तालिबान येण्याच्या खूप आधी साठच्या दशकात अफगाणिस्तान असा होता..

आज अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राजधानी काबूलमधून पळाले आणि संपूर्ण देश तालिबान्यांच्या हाती पडला. तब्बल २०  संघर्षानंतर अफगाणिस्तानवर पुन्हा कट्टरपंथीय तालिबानची सत्ता आली. मागच्या वेळचा त्यांचा अनुभव पाहता तालिबान पुन्हा शरिया वगैरे मध्ययुगीन कायद्यांच्या नुसार देश चालवण्याच्या शक्यता आहे.

खरं पाहायला गेलं तर अफगाणिस्तान हा हजारो वर्षांची परंपरा असलेला एक समृद्ध देश. आशियाच्या हृदयस्थानी असलेल्या या देशातून अनेक व्यापारी मार्ग जातात. भारतात उतरायचं झालं तरी परकीय आक्रमक अफगाण मार्गेच आले. कित्येक राज्यकर्ते आले आणि त्यांनी तलवारीच्या टोकावर या देशावर राज्य केलं.

रक्तरंजित इतिहास हा जगण्याचा भाग असलेले अफगाण लोक सत्तरच्या दशकात लोकशाही स्वीकारण्याचा प्रयत्न करत होते. जवळपास वीस वर्षे हा देश आधुनिक जगाच्या स्पीडला पकडण्याचा प्रयत्न करत होता. पण शीत युद्धाचा परिणाम म्हणून सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानला ताब्यात घेतलं. आणि त्यांचा दुःखद कालखंड सुरु झाला.

रशियाला हरवण्यासाठी अमेरिकेने तालिबानला मोठं केलं. आणि आज आपण पाहतो ती अफगाणिस्तानची अवस्था आहे.  १९९६ ते २००१ या त्यांच्या राजवटीमध्ये तालिबान्यांनी देशाला मध्ययुगात नेऊन सोडलं. महिलांचं शिक्षण बंद केलं. त्यांना बुरख्याशिवाय फिरण्यास बंदी केली. छोट्या छोट्या चुकांसाठी अत्यंत क्रूर अशा शिक्षा दिल्या गेल्या.

अफगाणिस्तान आता पुन्हा त्याच काळ्या कालखंडात प्रवेश करत आहे. पण तालिबानपूर्वी हा देश कसा होता याची झलक पाहणारे काही फोटो आपण पाहू.

 

१) अफगाण तरुणी स्कर्ट देखील तितक्याच आत्मविश्वासाने वापरत होत्या. 

Afghanistan Fashion

 

२)आपल्या मागण्यांसाठी शांतता पूर्ण मार्गाने आंदोलन करणारे अफगाण नागरिक

Men Protest

३)१९६२ साली काबूलमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या मुली आपल्या प्राध्यापिकेकडून शंका समजावून घेताना

main 1200 min

४)अफगाणिस्तानमधला सत्तरच्या दशकात उभारलेला ट्र्क बनवण्याचा कारखाना   

original

५)मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी विद्यापीठात शिक्षण घेत होत्या

afghanistan 1960 bill podlich photography 109 880 min६)व्होग मासिकाने देखील मुलखात घेतलेली सुप्रसिद्ध अफगाण फॅशन डिझाईनर सोफिया तारझी

Fashion designer Safia Tarzi in her Kabul studio 19692७)सत्तरच्या दशकातली एक अफगाण मॉडेल
aHR0cCUzQSUyRiUyRnN0YXRpYy5tZXNzeW5lc3N5Y2hpYy5jb20lMkZ3cC1jb250ZW50JTJGdXBsb2FkcyUyRjIwMTUlMkYxMiUyRnRhcnppMS05MzB4MTQwMC5qcGc 1

८)तालिबानने नष्ट करण्यापूर्वी बामियान येथील बुद्धाची विशाल अशी मूर्ती

Bamiyan Buddhas Burnes

९)सत्तरच्या दशकातली अफगाणिस्तानमधली शाळा. या शाळेत शिक्षिका हार्मोनियमवर गाणी वाजवत आहेत.

School In 1960s Afghanistan

१०)काबुल येथे पन्नासच्या दशकात उभारण्यात आलेलं काबुल टाइम्स या वृत्तपत्राच ऑफिस

original

११)१९७८ साली तर अफगाणिस्तानमधील लोकशाही सरकारने लहान मुलींना बुरखा वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

1970s afghanistan 1

आणि आज तालिबान आल्या नंतर

यहां रेप से बचाने के लिए बेटी को सुटकेस में बंद रखती है मां, नर्क से भी बदतर है महिला की जिंदगी life of women in afganistan is worst than hell small

२०१० साली टाइम मासिकावर झळकलेले आयेशा, हिच्या नवऱ्याने तिचे नाक कापले होते.

Afghan Man Cuts Off Wife's Nose, Lips

Leave A Reply

Your email address will not be published.