रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान व्हायरल होणारा ‘तो’ फोटो एकदा नीट बघून घ्या भिडू…

सगळ्या जगभरात सध्या रशिया युक्रेनच्या युध्दामुळं  खळबळ उडालीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यांनतर  युक्रेनमध्ये होणाऱ्या बॉम्बहल्ल्याने दहशतीचं  वातावरण पसरलंय.

यात नागरिक आणि सैनिकांचा जीव सुद्धा गेलाय. या भयानक परिस्थतीत लाखो लोक उपाशी तापाशी आपला जीव वाचवण्यासाठी भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशन आणि अंडरग्राउंड शेल्टरमध्ये थांबलेत.

अशात सोशल मीडियावर युक्रेनमधली भयानक परिस्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ज्यात कश्याप्रकारे रशियाची लढाऊ विमान युक्रेनच्या  शहरांवर घिरट्या घालतायेत, कश्याप्रकारे बॉम्बहल्ले होतायेत, लोकांचे आणि सैनिकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेत, रशियाचे रणगाडे तिथल्या गाडयांना चिरडून जातायेत, लोकांचे लपून बसलेले फोटो अशा सगळ्याच गोष्टी बघून आपल्या मनात सुद्धा भीतीच वातावरण पसरलयं.

पण याच परिस्थितीत एक व्हायरल होणारा फोटो चर्चचा विषय बनलाय. जो बघून या युद्धाच्या  परिस्थितीत निगेटिव्ह झालेल्या वातावरणात अजूनही माणुसकी बाकी असल्याचं बोललं जातंय. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि लोक पॉझिटिव्ह गोष्ट म्ह्णून त्याला फॉरवर्ड सुद्धा करतायेत.

तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक गाडी  दिसतीये, ज्यावर लिहिलंय ‘guru nanka’s  langar… good by hunger’ अर्थात या गाडीवर लंगर लागलाय.  काही शीख मंडळी तिथल्या लोकांना भरपेट जेवण देतायेत. आसपास बरीचशी गर्दी सुद्धा पहायला मिळतिये. या फोटोसोबत म्हंटल जातंय कि, युक्रेनच्या लोकांना शीख समुदायाकडून लंगरची सोय करण्यात आलीये.

आता भिडू सोशल मीडियावर दिवसभरात कित्येक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण त्यातले किती खरे आणि किती खोटे हे बघणं आपलं काम असत. पण कधी कधी भावनेच्या भरात आपण फॅक्ट चेक न करता ते फोटो आणि व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करतात, आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. अशाचं फॉरवर्ड केलेल्या रूटने हा लंगरचा फोटो भिडूला आला. आणि भिडूची खासियत म्हणजे आपण कुठलीही गोष्ट फॅक्ट चेक केल्याशिवाय मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत नाही.

असच जेव्हा हा फोटो आला लगेच फॅक्ट चेक करून पाहिलं, तर समजलं कि,तसा हा लंगरचा फोटो खरा आहे, पण तो युक्रेनचा नाही. तर  कॅनडाचा आहे. शीख सेवा सोसायची तर्फे २०१६ साली कॅनडामध्ये  या पहिल्या मोफत मिळणाऱ्या लंगर ट्रकची सुरुवात करण्यात आली होती. जिथे कुठल्याही जाती धर्माचा आणि देशाचा विचार न करता मोफत जेवणाची सोय करण्यात आलेली.

पण आता पुन्हा हा फोटो व्हरायल होतोय आणि तो युक्रेनमध्ये असल्याचा म्हंटल जातंय. पण लंगरचा फोटो युक्रेनचा नसून कॅनडाचा आहे.  त्यामुळे तुमच्याजवळ जर फोटो आला तर त्याला लगेच रिप्लाय करा. आणि इथून पुढे फॅक्ट केल्याशिवाय कुठलाही मेसेज फॉरवर्ड करू नका म्हणजे झालं.

आता फॅक्ट चेक करण्याचा उपदेश तर दिलाय, पण  भिडू या  युद्धाच्या परिस्थितीतली एक पॉझिटिव्ह आणि खरी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते. जस कि, आपल्याला सगळ्यांना माहितेय युक्रेनमध्ये आपले अनेक भारतीय सुद्धा अडकलेत. ज्यांना कित्येक प्रयत्नानंतर अखेर भारतात सुखरूप आणण्यासाठी हालचाली फास्ट केल्यात. त्यांच्यासाठी भारतातून विमान पाठवली गेलीत. 

अशात भारतीयांना रेल्वे मार्गाने युक्रेनमधून बाहेर पोलंड आणि हंगेरीच्या बॉर्डरवर पाठवण्यात आलंय आणि लवकरच भारतीय सुखरूप आपल्या घरी पोहोचतील असं बोललं जातंय. अशात कित्येक दिवस जीव वाचवण्यासाठी धपडणाऱ्या भारतीयांसाठी हरदीप सिंह नावाच्या व्यक्तीनं लंगर चालवलं.

रेल्वेमधल्या या लंगरचे आणि हरदीप सिंहचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ज्यात तो आणि त्याचे काही मित्र रेल्वेतल्या प्रवाश्याना लंगर वाटतायेत. यात भारतीयांबरोबर काही परदेशी प्रवासी सुद्धा आहेत. हरदीप आणि त्याच्या मित्रांचं जगभरात कौतुक केलं जातंय. आणि भिडू हा व्हिडिओ १०१ टक्के खरा आहे. त्यामुळे या गोष्टीच कौतुक आपल्याला सुद्धा आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.