ताजमहल लपवण्यात आला होता, ते पण एकदा नाही अनेकदा !

“एक शहेनशाहने बनवाके ये हसीन ताजमहल सारे दुनिया को मोहब्बत की निशाणी दी है”

१६३२ साली शहाजहानने आपल्या बायकोच्या स्मरणार्थ ताजमहल बनवला आणि काळाच्या ओघात तो जगभरातल्या प्रेम करणाऱ्यांचं प्रेमाचं प्रतिक बनला.

यमुनेच्या तीरावर उभारलेली ही शुभ्र संगमरवरातली वास्तू स्थापत्यशैलीचं अद्वितीय उदाहरण आहे. सात आश्चर्यांपैकी एक असा हा ताजमहल जगासाठी अमुल्य ठेवा आहे. युनेस्को ने १९८३ साली ताजमहलला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक जगाच्या कानाकोपऱ्यातून त्याला भेट देण्यासाठी येतात.

जगातल्या सात आश्चर्यांमध्ये ताजमहलचं नाव अभिमानाने घेतलं जातं, साहजिक अशा ऐतिहासिक वारशाचं जतन करणं हि शासनाची प्रमुख जबाबदारी असते. युद्ध, दंगल, देशांतर्गत उठाव अस काहीही झालं तर महत्वाच्या स्थळांचा बंदोबस्त वाढवला जातो. त्यातही दुसऱ्या देशांसोबत झालेल्या युद्धाच्या काळात अशा ठिकाणची विशेष काळजी घेण्यात येते.  अशा वेळी नेमकं “ताजमहाल” लपण्यासाठी काय केलं जातं ते पहायलाच हवं.

ताजमहलला लपवण्याची पहिली वेळ १९४२ साली आली होती. तेही दुसऱ्या महायुद्धा दरम्यान.

खरं तर दुसरे महायुद्ध हे इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांचे जर्मनी इटली जपान या अक्ष राष्ट्रांदरम्यान होते. तसा आपला भारताचा सरळ या युद्धाशी काहीही संबंध नव्हता. मात्र आपण ब्रिटीश साम्राज्याला अंकित असल्याने त्यांच्या शत्रूंची आपल्या देशावर सुद्धा वक्र दृष्टी पडली यात नवल नाही. देशाची सगळी संरक्षण सिद्धता झाली. पण तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आले की, ताजमहलच्या संरक्षणाच काय? ताजमहल तसा सीमारेषे पासून दूर असल्यामुळे तसा त्याला धोका नव्हता पण हवाई हल्ल्याची भीती होतीच.

दुसऱ्या महायुद्धात हवाई दलाचा वापर खूप परिणामकारकरित्या करण्यात येत होता. ताजमहाल ला जपानी विमानापासून धोका होता. पौर्णिमेला चंद्रप्रकाशातही चमकणारा ताजमहाल दिवसा तर चाळीस किलोमीटर पर्यंत तो चमकतो असे सांगितले जाते. यामुळे ताजमहाल विमानांना सापडणे तर सहज शक्य आहेच शिवाय ताजमहलवरून त्याच्या जवळपास असणाऱ्या इतर महत्वाच्या ठिकाणांचा अंदाज घेणे सोपे होते. त्या काळात GPS आणि सॅटेलाईट नसल्याने अशा जगप्रसिद्ध वास्तूंचा वापर स्थाननिश्चिती करण्यासाठी केला जायचा. ब्रिटीश सरकारने ताजमहल ला लपवायचे ठरवले.

एवढा मोठा ताजमहाल लपवला तरी कसा ?

शुभ्र झळाळता ताजमहल लपवणे ही खूप अवघड गोष्ट होती. ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या पुढचा प्रश्न अखेरीस स्थानिक लोकांनी मिटवला. ताजमहलच्या भोवती बांबूची मचाण बांधण्यात आलं. सभोवताली बांबूची रास रचण्यात आली. अनेक दिवस हे काम चालू होते. ताजमहलला धक्का न लावता अत्यंत कौशल्याने त्याला लपवण्यात आले. हे काम सुरु असताना काही फोटोग्राफ सुद्धा काढण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यावर फोटो काढण्यास मनाई करण्यात आली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ताजमहाल भूमिगत होता.

2 1438163270 350x163 1
ताजमहल लपवण्यासाठी बांबूचा मचाण बांधणारे कामगार आणि इंग्रज अधिकारी

भारत पाकिस्तान यांच्यातील प्रमुख युद्ध १९६५ आणि १९७१ मध्ये सुद्धा ताजमहल लपवण्यात आला होता.

अनेक पाकिस्तानी ताजमहलला मुघलांनी बांधला असल्यामुळे पाकिस्तानी वारसा मानतात.  ताजमहल फाळणी नंतर पाकिस्तानला नेऊ न शकण्याचे वैषम्य पाकिस्तानच्या मनात असते. यामुळे असूयेपोटी पाकिस्तान कडून ताजला धक्का पोहचवला जाऊ नये म्हणून ताजमहल लपवण्यात आला. यावेळी मात्र बांबूच मचाण उभारण्याएवढा वेळ नसल्याने ताजमहल वर हिरवे कापड अच्छाद्न्यात आले. ताजमहल सभोवताली असण्याऱ्या हिरवळीमुळे ताजमहल सहजच लपून गेला. आग्र्यामधल्या अनेक शिंप्यानी खपून लांबच्या लांब असणारे हे कापड बनवले होते. शिवाय झाडांची पाने, गवत इत्यादी त्याच्यावर पसरवून पाकिस्तानी विमानांची दिशाभूल करण्यात आली होती.

dlh29Le

२००१ साली देखील ताजमहल लपवण्यात आला होता.

११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतीवर अल कायदाच्या अतिरेक्यांनी विमानाने हल्ला केला. अमेरिकेचे सैनिकी मुख्यालय पेंटागोन वर सुद्धा असाच हल्ला करण्यात आला. सुमारे ३००० लोक या घटनेत मृत्यूमुखी पडले. अमेरिकी अध्यक्षांचे निवास्थान व्हाईट हाउसवर सुद्धा हल्ला करायचा अतिरेक्यांचा हेतू होता मात्र तो निष्फळ ठरला.

जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला होता. जगभर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. अतिरेक्यांच्या हिटलिस्ट वर असण्याची शक्यता बघून अर्किओलोजिकल सर्वेच्या सहायाने भारत सरकारने ताजमहल कापडाने लपवला.

Leave A Reply

Your email address will not be published.