‘कुछ नया ट्राय’ करायच्या नादामध्ये जरा जपूनच…

स्टोरीचं टायटल वाचून तुम्हाला वाटलं असेल आत कंटेन्ट काय तर लै मजेदार असेल…पण जरा थांबा सगळ्याच गोष्टीत घाई करायची गरज नसते. आरामात गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण आजच्या विषयात काय आनंद वैगेरे तसलं यात नसणार.

तर कामाची गोष्ट आहे. गरजेची गोष्ट आहे त्यामुळे समजून उमजून घ्या…डायरेक्ट विषयालाच हात घालते…पॉर्न, सेक्स आणि टॅबू सेक्स !

लग्नाची पहिली रात्र फार काहीतरी भारी आणि रोमँटिक रात्र असते असा आपला गोड गैरसमज जो आपल्या बाळबोध पिक्चरमधून आपल्या डोक्यात भरवला गेला. नवी सायकल मिळाली की आनंद व्हायचा. पण सायकल चालवायचा अनुभव नसला तर पहिल्या खेपेला पडणे, खरचटणे, हा नियम असतो, तसेच पहिल्या रात्री देखील अपयश येणे हा नियम असतो, परंतु कथा-कादंबऱ्यातून, पिक्चरमधून पहिल्या रात्रीच्या आनंदाचे इतके रसभरित वर्णन असते की स्त्री-पुरुष दोघांच्याही अपेक्षा उंचावलेल्या असतात.

पण काही ‘झालं’ नाही की, त्या पहिल्या रात्रीच्या अनुभवातून भीती निर्माण होते. आत्मविश्वास जातो आणि मग सुरु होतो सिलसिला दुसऱ्या…तिसऱ्या…चौथ्या अशा अनेक रात्रींचा !

मग हळूहळू तुमच्या खाजगी गोष्टींत पॉर्नची एंट्री होते ….कशी ? तर पॉर्न पाहून संबंध बनवायचे, पॉर्न मध्ये जे काही आपल्याला क्रिया दिसतात तशाच आपण करून बघायच्या अशा ज्या फँटसीज् असतात ते काही कपल्स कॉपी करायला बघतात. 

जरी तुमच्या या गोष्टी खाजगी असतील तरी त्या कायदयात बसत नाहीत..आता तावातावाने हे म्हणायला जाऊ नका की आता हिथंबी कायदाच काय…सुखानं जगू द्या की..

मित्रांनो आणि मैत्रिणींनो…जरी या तुमच्या खाजगीतल्या गोष्टी असतील तरी तितक्या सोप्या नाहीयेत. कशा ? तुम्ही पॉर्न पाहून जर संबंध बनवत आहात तर त्याला अननॅचरल सेक्स तसेच टॅबू सेक्स बोलतात. जे की कायद्याने गुन्हा आहे. पत्नीने पतीविरुद्ध शारीरिक, मानसिक छळ केल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली तर भा. दंड सं. कलम ४९८ सदराखाली पतीला अटक केली जाऊ शकते.

त्या आधी मध्य प्रदेशची एक घटना बघा…

मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये हिरा नगर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तिच्या पतीवर अननॅचरल सेक्सचा आरोप केला आहे, लग्नानंतर तिच्या नवऱ्याने परदेशी अश्लील व्हिडिओ पाहून तिच्याशी निषिद्ध सेक्स म्हणजेच अननॅचरल सेक्स करण्यास सुरुवात केली. 

बायकोने नकार देऊनही तो थांबला नाही. ती गरोदर राहिल्यानंतरही त्याने बायकोसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध सुरू ठेवले. त्यामुळे पत्नी शारीरिक व मानसिकरित्या आजारी पडू लागली. महिलेचा गर्भपात झाला होता. डॉक्टरांनी तिला बेड रेस्टचा सल्ला दिला, पण तरीही तिचा नवरा थांबला नाही. 

यानंतर महिलेने कोर्टाकडे धाव घेतली तिला २ वर्षांनी न्याय मिळाला. न्यायालयाने महिलेच्या पतीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर दरमहा पोटगी देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हि साधारण घटना नव्हतीच.. संभोग हि बाब हि नैसर्गिक आहे तर वैवाहिक संबंधात अनैसर्गिक शारीरिक संबंध असतात तरी कसे ? आणि लोकं पॉर्न बघून अननॅचरल सेक्स करायच्या भागडीतच का पडत असतील ?

आता पॉर्नहब ने घोषित केलंय कि, अमेरिका अन युनायटेड किंगडम नंतर भारतात पॉर्न साईट्स पाहण्याचा रेशो जास्त आहे. आता स्वस्तात मिळणारं मोबाईल आणि इंटरनेटमुळं लोकांना पॉर्न बघायची चटक लागली.

नावालाच ‘बॅन’ असलेले पॉर्न व्हिडीओ तुमच्या खाजगी जीवनावर कसा काय परिणाम करू शकतात ?

याची सुरुवात होते ‘कुछ नया ट्राय करते हैं’ इथपासून….

आपल्या बोरिंग लाईफमध्ये काहीतरी चेंज म्हणून…कुछ नया ट्राय करते हैं म्हणत लोकं पॉर्न बघून संबंध ठेवतात. पॉर्नमध्ये जे काही एनर्जेटिक दाखवलं जातं तेच आपण रिअलमध्ये करून बघावं म्हणून त्यात दाखवलेल्या पोझिशन्स ट्राय केल्या जातात.

फँटसीज् च्या गोष्टी पाहायला गेलं आपल्या बोरिंग चाललेल्या आयुष्यात रोज नवीन काय ट्राय करायचं त्यामुळे देखील लोकं पॉर्न ला आपला ‘खास’ गाईड मानतात. दुसरं एक म्हणजे, पॉर्न बघून उत्तेजन मिळते आणि फोरप्लेसाठी मदत होते आणि पुढच्या गोष्टी सोप्या होतात असा एक कयास लावला जातो.

पण यामुळे होतं असं की, पार्टनरसोबत लैंगिक आगळिकेचे प्रकार वाढतात, म्हणजेच पत्नीच्या मर्जीविरुद्ध पतीने संभोग करणे, गर्भारपण, मासिक पाळी या दरम्यान पत्नी नाही म्हणत असेल तरी  जबरदस्तीने संबंध ठेवणे. स्त्रीने प्रतिकार करत असेल तरीही जबरदस्तीने ओरल सेक्स करणे.

स्त्रीच्या लैंगिक अवयवांना वेदना होतील किंवा दुखापत होईल इतक्या जोराने दाब देणे, इजा करणे. पतीला गुप्तरोग/एड्स झाला असताना पत्नीशी संभोग करणे. किंव्हा हे उलटही होऊ शकतं. 

काही काही तर अशा किळसवाण्या केसेस समोर आल्यात ज्यात मुलांसमोर संभोग करण्यास भाग पाडले गेले होते. तसेच पतीने पत्नीला अश्लील साहित्य मोठ्याने वाचायला लावणे, पत्नीला संभोगावेळी चिमटे काढणे, तिच्या योनीत आगंतुक वस्तू घालणे किंवा तिला मारझोड करणे. 

हे लक्षात घ्या की, पॉर्न मध्ये आणि खऱ्या आयुष्यातल्या संबंधांमध्ये खूप खूप खूप फरक असतो. 

कुठं तरी वाचलं होतं….संभोग काय झटपट आटपायचा कार्यक्रम नसतोय तर शास्त्रीय संगीतातल्या ‘खयाल’ प्रमाणे संथगतीने सुरुवात करून टप्प्याटप्य्याने ‘द्रुत’ पर्यंत जायचं असतंय…

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.