४० टॅक्सी चालकांची हत्या करून मगरांना खाऊ घालणारा टॅक्सी ड्रायव्हर किलर….

आजचा किस्सा एखाद्या क्राईम सिनेमाच्या कथेलाही कलाटणी देऊ शकेल इतका विकृत आहे.  सिरीयल किलर यांचा विषय वेगळा असतो पण घटनेतला मुख्य आरोपी हा आयुर्वेदीक डॉक्टर होता. या आयुर्वेदिक डॉक्टर असणाऱ्याने टॅक्सी चालकांमध्ये इतकी दहशत बसवली होती कि कुणी टॅक्सी ड्रायव्हर नाईट शिफ्ट नसायचा, तर जाणून घेऊया हा किस्सा नक्की काय होता.

तब्बल ४० टॅक्सी ड्रायव्हर लोकांची हत्या, गॅस सिलिंडरची चोरी, किडनी ट्रान्सप्लांट अशा सगळ्या गोष्टींमागे विकृत असलेला देवेंद्र शर्मा टॅक्सी ड्रायव्हर किलर म्हणून ओळखला जाऊ लागला होता. व्यवसायिकरित्या पेशाने डॉक्टर असलेल्या देवेंद्र शर्मा याने इतकं विकृत काम केलं होतं. 

२००० सालच्या सुरवातीला या टॅक्सी ड्रायव्हर किलरने ४० हुन अधिक टॅक्सी चालकांचे खून केले होते. या हत्या करून झाल्यावर डेड बॉडी आणि पुरावा सापडू नये म्हणून हा डॉक्टर देवेंद्र शर्मा हत्या केलेल्या व्यक्तींचे प्रेतं मगरींनी भरलेल्या नदीत टाकून यायचा. सिरीयल किलर डॉक्टरवर दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस पाळत ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता.

इंडियन एक्स्प्रेसने एका आर्टिकलमध्ये देवेंद्र शर्माबद्दल सांगितलं होतं कि त्याने ४० हत्येनंतर पुढच्या हत्येचे आकडे मोजलेच नाहीत. जवळपास १०० चा एकदा असावा पण आत्ता लक्षात नाही. सुरवातीला बिहार मधून आयुर्वेदाची डिग्री त्याने मिळवली. नंतर एका गॅस एजेन्सीने देवेंद्र शर्माला हात दिला पण तो तोट्यात गेला. हा व्यवसाय मोडीत निघाल्याने तो निराशेच्या गर्तेत गेला होता.

पण पुढे किडनी ट्रान्सप्लान्टच्या रॅकेटमध्ये देवेंद्र शर्मा सामील झाला. या रॅकेटमध्ये बरेच डॉक्टरसुद्धा सामील होते. देवेंद्र शर्माच्या या कारवाया बघून त्याच्या बायकामुलांनी त्याच्याशी संपर्क तोडला होता. अज्ञात जागेवर टॅक्सी भाड्याने घेऊन त्या गाडीच्या चालकाची हत्या करणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता. टॅक्सी चालकाची हत्या करून झाल्यावर देवेंद्र शर्मा ती टॅक्सी विकून टाकत असे आणि चालकाची डेड बॉडी मगरांनी भरलेल्या नदीत टाकून यायचा. 

टॅक्सी चालकांची हत्या करून तो त्यांची टॅक्सी विकायचा. प्रत्येक टॅक्सीमागे देवेंद्र शर्माला २५ हजार मिळायचे. पण पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरवात केली. सगळ्यात अगोदर पोलिसांनी ज्या चोर मार्केटमध्ये देवेंद्र शर्माने टॅक्सी विकल्या होत्या त्या दुकानदाराला गाठलं, तर त्या दुकानदाराने सांगितलं कि अशा अशा माणसाने जवळपास ५० पेक्षा जास्त टॅक्सी आम्हाला विकलेल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी अखेर देवेंद्र शर्माला अटक केलीच, सुरवातीला शर्मा पळायच्या तयारीत होता पण पोलिसांनी युक्तीने त्याला पकडलं. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला, आणि देवेंद्र शर्माने आपले सगळे गुन्हे कबुल केले. २००२ ते २००४ या काळात देवेंद्र शर्माने ४० पेक्षा जास्त हत्या केल्या होत्या.

दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचने देवेंद्र शर्माला १९९४ ते २००४ या काळात केलेल्या किडनी रॅकेट आणि हत्यांसोबत अनेक छोट्यामोठ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं. २००८ साली देवेंद्र शर्माला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. जानेवारी २०२० मध्ये त्याला १६ वर्षांच्या जेलनंतर २० दिवसांची पॅरोलवर सुट्टी मिळाली पण तो तिथून गायब झाला. पुन्हा पोलिसांनी त्याला जुलै २०२० मध्ये अटक केली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.