शेअरहोल्डर ‘झी’ ला सांगत होते, तुम्ही पण तारक मेहता सारखी सिरीयल सुरु करा.. अन आता…

काल एंटरटेन्मेन्ट क्षेत्रात मोठ्या विलीनीकरणाच्या कराराची बातमी समोर आली. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की सोनी १.५७ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल आणि विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्सकडे ५२.९३ टक्के कंट्रोलिंग स्टेक असेल.

आता हे झालं माहितीपूर्ण. पण सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल तो म्हणजे, आपल्या मालिका आपण कुठं आणि कशा बघणार आहोत. त्यात आणि तारक मेहता का उल्टा चष्मा सोनीच्या सब चॅनेलवर लागत. ते तर अख्या देशवासियांचा जीव की प्राण आहे. लोक एकवेळ जेवणार नाहीत उपवास करतील पण तारक मेहता बघतील.
ते कशावर दिसणार झी का सोनी सब ?
तर विलीनीकरणानंतर, हे नेटवर्क एकत्रितरित्या ७५ चॅनेलचे नेटवर्क ऑपरेट करतील. पण आहे तसंच सगळं सुरु राहील. फक्त बॅनर असेल तो झी मीडिया आणि सोनीचा एकत्रितरित्या. खरं तर ‘झी’ला तारक मेहता का उल्टा चष्मा अशी एखादी मालिका बनवायची होती. तशी मागणी पण ‘झी’ च्या भागधारकांनी केली होती. पण त्यावेळी ‘झी’ चे पुनीत गोयंका यांनी नुसतीच मान डोलावली होती. आणि आता बघा 
झीच सोनी मध्ये विलीन झालीय.

तर त्याच असं झालं होत की, झी पुढं कस वाढवायचं, लोकांची एंगेजमेंट कशी आणायची, कोणत्या नव्या मालिका सुरु करायच्या, व्हूयवरशीप कशी वाढवायची यासाठी झी च्या सर्वसाधारण भागधारकांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती.

यात काही भागधारकांनी बऱ्याच सूचना दिल्या. पण त्यात एकसमान सूचना अशा होत्या की, आपण एखादी तारक मेहता का उल्टा चष्मा सारखी मालिका सुरु करूया. ती आजवरची सर्वात लोकप्रिय मालिका आहे.

कारण,

२००८ साली एक मालिका टीव्हीवर आली आणि तिने सिरीयल प्रकारचे सगळे रेकॉर्डच तोडले. दररोजच्या रटाळ गोष्टी आणि प्रत्येक मालिकेतले आलटून पालटून होणारे प्रकरणं बघून वैतागलेल्या प्रेक्षकांना हि मालिका संजीवनी देऊन गेली. अगदी घरातल्या म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलांपर्यंत सगळं घरदार हि मालिका बघतं.

विनोदी पद्धतीने केलेलं सादरीकरण हि या मालिकेची जमेची बाजू असून यामधली पात्र अगदी आपल्या घरातली वाटतात किंवा आपण त्या लोकांच्या अगदी घरातले आहोत इतकी प्रसिद्ध हि मालिका आहे. लोकांच्या प्रेमावर आणि विश्वासावर हि मालिका चालते.

तारक मेहता का उलटा चष्मा हि आजवरच्या सर्वात जास्त काळ चालवणाऱ्या सिरीयलपैकी एक आहे. सलग १३ वर्षांपासून हि मालिका अविरतपणे सुरु आहे.

टीआरपी साठी या मालिकेला कधीही जास्त धडपड करावी लागत नाही. केवळ विनोदाच्या दर्जावर आणि निखळ मनोरंजनाच्या जोरावर हि मालिका आघाडीवर आहे. सीआयडी नंतर सगळ्यात जास्त चालणारी हि मालिका आहे.

हेच कारण होत, म्हणून ‘झी’ च्या भागधारकांनी मनावरचं घेतलं होत की अशा प्रकारची एखादी मालिका सुरु करायचीच. जेव्हा पुनीत गोयंकांना याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी नुसतीच मान डोलावली. कारण त्यांना माहित होत की, झी पुढे जाऊन म्हणजे थोड्याच दिवसात सोनीमध्ये विलीन होणार आहे. त्यांनी त्यावेळी काहीच उत्तर दिलं नाही.

पण आज बघा, गोयंकांनी मनावर घेतल्यामुळं जेठालाल, दयाबेनची वर्ल्ड फेमस गोकुळधाम सोसायटी  चक्क ‘झी’वर दिसणारे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.