मुस्लीम धर्मीय महिलांना टार्गेट करणार सुल्ली डील्स, बुल्ली बाई अ‍ॅप काय आहे?

सुल्ली डील्स विवादानंतर आता पुन्हा एकदा मुस्लीम धर्मीय महिलांना लक्ष करण्यात येत आहे. १ जानेवारी रोजी शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो Github चा वापर करून ‘बुल्ली बाई’ (#Bullybai) नावाच्या अ‍ॅप वर उपलोड करण्यात आले होते.

एका अज्ञात ग्रुपच्या माध्यमातून बुल्ली बाय अ‍ॅप मुस्लीम महिलांचे फोटो उपलोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
सुल्ला, सुल्ली हे महिलांविरोधात वापरण्यात येणारे अपमानजनक शब्द आहेत. आता या शब्दात बदल करून बुल्ली बाई असा नवा शब्द वापरण्यात आला. यावर शेकडो महिलांचे फोटो टाकून दुरुपयोग करण्यात येत आहे. याबाबत आता मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात येत असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

त्यापूर्वी सुल्ली डील्स काय होत पाहूयात

५ महिन्यापूर्वी म्हणजे ५ जुलै २०२१ रोजी सोशल मिडीयावर एक स्क्रीनशॉट फिरत होता. यात एका मुस्लीम महिलेचा फोटो होता आणि त्याखाली ‘सुल्ली डील ऑफ द डे’ असं लिहण्यात आलं होत. नंतर यात सामान्य मुस्लीम महिला बरोबरच पत्रकार, लेखक अशा प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो सुद्धा वापरण्यात आले होते.

या महिलांचा ऑनलाईन सौदा करण्यात येत असल्याचे अ‍ॅप मध्ये दाखविण्यात येत होते. यापैकी काही महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

सुल्ली डील अ‍ॅप वर लेखिका नबिया खान यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात आला होता. आता नबिया खान यांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांनी सुल्ली डील अ‍ॅप विरोधात दाखल एफआयआरची कॉपी मिळाली नसल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

 मी ५ महिन्यानंतरही एफआरआयची वाट पाहत असल्याचे सांगत यावेळी तरी कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी ट्वीटर वरून दिल्ली पोलिसांना विचारला आहे.
तसेच या प्रकरणात रेडियो जॉकी सईमा यांचे फोटो सुद्धा सुल्ली डील अ‍ॅप मध्ये वापरण्यात आला होता. बुल्ली बाई अ‍ॅप विरोधात काय कारवाई केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सुल्ली डीलचे पुढे काय झाले

दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन ठिकाणी वेगवेगळ्या एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र ५ महिन्यानंतर अजूनतरी कोणालाही अटक करण्यात आली नाही. त्यावेळी सुद्धा शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. ५ महिन्या नंतर सुल्ली अ‍ॅप बनविणारे अजूनही मोकाट आहेत.

बुल्ली बाई अ‍ॅप कशामुळे चर्चेत आलं

सुल्ली डील प्रमाणेचं बुल्ली बाई अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या एप वरून मुस्लीम महिलांचे फोटो वापरून त्यांचा सौदा करण्यात येत होता. बुल्ली बाई अ‍ॅपवर एका पत्रकार महिलेच्या फोटोचा वापर करत करण्यात आला होता. या फोटो वरून पत्रकार महिलेला ट्रोल करण्यात आल्या नंतर ही घटना समोर आली आहे.

या पत्रकार महिलेने पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

हे अ‍ॅप बनविणाऱ्यानी इतर सोशल मिडिया अ‍ॅपवरून मुस्लीम धर्मीय महिलांचे फोटो डाऊनलोड केल आहेत. त्यावर बदनामीकारक मजुकर लिहण्यात येतो आणि हेच फोटो सोशल मिडीवर टाकून ट्रोल करण्यात येते. फोटोच्या खाली ‘योर बुल्ली बाई ऑफ द डे’ टाकून त्याचा सौदा करण्यात येत असे.

Github ने अ‍ॅ बनविणाऱ्याला ब्लॉक केलंय

बुल्ली बाई अ‍ॅप हे Github वर बनविण्यात आले आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की, Github वरून बुल्ली बाई अ‍ॅप तयार करण्याला ब्लॉक करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

तसेच एमआयएमचे प्रमुख असुद्दिन ओवेसी यांनी अशा घटना निंदनीय असून कारवाई झाली नाही तर हे असच सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.