तैमुरच्या आयाचा पगार पावणेदोन लाख आहे ! त्याहून भारी हा लेख आहे. 

तैमुर आणि तैमुरच्या बातम्या. आत्ता तुम्ही म्हणाल बोलभिडूवाले पण फाफलले. ते देखील तैमुरच्या बातम्या प्रसिद्ध करायला लागले. खर सांगायचं तर नॅशनल बालकाच्या बाबतीत आम्हा बोलभिडूवाल्यांना कधीच बातमीमुल्य वाटलं नाही. पण सक्काळ सक्काळ आम्हाला इंटरनेटच्या खजिन्यात एक बातमी सापडली. तैमुर हे नाव वाचून आम्ही ती नेहमीप्रमाणे आकाशात उडवण्याचा प्रयत्न करतच होतो, पण बातमीत काहीतरी वेगळ असल्याची जाणिव क्षणभर झाली. 

सो, आम्ही चक्क तैमुरची बातमी वाचली आणि त्यात एक धक्कादायक खुलासा दिसला. खुलासा असा होता की तैमुरचा जी आया आहे. तीचा पगार पाच दहा हजार नाही तर चक्क पावणेदोन लाख आहे !!! 

काय.. काय… काय.. पावणे दोन लाख.. 

१,७५,००० रुपये फक्त प्रती महिना. म्हणजे २१ लाखांच पॅकेज… 

च्या गावात बाराच्या भावात २१ लाखाच पॅकेज ते पण पोराला संभाळायच. बर आत्ता पुढची धक्कादायक बातमी म्हणजे त्यांना खास कार आहे. त्यांच्या खाजगी वापरासाठी. या गोष्टी आम्ही शेजारी बसलेल्या बोलभिडू कार्यकर्त्याला सांगितल्या तेव्हा तो म्हणाला, ह्या माझा पगार कधी वाढवताय ! 

त्यानंतर डोक्यात आलं की हा पैसा पोरगं संभाळायला दिला जात असेल तर इतक काय विशेष असेल तैमुरच्या. बर लोक#त्ता वाले दिवसरात्र बातम्या देतात म्हणून तैमुर काय वेगळं करणं शक्य नाही. तो देखील आपल्या गल्लीतल्या लहान पोरांसारखं दोन टाईमचं खात असेल.. बाकी दोन टाईमच कामकाज पण होत असेल. बर तैमुर आहे म्हणून न्यूज व्हॅल्यू टिकवायची झाली तर लयत लय चार टाईम जोर लावत असेल त्यापेक्षा अस काय विशेष आहे. 

आत्ता तैमुर राष्ट्रीय बालक आहे यात दुमत असण्याच कारण नाही. तैमुरच्या अगोदर ऐश्वर्या गरोदर होती तेव्हा पण असच झालेलं. अभिषेकच्या आधी मिडीयावाचकांना ऐश्वर्याचा महिना समजून जायचा. त्यानंतर ऐश्वर्याला मुलगी झाली. ती काही दिवस प्रकाशझोतात राहिली पण शेवटी ती पोरगीच नं. तिच्या वाट्याचा टिआरपी गेला. 

त्यानंतर खूप खूप वर्षांनी तैंमुर आला. जसा तैमुर लंग भारतात आला होता तसाच. तैमुरलंगने हजारों लोकांची कत्तल करत धुरळा उडवला होता. या तैमुरने मिडीयाचा धुरळा उडवला. पत्रकारतेची पदवी घेवून लोकशाही आणु पाहणाऱ्या क्रांन्तीकारी पत्रकारांना या तैमुरने मनोरंजनाचा मार्ग दाखवला. खरतर या बातम्यांची सुरवात झालीच ती बारश्यापासून. तैमुरच्या आत्यानं ज्या क्षणी बाळाचं नावं तैमुर कुर्रर्रर्र केलं त्या क्षणी मिडायातून वाद विवाद उभा राहिले. लोकांना तैमुर लंग आठवला. मग इतिहास तज्ञांनी माहितीत भर घातली. सोहा अली खानला काय वाटलं असेल ते कोणास माहिती पण हाच तो क्षण होता जेव्हा तैमुरने राष्ट्रीय बालक होण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. 

त्यानंतर तैमुरचा प्रत्येक क्षण मिडीया टिपत गेली. देशात तसही विशेष काही घडत नसेल तेव्हा तैमुर पत्रकारांच्या मदतीला हक्काने धावून यायचा. अशा वेळी खुद्द संपादक तैमुरला कडेवर घेवून नाचतायत असं चित्र क्षणभर का होईना डोळ्यासमोर नवपत्रकार म्हणून तराळून जायचं. 

असो तैमुरच्या संबधातली एक बातमी अशीही होती की तैमुर चल रहैं हैं उनकें दादाजी की चालं ! इतक्या लहान मुलात कोणत्या पत्रकाराला टायगर पतौडीची चाल दिसली कुणास ठावूक. 

खरतर तैमुर आमच्यासाठी तरी हो किमान आमच्यासाठी तरी गल्लीतल्या लहान पोरासारखाच होता. आम्ही त्याची बातमी करत नव्हतो की त्यात आम्हाला कोणतच बातमीमुल्य दिसत नव्हतं. पण आज सक्काळ सक्काळी आमचे डोळे उघडले. आम्हाला दिसलं. तिच्या आयला पावणेदोन लाख पगार आहे. २१ लाखाचं पॅकेज आहे. तेव्हा क्षणभर कशाला पत्रकार झालो याचं दुखं दाटून आलं देखील पण आम्ही ते हवेत झिडकारलं आणि संपादकांच्या विरोधात तैमुरवर लेख लिहायला बसलो. 

आज आम्हाला देखील समजलं. तैमुरनं २१ लाखाचं पॅकेज देवून जन्मताच एका व्यक्तींच भलं केलय.

सामान्य माणसांचे प्रश्न वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.