वर्षभराचा हिशोब चुकता करायचा आहे? Takanakuy सण आहे ना

Takanakuy.

घाबरू नको भिडू. पहिल्यांदा हा शब्द वाचल्यावर मला पण काही कळलं नव्हतं. मग काय all Indians are brothers या नात्याने सुंदर भाऊच गूगल सर्च केलं आणि या Takanakuy शब्दाचा अर्थ पाहून सुखद धक्का बसला.

तर basically काय हाय, Takanakuy हा एक प्रकारचा सण हाय, तो पण पेरू या देशात,आणि साधा सुधा नाही बर का, तर चांगला हाणामारीचा सण हाय.

takanakuy चा अर्थच मुळी “एकमेकांना दणके द्या” असा होतो.

दर वर्षी २५ डिसेंबरला जेव्हा अख्खं जग ख्रिसमस साजरा करत असत, सांताक्लॉज लहान मुलांना गिफ्ट वाटत हिंडत असतो. तेव्हा पेरू देशातल्या Chumbivilcas ह्या प्रांताच्या राजधानीत म्हणजे Santo Tomas या गावातले लोक आपल्या पारंपारिक रंगेबेरंगी वेशात हा मारामारीचा सण साजरा करण्यासाठी एका मैदानात जमतात.

120313111938 takanakuy festival dedicated to fighting story top

वर्षभरात ज्याचा ज्याचा आपल्याला राग आलाय किंवा ज्याच्या ज्याच्या बरोबर आपली खुन्नस झालेली आहे अशांना मारामारी करायला त्याच नाव घेऊन खुल्ला चॅलेंज द्यायचं,आणि समोरच्याने पण जर आपल चॅलेंज स्विकारलं तर दोघांनी मैदानाच्या बरोबर मध्ये यायचं, आणि मग काय? दोघांची तुंबळ मारामारी.. मध्ये कोण अडवायला येणार न्हाई काय न्हाई..

याला काही नियम ही आहेत.

म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांशी आणि पुरुषांनी पुरुषांशी लढायचं असत. नाही तर लगेच जाल पोरींना लढाईचं आव्हान द्यायला. आणि हां मारामारी ही कुठल्याही शस्त्रा विना करायची असते. चावणं, ओरबाडणं, एकमेकांचे केस ओढणं यापैकी काहीही करायचं नसतं. दोघांपैकी एकटा ज्यावेळी स्वतःहून हार मानेल त्याचवेळी फाईट थांबविली जाते.

16323879856 22b9c4084f b

फाईट संपली की लढणारे एकमेकांना मिठी मारून आपला वाद, भांडण जे असेल ते तिथच संपवतात आणि मारामारीमधल्या वेदना हलक्या करण्यासाठी जवळच्या बारकडे आपला मोर्चा वळवतात. हो शास्त्रच असत ते.

1999 मध्ये Hollywood मध्ये फाईट क्लब नावाचा एक सिनेमा येऊन गेला.

त्यातही अगदी हीच कन्सेप्ट होती.. एकमेकांबद्दल जो काय राग आहे,असूया आहे, खुन्नस आहे ती मनात न ठेवता, तो राग बाहेर येईल अशी तजवीज करण्याचे प्लॅटफॉर्म म्हणजे फाईट क्लब.Bollywood वाल्यांनी त्या फाईट क्लब चा remake खास आपल्या साजेश्या शैलीत काढून त्याची वाट लावली हा भाग निराळा.

हा Takanakuy नावाचा सण दिसायला जरी हिंसक वाटत असला तरी त्या मागचा मतितार्थ किती छान आहे हे आपल्याला या सणाचे स्वरुप पाहून लक्षात येईल.

हा सण साजरा करण्या मागची पेरू वाशीयांची भावनाच मुळी ही की वर्षभरात कुणाबद्दल ही जो काही राग साठला आहे तो अशा पद्धतीने one on one, समोरासमोर मारामारी करून बाहेर काढायचा आणि एकदा का फाईट झाली की कोणीही जिंकू दे अथवा हरू दे, मारामारी करणार्‍या दोघांनीही एकमेकांना हातात हात देत, मागचे सगळे हेवेदावे विसरून, हसत खेळत नव्या वर्षात नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने पदार्पण करायचं..

मग काय म्हणतोय भिडू.. जायच काय पेरू ला.. काय इथेच कुठे अरेंज करूया.. भिडू क्लब??

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.