बिहारच्या ‘हर घर नल का जल’ योजनेचा फायदा उपमुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचतोय

बिहार हे देशातल्या मागास राज्यांमध्ये गणलं जात. जिथं अजूनही म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यात काही वर्ष मागे गेलो तर पाण्यासाठी सुद्धा इथल्या लोकांना झगडावं लागलयं. याच पार्श्वभूमीवर गरिबांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाच वर्षांपूर्वी एक मोठा प्रकल्प सुरू केला होता. ‘हर घर नल का जल’ नावाच्या या प्रकल्पाचा हेतू १.०८ लाख पंचायत वॉर्ड गाठण्याचा होता. त्यातले आतापर्यंत  ९५ टक्के काम पूर्ण झालंय.

आता एखाद्या चांगल्या गोष्टीत नेतेमंडळी काही कांड करणार नाही असं कधी झालंय. तर एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, राजकारण्यांच्या जवळच्या लोकांनी या योजनेचा खूप फायदा उठवलाय.  

नेत्यांच्या नातेवाईकांना असे राजकीय संरक्षण नितीशकुमार यांच्या गुड गव्हर्नन्सच्या दाव्यावरही पाणी पसरवलंय.  चार महिन्यांच्या तपासानंतर असे दिसून आलंय की, भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद हे कराराद्वारे लाभार्थींच्या यादीत पहिले नाव आहेत.  यासोबतच जेडीयूच्या आमदारांच्या नातेवाईकांनाही या योजनेअंतर्गत मोठा लाभ मिळालाय. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना या योजनेअंतर्गत ५३ कोटींचे कंत्राट मिळाले आहे.

आत या प्रकरणाचा छडा कश्याप्रकारे लागला तर, बिहारमध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘हर घर नल का जल’ योजनेशी संबंधित २० जिल्ह्यांची कागदपत्रे पाहिली गेली. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) आणि बिहार पब्लिक हेल्थ इंजिनीअरिंग डिपार्टमेंट (पीएचईडी) च्या नोंदींमधून पाहिले गेले. PHED कडे ही योजना राबवण्याची जबाबदारी होती. यामध्ये पंचायती राज आणि नगरविकास विभागाला पाठिंबा द्यावा लागला.

PHED ने २०१९ – २०  मध्ये कटिहार जिल्ह्यातील ९ पंचायतींच्या विविध प्रभागांमध्ये योजनेच्या ३६ प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याचे रेकॉर्डमध्ये आढळले. आता कटिहार हा उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला. तिथूनच ते चार वेळा निवडून आले.

आता जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा तारकिशोर प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, व्यवसाय करण्यात काही गैर आहे का?

खरं तर, तारकिशोर प्रसाद यांची सून पूजा कुमारी. यांच्या नानांवर दोन कंपन्या आहेत, आणि या दोन्हीही कंपन्यांना या योजनेतून कंत्राट मिळालंय. यावर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटल कि,

‘आमच्याकडे फक्त  एकचं कंत्राट आहे आणि ते सुनेचं आहे. त्याचे काम आतापर्यंत पूर्ण झालेय. या व्यतिरिक्त, ‘हर घर नल का जल’ योजनेमध्ये आणखी कोण काम करतयं याबद्दल मला माहिती नाही. माझ्या सुनेजवळ चार युनिटचे (वॉर्ड) काम होते. आम्ही व्यवसाय करू शकत नाही का? ‘

या योजनेअंतर्गत दीपकीरण इन्फ्रास्ट्रक्चरलाही कंत्राट मिळाले. या कंपनीचे संचालक तारकिशोर प्रसाद यांचे मेहुणे प्रतीप कुमार भगत आहेत. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “होय, ठीक आहे, ते सुद्धा एकाच सोशल कॅटॅगरीतले  आहे आणि योजनेशी संबंधित आहेत.”

दीपकरन इन्फ्रास्ट्रक्चरनंतर जीवनश्री इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही तारकिशोर प्रसादचे तीन जवळचे संचालक आहेत. मात्र, या कंपन्यांबद्दल बोलताना तारकिशोर यांनी सांगितलं कि,  या सर्व मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यांचा आमच्याशी दूर- दूरचा संबंध नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कटिहार जिल्ह्यातच २८०० युनिट आहेत आणि यापैकी फक्त चार कंत्राटे त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली आहेत. व्यवसाय करण्यात काहीच गैर नाही. हा, कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलाला सांगितलेय की कोणीही सरकारी काम करू नये, यामुळे फक्त फालतूच्या अडचणी टायर होतात.’

या प्रकरणी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बिहारचे PHED मंत्री आणि भाजप नेते राम प्रीत पासवान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी अशा प्रकरणाबद्दल ऐकले आहे. पण यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना कंत्राट देण्याचा उल्लेख नव्हता. लोकांनी पुढे येऊन याबद्दल तक्रार करावी अशी माझी इच्छा आहे. मी मंत्री होण्यापूर्वीच ही सर्व कंत्राटे देण्यात आली होती. आतापर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही. जर कोणी कंत्राटदार येऊन हे वाटप चुकीच्या पद्धतीने झाल्याचा पुरावा देत असेल तर कारवाई केली जाईल.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.