तामिळनाडूत ३ दशकांपासून थरकाप उडवणारं हत्याकांड अजूनही सुरूच आहे….

१९९० साली सुरु झालेला तामिळनाडूतील हत्याकांड काळ अजूनही शमलेला नाही. ३ दशकांपासून हे हत्याकांड सुरु असून बऱ्याच लोकांचा यात बळी गेला आहे तर जाणून घेऊया यात नक्की काय घडलं होतं.

दक्षिण तामिळनाडूच्या तुतिकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदूर क्षेत्रात पन्नईयारी लोकांचा वट आहे. पन्नईयार या तामिळ शब्दाचा अर्थ होतो जमीनदार. ब्रिटिशकाळात स्थानिक लोकांना जमिनीचा काही भाग शेती करण्यासाठी नेमून देण्यात आला होता. जमिनीवर वर्चस्व गाजवणाऱ्या त्या काळात मागासवर्गीय लोकांमध्ये पशुपती पांडियन नावाचा युवक वेगाने वर येऊ लागला होता. 

मागासवर्गीय आणि भूमिहीन लोकांचा मसीहा असलेल्या पशुपती पांडियनने जमिनीच्या वादातून सुभाष नावाच्या युवकाच्या बाबा शिवासुब्रामणियम पन्नईयार आणि नंतर १९९३ मध्ये वडील अशुपति पन्नईयार यांच्या हत्या घडवून आणल्या. सुभाष त्यावेळी कॉलेजात शिक्षण घेत होता. इथून खरी ठिणगी पडली. सुभाषने आपल्या चुलत भावाला व्यंकटेशला सोबत घेऊन पन्नईयार नावाची गॅंग बनवली. आता पांडियन आणि पन्नईयार अशा दोन गटात इथून गॅंगवॉर सुरु झाला.

हे दोन गटांचे भांडण राजकीय पटलावर सुद्धा गेले. २००३ साली व्यंकटेश पन्नईयार पोलीस चकमकीत मारला गेला. बदला घेण्याच्या उद्देशाने पन्नईयार गँगने पांडियनच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला पण यात पांडियन बचावला पण त्याची बायको जेसिन्था यात मारली गेली. पांडियनवर बऱ्याच गुन्ह्यांचा आरोप होता. पोलिसांच्या ताब्यात जेव्हा तो सापडला तेव्हा त्याला एका घरात ठेवण्यात आलं. 

१० जानेवारी २०१२ रोजी पन्नईयार गँगच्या सहा लोकांनी धारदार शस्त्रांनी पशुपती पांडियनची हत्या घडवून आणली. पांडियनच्या हत्यानंतर त्याच्या गँगने पन्नईयार गँगच्या ५ लोकांना यमसदनी धाडलं. पांडियनची हत्या घडवून आणली ती सुभाष पन्नईयारने. सगळी सूत्र तो हलवत होता. पण पांडियनच्या हत्येनंतर तो फरार झाला. २०१६ साली त्याच्या जीवावर बेतणारा हल्ला झाला पण त्यातून तो वाचला. २०१७ साली त्याने सरेंडर केलं आणि कोर्टातून तो जामीन घेऊन बाहेर आला आणि मग फरार झाला.

याच सत्रात २३ सप्टेंबर २०२१ रोजी एका महिलेचं शीर कापून टाकण्यात आलं आहे कारण असा अंदाज वर्तवला जात आहे कि तिने पांडियनच्या हत्येमधल्या आरोपीना आसरा दिला होता. दलित नेता म्हणून पांडियन प्रसिद्ध होत होता आणि त्याची अचानक हत्या करण्यात आली होती.

तमिळनाडूतील डिंडीगुलमध्ये निर्मला देवी या ७० वर्षांच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. पांडियन यांच्या खुन्यांना आपल्या घरात आसरा दिल्याचा आरोप तिच्यावर होता. पांडियन यांच्या खुनाना आरोप असणाऱ्या इतर आरोपींचीदेखील यापूर्वी हत्या झाली आहे. त्यामुळे पांडियन यांच्या समर्थकांनीच ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी निर्मलादेवी ही मनरेगा साईटवर काम करण्यासाठी पायी चालली होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिला पकडले आणि तिच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. ती मरण पावल्यानंतर चाकूनं तिचे शीर आणि धड वेगळं करण्यात आलं. तिचं शीर घेऊन आरोपी तिथून निघून गेले आणि ज्या ठिकाणी पांडियन यांची हत्या झाली होती, तिथं पोहोचले. ननथावनपट्टी नावाच्या गावात पांडियन यांच्या घराच्या परिसरात त्यांच्या पोस्टरखाली त्यांनी महिलेचं शीर ठेवलं आणि तिथून पोबारा केला.  

३ दशकांपासून सुरु असलेला हा राडा शांत होण्याची लक्षण दिसत नाहीए. राजकीय पटलावर रंगणारा हा वाद आजवर अनेक लोकांचा जीव घेऊन गेला आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.