आपल्या कुत्र्यांची तब्येत बिघडल्याने ब्रिटीश घराण्याच्या पुरस्कार सोहळ्यात न जाणारे “टाटा”

रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक २० वर्षाच्या तरुण त्यांच्या पाठीवर हात ठेऊन केक कापतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर अनेकांनी विचारलं, शोधलं…

की, रतन टाटांच्या पाठीवर हात ठेवणारा हा कोण आहे…?

शोध घेतल्यावर समजले की, त्याचे नाव शंतनू असून तो पुण्याचा आहे. त्याच्या चार पिढ्यांनी टाटा कंपनीत काम केलंय. पण त्यांना कधीही रतन टाटा यांना भेटता आलं नव्हतं. पण शंतनू रतन टाटांना नुसता भेटलाच नाही तर तो त्यांचा खास दोस्त देखील झाला आणि त्याला कारण ठरलं ते रतन टाटा आणि शंतनू यांचा असणारा सेम इंटरेस्ट.. 

हे दोघेही कुत्र्यांवर भयानक प्रेम करतात..

शंतनूने कुत्र्यांसाठी खास रेडियमची कॉलर तयार केली होती आणि ती भटक्या कुत्र्यांना लावली होती. त्यामुळे कुत्र्यांचे अपघात काही प्रमाणात थांबले. ही संकल्पना टाटांना खूप आवडली. शंतनूच्या स्टार्टअप साठी मदत केलीच पुढे तो त्याच्या सगळ्यात जवळ गेला आणि आता त्यांच्या सोबत २४ तास राहतो.

टाटा मुख्यालयात भटक्या कुत्र्यांसाठी विशेष व्यवस्था..

मुंबईतील बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचे मुख्यालय. इथूनच सगळ्या टाटा ग्रुपचा डोलारा सांभाळण्यात येतो. २०१९ मध्ये याचे रिनोव्हेशन करण्यात आले. त्यापूर्वी सिक्युरिटी हॉल मध्ये रस्त्यावरील भटकी कुत्री राहत असत.

त्यांच्यासाठी बॉम्बे हाऊस मध्ये एक नवीन खोली बांधण्यात आली. तिथे त्यांची विशेष व्यवस्था करण्यात येते.

असाच एक किस्सा म्हणजे रतन टाटांनी कुत्र्यांवरील प्रेमापोट ब्रिटनच्या घराण्याकडून पुरस्कार मिळणं टाळलं होतं..  

प्रिन्स चार्ल्स यांनी टाटांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्याचे ठरविले होते. हा कार्यंक्रम बकिंगहॅम पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी रतन टाटा यांना विचारणा करण्यात आली त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले होते. यावेळी रतन टाटा हे कंपनीचे चेअरमन होते.

कार्यक्रमाची तारीख ठरली ६ फेब्रुवारी २०१८.

पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा इंग्लडला जाणार होते.  कार्यक्रमाला ब्रँड कंसल्टंट आणि इतर भारतीय सुद्धा उपस्थित राहणार होते. सुहेल सेठ हे अगोदरच इंग्लंड मध्ये पोहचले होते. हिथ्रो विमानतळावरुन बकिंगहॅम पॅलेससाठी सुहेल सेठ निघाले होते. 

त्यावेळी सुहेल सेठ यांनी आपला फोन पाहील तर रतन टाटा यांचे १० ते ११ मिस कॉल आले होते.

त्यांनी टाटांना परत फोन करून विचारले की,

काय झाले इतके वेळा फोन केलात.

त्यावेळी टाटा म्हणाले की,

माझ्या सोबत राहणाऱ्या टिटो आणि टॅंगो या कुत्रांपैकी टिटो हा आजारी आहे.

 

अशा स्थितीत मी त्याला एकटं सोडून इंग्लंडला येऊ शकत नाही.

हा निरोप टाटांनी सुहेल सेठ यांना दिला. यावर सुहेल सेठ त्यांना म्हणाले की,

 प्रिन्स चार्ल्स यांनी हा कार्यक्रम तर तुमच्यासाठी बकिंगहॅम पॅलेस येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे.  

मात्र, रतन टाटा यांच्या नाकारापुढे सेठ यांचे काहीच चालले नाही.

प्रिन्स चाल्स यांना रतन टाटा हे पुरस्कार स्विकारण्यासाठी येऊ शकत नाहीत हे कसे सांगायचे याचे टेन्शन सुहेल सेठ यांना आले होते. सेठ यांनी हा निरोप प्रिन्स चार्ल्स यांना सांगितला. प्रिन्स चार्ल्स यांनी सेठ यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले कुठलीही तक्रार केली नाही. उलट प्रिन्स चाल्स सुहेल सेठ यांना म्हणाले, 

That Is the Real Man 

आपल्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी ब्रिटनच्या राज घराण्यांकडून देण्यात येणारा पुरस्कार घ्यायला रतन टाटा गेले नाही. यावरून त्यांचे कुत्र्यांबाबत असणारे प्रेम दिसून येते. ब्रँड कन्सल्टंट सेहूल सेठ यांनी एका खासगी चॅनेल दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.