तडप तडपके गाण्यावर रडणारा सलमान दिसतो, पण इस्माईलच्या कम्पोजिशनने थेट भन्साळींना रडवलं होतं…

मागच्या काही दिवसांपूर्वी कॅटरिना कैफ आणि हाऊ इज द जोशवाले विकी भाऊ कौशल यांच लग्न झालं पण लोकांनी लग्न राहिलं बाजूला सोशल मीडियावर सलमान खानची इतकी खिल्ली उडवली की सांगता येणार नाही. सलमान लग्नाला का आला नाही , कुठं असेल, दारू पीत बसला असल का, रडत असेल का अशी अनेक प्रकरण आणि खरा बाजार उठवला तो म्हणजे मिम्स बनवणाऱ्या पलटणने. सलमानचा फोटो लावला आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून गाणं लावलं,

तडप तडप के इस दिल से आह निकलती रही…..

ओरिजिनल मध्ये काही वर्षांपूर्वी हे गाणं इतकं गाजलं होतं की दर्दी लोकांचं अँथम सॉंग म्हणून ते प्रसिध्द झालं होतं. पण जेव्हा हे गाणं कंपोज होत होतं तेव्हा या गाण्याची चाल आणि शब्द ऐकून स्टुडिओतच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी रडू लागले होते आणि हाच तो पॉईंट होता संगीतकार इस्माईल दरबार यांच्या आयुष्यातला त्याबद्दलचा हा किस्सा.

ऐसा क्या गुन्हा किया के लूट गये…इस्माईल दरबारने कंपोज केलेल्या शब्दांनी संजय लीलाच्या हृदयाची चाळण झाली होती, इतका मोठा दिग्दर्शक ढसाढसा रडत होता.

संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांनी गुजारीश, हम दिल दे चुके सनम, देवदास असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तर तिकडे इस्माईल दरबारच्या संगीताने या चित्रपटांना चार चाँद लावले. इस्माईल दरबार सांगतात की, संजय लीला भन्साळी यांची संगीतातली टेस्ट खूप चांगली आहे. त्याचवेळी संगीताबाबतही त्यांचे कान चांगलेच आहेत.

संजय लीला भन्साळी यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा ‘राम लीला’, प्रियांका चोप्रा, दीपिका-रणवीरचा ‘बाजीराव मस्तानी’ आणि शाहिद कपूर, दीपिका आणि रणवीरचा ‘पद्मावत’ संजय लीला भन्साळी यांनी बनवले. पण त्यात इस्माईलचं संगीत कुठेतरी हरवत होतं.

संजय आणि इस्माईलने 2002 मध्ये आलेल्या देवदास चित्रपटापासून एकत्र काम का केले नाही ? इतका भारी संगीतकार अचानक कुठं गायब झाला ?

इस्माईल दरबार सांगतात की संजय लीला भन्साळी यांना संगीताचे भरपूर ज्ञान आहे, ते जगभरातील संगीत ऐकतात. मी एक संगीतकार आहे, मी व्हायोलिन वाजवतो. मी आयुष्यभर हेचं काम केले आहे. माझे कुटुंबही तेच करत आले आहे. मी त्यांच्याइतके संगीत ऐकले नाही. ते पंचमदा, शुद्ध शास्त्रीय, ऑपेरा, विविध प्रकारचे संगीत ऐकतात. ते संगीत फक्त ऐकत नाही तर समजतात. भन्साळी माझ्याबरोबर त्या संगीताबद्दल चर्चा करायचे आणि हळू हळू त्यात इनवोल्व्ह होत जायचे. संजयला संगीताची उत्तम जाण आहे. चित्रपटासाठी, अनेक संगीतकार त्यांचे संगीत विकण्यासाठी एक ते एक युक्त्या वापरतात. पण मी संजयसोबत असे कधीच केले नाही.

इस्माईल दरबारचे संघर्षाचे दिवस खूप कठीण होते. तो रोज ऑडिशनला जायचा आणि त्याची उत्तम गाणी सगळ्यांना सांगायचा. पण त्या गाण्याला कुणी फारसं महत्त्व द्यायचं नाही. पण आज त्याचं गाणं हम दिल दे चुके सनमचं टायटल ट्रॅक आहे. हे गाणे आधी कोणालाच समजले नव्हते. लोक म्हणायचे की हे गाणे खूप हळू आहे. म्हणजे हे गाणं चालणार नाही अशी लोकं मस्करी करायचे.

एके दिवशी योगायोगाने इस्माईल दरबारची संजय भन्साळी सोबत भेट झाली. नेहमीप्रमाणे त्याने भन्साळी यांना तडप तडप हे गाणं म्हणून दाखवायला सुरवात केली. त्यांना जे ऐकायचं होतं तेही ऐकलं. त्यावेळी त्यांनी इस्माईल दरबारकडून ते गाणे ३ वेळा ऐकले. इस्माईल दरबार यांना भन्साळी हे पहिले व्यक्ती भेटले होते की ज्यांना ते गाणं प्रचंड आवडलं.

एक वेळ अशी आली होती की इस्माईल दरबार यांना संगीत बनवण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेता यायचा नाही आणि अजूनही इस्माईल दरबार याना हे सांगणे दुखावुन जाते की कोणत्याही चित्रपट निर्मात्याला त्यांचं संगीत समजले नाही. त्यांचं संगीत बनवण्याचं काम आनंद देण्याचे थांबले होते. संजयने दरबार यांच्यापासून कधीच काही लपवले नाही. ‘हम दिल दे चुके सनम’मधून दोघांचा प्रवास सुरू झाला.

दोघांमध्ये नंतर बरेच खटके उडले पण संजय भन्साळी यांनी इस्माईल दरबार यांना कधीच सोडले नाही. हार मानली नाही. त्यांनी नेहमीच प्रेम आणि आदर दिला. इस्माईल दरबार यांनीही कधीही भन्साळी यांचा अपमान केला नाही. काय योग्य आणि काय नाही याचा नेहमी योग्य अभिप्राय दिला. एक वेळ अशी आली की दोघांमध्ये मोठा संघर्ष झाला. मग दोघे 4-6 महिने बोलले नाही. त्यानंतर पुन्हा ते नॉर्मल झाले. संजय लीला भन्साळी यांनी तडप तडप ऐकलं आणि इस्माईल दरबार यांच्यासोबत चांगले सिनेमे बनवले.

केके ने गायलेलं आणि मेहबूब यांनी लिहिलेलं गाणं इस्माईल दरबार यांनी ज्या प्रकारे कंपोज केलं त्याला तोड नाही पण बऱ्याच जणांना या गाण्यावर रडणारा सलमान खान दिसतो पण इस्माईलच्या कम्पोजिशनने भन्साळी यांना रडवलं होतं.

हे ही वाच भिडू :

Webtitle :Tadap tadap ke iss dil se song made Ismail Darbar emotional

Leave A Reply

Your email address will not be published.