छोटा हत्ती इतकी प्रचंड विक्री भारतात दुसऱ्या कुठल्याही वाहनाची झाली नव्हती.

टाटा मोटर्स हा एक देशातला नव्हे तर जगभरातला महत्वाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात असो किंवा काश्मीरच्या बर्फात टाटा मोटर्सच्या ट्रकला अजूनही कुठला पर्याय नाही. पण टाटा मोटर्सने २००५ साली एक मिनी ट्रक [ टाटा एस ] आणला आणि भारतात सगळ्यात जास्त विक्री होण्याचा मान त्या ट्रकला मिळाला. हाच मिनी ट्र्क पुढे छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध झाला. तर जाणून घेऊया छोटा हत्तीची मोठी यशोगाथा.

२००५ साल उजाडलं आणि टाटा एस नावाचा नवीन प्रोडक्ट लॉन्च झाला. या वाहनाने मालवाहू क्षेत्रात क्रांती घडवून आणली. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना टाटा एस अर्थात छोटा हत्तीने बळ दिल, रोजगार निर्माण केला आणि उद्योगक्षेत्रात एक महत्वाचं पाऊल टाकलं. देशभरातील लोकांना सर्व प्रकारच्या प्रदेशात आणि कसंही हवामान असो अशा परिस्थितीमध्ये टिकाऊ आणि कार्यक्षम कार्यासाठी टाटा एस हा ब्रँड आवडतो.

त्या वर्षी टाटा एसने एक जबरदस्त टॅगलाईन केली जी पुढे छोटा हत्ती म्हणून जगभर ओळखली जाऊ लागली. आजही भारताच्या खेड्यापाड्यात,शहरी भागात छोटा हत्ती आपल्याला दिसून येतात. २३ लाखांहून अधिक उद्योजकांचा विश्वासू असलेला टाटा एस ट्रक १५ वर्षांपासून मिनी ट्र्क विभागात ग्राहकांची नंबर वन पसंद म्हणून ओळखला जातो.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक विभागातून छोटा हत्ती लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे जे जे नवीन मॉडेल येईल ते लगेच मार्केटमध्ये अपग्रेड करणे आणि ग्राहकांना योग्य सेवा देणे. छोटा हत्तीचे फिचर म्हणजे ते चार इंजिन ऑप्शनमध्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१]  Single Cylinder Naturally Aspirated Water Cooled,

२]  Tata २७५ IDI २-Cylinder,

३]  ४-Stroke २ Cylinder Direct Injection Common Rail and

४] ८००cc २-Cylinder DICOR

लोडिंगमध्ये छोटा हत्तीची कॅपेसिटी ग्रॉस व्हेईकल वेट [ GVW ] रेंज १,२८५ ते २,१०० किलो दरम्यान आहे ज्याचं वजन ६८५ ते १०७० किलो आहे.

छोटा हत्तीची डिझाईन हि सोपी पण युनिक आहे आणि ग्राहक त्याकडे लवकर आकर्षित होतात. पूर्वी टाटा समूहाचा एक वचक बाजारपेठेत होता पण नंतरच्या काळात टाटाला टक्कर देण्यासाठी अनेक व्यावसायिक कंपन्या बाजारपेठेत उतरल्या पण त्याचा फार फरक पडला नाही कारण छोटा हत्ती वेळोवेळी आपल्या प्रोडक्टमधे सुधारणा करत असते.

टाटा मोटर्स निःसंशयपणे भारतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्टीत व्यावसायिक वाहन समूह आहे. छोट्या ट्रकमध्ये आणि लांबच्या पल्ल्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाटा समूह का बेस्ट आहे याची प्रचिती येते. छोट्या व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रात भारताच्या बाजारात पडझड आणि मंदीची लाट आली असताना टाटा एस अर्थात छोटा हत्तीने सगळं मार्केट बदललं, आणि हा एक ब्रँड म्हणून उदयास आला.

छोटा हत्तीमध्ये बऱ्याच टाईप आहेत. जास्तीत जास्त व्हरायटी असल्याने ग्राहक त्याच्या सोयीनुसार आणि व्यवसायाच्या गरजेनुसार छोटा हत्तीची निवड करतात. शहरामध्ये आणि गावांमध्येही माल वाहतुकीसाठी छोटा हत्ती हा ट्र्क उत्तम मानला जातो. चांगला मायलेज आणि चांगली डिझाईन, कमी किंमत आणि क्वालिटी यामुळे छोटा हत्ती कामासाठी किती मोठा आहे यावरून कळतं.

आजही तुम्ही नीट निरीक्षण केलं तर शहरांमधे, गावामध्ये बांधकाम असो, मालाची वाहतूक असो सगळीकडे छोटा हत्तीचं दिसून येतो. या ब्रॅण्डची जाहिरात अक्षय कुमारने केली होती जी टीव्हीवर बराच काळ होती. आजही छोटा हत्तीची /पीकपची क्रेझ कमी झालेली नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.