटलमेंट मध्ये नेस्टले आणि इतर छोट्या मोठ्या कंपन्याही सामील होत्या.

ज्या कुटुंबाकडून नाझीने सोनं लुटलं होतं त्या तर हयात नव्हत्या. पुढे बराच काळ हे प्रकरण चर्चेत राहिलं. पण मोठ्या हुशारीने रिक्लेम स्विस बँकेने केले. यातून स्वित्झरलँडने आपली सुटका करून घेतली. आपल्या भाषणात हिटलर सांगत असे कि माझ्याकडे जास्त पैसे नाही इतकंच नाही तर बँकेत अकाउंट सुद्धा नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं.

द हंट फॉर हिटलर्स मिसिंग मिलियन या डॉक्युमेंट्रीमध्ये हिटलरने कशा प्रकारे लोकांकडून सोनं गोळा केलं, पुढे त्याचा टॅक्स देण्यासही नकार दिला असा सगळा प्रकार दाखवण्यात आला आहे. पण स्विस बँकेने हिटलरचं १०० टन सोनं सुरक्षित ठेवलं याबद्दल मात्र बऱ्याच चौकश्या झाल्या पण स्विस बँक यातून कशी क्लियर झाली हे आजही एक कोडं आहे.

स्विस बँक हिटरलच्या या लुटीतून बरेच व्यवहारही करत होती. स्वित्झरलँडच्या एकाधिकारशाहीमुळे आणि मोठ्या गुंतवणुकीमुळे ते कायमच अशा प्रकरणातून सुटत आले असं बोललं जातं.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.