तालिबानला आता महिलांच्या अंघोळीवरून पण प्रॉब्लेम आहे

जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली तसं महिलांवरील बंधनांची यादी लांबच लांब वाढत चालली आहे. 

२०२१ च्या ऑगस्ट महिन्यापासून अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे…या तालिबान्यांचा इतिहास त्यांचे जाचकी कायदे इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास जवळपास सर्वानाच आहे कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण त्याशी संबंधित बातम्या वाचतच आलो आहोत. गेल्या पाच महिन्यांत ते अफगाणिस्तानात एक एक करून हे कायदे लागू करत आहेत.

हे तर स्पष्ट आहे कि, तालिबान इस्लामिक कायद्यांचे पालन करतात..आणि ते कायदे अधिकतर महिलांना बंधनात ठेवण्यासाठीच बनवले गेलेत असं वाटायला लागतं…वाटतं काय स्पष्टच आहे. आधीच तालिबानने   महिलांच्या नोकऱ्या आणि मुलींना शाळेत जाण्यावर बंदी आणली होती.

असो आत्ताची बातमी बघायला गेलं तर तालिबानने अजबच फर्मान काढलं आहे. महिलांनी सार्वजनिक स्नानगृह म्हणजेच हमाम वापरायचं नाही, असा आदेश तालिबानने दिला आहे. 

हे फर्मान आणलंय ते म्हणजे Promotion of virtue and prevention of vice म्हणजेच सद्गुणांना प्रोत्साहन आणि दुर्गुणांना प्रतिबंध करणार्‍या मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे, हे मंत्रालय म्हणजे तालिबान राजवटीत नैतिकतेचा प्रचार आणि तालिबानचे गैरवर्तन निर्मूलन करण्याची जबाबदारी पेलते.  तालिबान सत्तेवर येताच याच मंत्रालयाने महिला मंत्रालय बंद केले होते, आणि त्याजागी नीतिशास्त्र प्रचार आणि गैरवर्तन निर्मूलन मंत्रालय स्थापन केले. 

द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, मंत्रालयाने म्हटले आहे की, बाल्ख आणि हेरात प्रांतातील हमाममध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई असणार आहे. अफगाण महिलांना आता घरातील बाथरूममध्ये आंघोळ करावी लागणार असून यादरम्यान त्यांना हिजाबही घालावा लागणार आहे. हेरातमधील स्थानिक अधिकार्‍यांनी आधीच महिलांची कॉमन स्नानगृहे तात्पुरती बंद केली होती. त्यानंतर आता त्याबाबतचा अधिकृत आदेशच आला आहे.

उत्तर अफगाणिस्तानातील महिलांना यापुढे सांप्रदायिक स्नानगृहे वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा केली गेली आहे. 

तालिबानच्या याच राजवटीत नाही तर मागील १९९६- २००१ च्या राजवटीतही महिलांना सार्वजनिक हमाम वापरण्यास मनाई होती. अमेरिकन सैन्यांच्या काळात हे  तालिबानने बंद पाडलेले अनेक जुने स्नानगृह पुन्हा बांधून सुरु केले.

पण हे हमाम म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, हमाम म्हणजे स्टीम बाथ किंव्हा गरम पाण्याचे स्नान….जे कि सार्वजनिक बाथरूममध्ये जिथे लोकं येतात आणि गरम पाण्याने आंघोळ करतात. 

या हमामचा इतिहास पाहायला गेलं तर अशी माहिती मिळते कि, हे हमामचा इतिहास रोमन आणि बायझंटाईन साम्राज्यांइतकाच जुना आहे. प्राचीन मध्य पूर्व संस्कृतीत, हम्माम हे प्रार्थनेच्या तयारीचे ठिकाण मानले जात असायचे. १४०० च्या शेवटी शेवटी, हमाम खूप लोकप्रिय झाले आणि मशिदी आणि मदिनाशेजारी बांधले गेले. प्रार्थनेपूर्वी आणि रोजचा ताण दूर करण्यासाठी लोक इथे येऊ लागले.

अफगाणिस्तानला भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर लक्षात येत कि, या देशात थंडी आहे. तेथे अनेक कुटुंबांसाठी गरम पाण्याचा एकमेव स्त्रोत हमाम असतो…महिलांसाठी देखील तितकाच महत्वाचा हा हमाम आता मात्र बंद करण्यात आले आहेत. इस्लामिक कायद्यानुसार वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी महिला या सामान्य स्नानगृहांचा वापर करत असतात.

काही बातम्यांनुसार, नैतिकता आणि गैरव्यवहार निर्मूलन मंत्रालयाच्या प्रमुखांचं असं म्हणणं आहे कि,  उलेमांसोबत चर्चा केल्यानंतर हा हमाम बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की लहान मुलांना देखील सार्वजनिक स्नानगृहात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय बॉडी मसाजवरही बंधने घालण्यात आली आहेत.

हे हमाम कसं असतं हे थोडक्यात क्लीअर व्हावं म्हणून तुम्ही झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या पिक्चरमध्ये एक सिन दाखवला आहे. ज्यामध्ये शेफाली शाह आणि प्रियांका चोप्रा हम्मामचा उल्लेख करतात हा सीन आठवला तर हमाम्स कसे असतात हे समजते.

असो, मागे २७ डिसेंबर २०२१ रोजी याच मंत्रालयाने सूचना जारी केल्या होत्या की, अफगाणिस्तानातील महिला ७२ किलोमीटर पर्यटनाचा एकट्याने प्रवास करू शकत नाहीत. जर का त्यांच्यासोबत कोणीही पुरुष नातेवाईक नसेल, तर त्या प्रवास करू शकत नाहीत. यासोबतच या मंत्रालयाने प्रवासादरम्यान बस किंवा ट्रेनमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरही बंदी घातली आहे…

हे सगळं एक वेळेस जाचक बंधनं म्हणून समजतं तरी पण या तालिबानला आता महिलांच्या अंघोळीवरून पण प्रॉब्लेम आहे हे म्हणजे जरा अतीच झालं आहे.   

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.