पोटनिवडणुकीतल्या एका उमेदवारामुळं लालू यादवांच्या पोरांची भांडणे जगासमोर आलीयत
राजकारण हा असा विषय आहे, जिथं ना घरचे पाहिले जातात, ना दोस्ती विषय असतो तो फक्त खुर्चीचा आणि सत्तेचा. असचं काहीस चित्र बिहारमध्येही पाहायला मिळालंय. बिहारमध्ये सत्तेसाठी दोन भावांमध्येचं रस्सीखेच सुरु झालीये. ज्याचा परिणाम म्ह्णून भावानेच भावावर गेम खेळलाय.
तर हे दोन सख्खे भाऊ म्हणजे तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव. बिहारचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे दोन अनमोल रतन अर्थातचं त्यांचे पुत्र. लालू प्रसाद यादव यांना जेव्हा न्यायालयीन चौकशीला समोर जावं लागलं होत, त्यांनी राष्ट्रीय जनता दला (राजद) ची कमान तेजस्वी यादव यांना सोपवण्यात आली होती.
यामागचं कारण म्हणजे तेज प्रताप यांच्यापेक्षा तेजस्वी यादव राजकारणात जास्त सक्रिय होते. तेज प्रताप यादव यांनी स्वतः एका मुलाखतीत मान्य केलं होत कि, त्यांना राजकारणात काहीच इंट्रेस्ट नाहीये. त्यात तेजस्वी आधीच क्रिकेटच्या माध्यमातून चर्चेत आलेला चेहरा होता. त्यामुळे राजदचा कारभार तेजस्वीच्या हातात गेला.
आता भलेही तेज प्रताप यादवनं म्हंटल कि, त्यांना राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांना अध्यात्माची ओढ आहे. बऱ्याचदा ते भगवान शंकराच्या आणि कृष्णाच्या अवतारात आणि शंख वाजवताना पहिले गेलेत. पण सत्तेची चटक प्रत्येकाला आपोआप लागतेचं.
तर, बिहारमध्ये आगामी काळात विधानसभेच्या कुशेश्वरस्थान आणि तारापूर या दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ज्यासाठी ३० ऑक्टोबरला मतदान होईल आणि तीन दिवसांनी म्हणजेचं २ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय यादव यांनी नुकताच तारापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. आता त्यांचं नाव चर्चेत आलं कारण त्यांना तेज प्रताप यादव यांचा फुल सपोर्ट होता.
आता जरी तेज प्रताप यादव राजकारणात जास्त सक्रिय नाहीत किंवा राजद मध्येही त्यांची कोणती महत्वाची भूमिका नसते, पण त्यांची एक संघटना आहे – विद्यार्थी जनशक्ती परिषद. जी अजूनतरी निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही आणि या संघटनेकडे कोणते निवडणूक चिन्ह देखील नाही. त्यामुळे तेज प्रताप यांनी येड्याच सोंग घेऊन संजय कुमार यांना आधी अपक्ष म्हणून उभे केल आणि नंतर आपल्या संघटनेकडून पूर्ण पाठिंबा दिल्याचं म्हंटल जातंय.
अर्थात आपल्या धाकटे बंधू तेजस्वी यादव यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला. तेज प्रताप यांच्या या खेळीला राजकारणात त्यांचा एन्ट्री पॉईंट असल्याचं बोललं जातंय.
आता मोठ्या भावाने चाल खेळलीये म्हंटल्यावर बारकं काय गप्प राहतंय होय. त्यात तो मोठ्या पेक्षा राजकारणात अनुभव असलेला पठ्ठ्या. त्यानं हा डावचं पालटवला.
तेजस्वी यादवने ९ ऑक्टोबरला अपक्ष उमेदवार संजय कुमारला भेटायला बोलावले. बैठक झाली आणि काही तासातच संजय कुमार यांनी निवडणूक लढविण्याबाबत आपलं मन बदललं आणि उमेदवारी मागे घेतली, एवढंच नाही तर राजदमध्ये देखील सामील झाले. संजय यादव म्हणाले –
‘बिहारमध्ये राजद सरकार स्थापन करायचे आहे. राजदला बळकट करण्यासाठी मी माझा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. माझे लक्ष्य राजद उमेदवाराला तारापूर विधानसभेतून विजय मिळवून देणे आहे.”
आता बाजी पलटली म्हंटल्यावर तेज प्रताप तरी काय करणार. पण मग यामुळे त्यांना बरेच टोमणे ऐकायला लागले. ज्यामुळे भडकलेल्या तेज प्रताप यादव यांनी ट्विट केले –
“आदरणीय तेज प्रताप यादव जी निवडणुकीत माझ्यासाठी प्रचार करतील – संजय यादव. संजय यादव जी यांनी जनतेसाठी – पक्षासाठी उमेदवारी मागे घेतली. ना मी काही बोललो ना मी काही लिहिलं, मग यात माझी भूमिका काय होती? हरियाणवी स्क्रिप्ट रायटर, तू ही फालतूची स्टोरी कुठे दुसरीकडे जाऊन लिही. बिहारींना सगळं काही समजतं.
मेरे लिए चुनाव में आदरणीय तेजप्रताप यादव जी प्रचार करेंगें-संजय यादव,
जनता के लिए संजय यादव जी ने अपनी उम्मीदवारी वापिस ली-पार्टी,
ना मैंने कुछ कहा ना लिखा तो इसमें मेरा क्या रोल था या है?
हरियाणवी स्क्रीट राईटर तुम ये फालतू की सी ग्रेड कहानी कहीं और लिखना।
बिहारी सब समझतें हैं।— Tej Pratap Yadav (@TejYadav14) October 9, 2021
आता तेज प्रताप यादवचा हरियाणवी स्क्रिप्ट रायटर म्ह्णून अप्रत्यक्ष टोमणा हा आपला छोटा भाऊ तेवस्वीलाच होता. पण यात त्यांचं लक्ष यागोष्टीकडे वेधायच होत कि, ते संजय यादवसाठी प्रचार करतील असं बोलले देखील नव्हते. मग संजय यांनी त्यांचं नाव घेण्याचं कारण काय ?
आता दोघा भावांमधला हा वाद काही नवीन नाही याआधी सुद्धा जेव्हा राजदने निडवणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. तेव्हा या यादीत तेज प्रताप सिंग, लालू प्रसाद यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांची नाव वगळण्यात आली होती. तेव्हा तेज प्रताप यादव यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. त्याने म्हंटल कि, “माझं नाव नसत तरी चाललं असतं , पण आई आणि दीदींचं नाव पाहिजे होत.”
ऐ अँधेरे देख ले मुँह तेरा काला हो गया
माँ ने आँखें खोल दीं घर में उजाला हो गया…
मेरा नाम रहता ना रहता मां और दीदी का नाम रहना चाहिए था…
इस गलती के लिए बिहार की महिलाएं कभी माफ नहीं करेगीं,दशहरा में हम मां की ही अराधना करतें हैं ना जी…😭😭 pic.twitter.com/SpfImByK4C— Tej Pratap Yadav (@TejYadav14) October 8, 2021
असं म्हंटल जात कि, या दोघांमधल्या वादाला सुरुवात झाली ती विद्यार्थी आरजेडीच्या अध्यक्षपदावरून. तर झालं असं होत कि, तेज प्रताप यादव यांनी आकाश यादव यांची विद्यार्थी आरजेडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
पण, आकाशची नियुक्ती करताना तेज प्रताप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि तेजस्वी यादव यांच्याशी बोलले नव्हते. यानंतर जगदानंद सिंह यांनी तत्काळ विद्यार्थी आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष आकाश यादव यांना हटवले आणि नवीन विद्यार्थी नेता गगन कुमार यांना विद्यार्थी आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित केले. इथूनच वादाला सुरुवात झाली आणि तेज प्रताप यादव यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात आघाडी उघडली.
हे ही वाच भिडू :
- त्यावेळी चर्चा होती कि, लालू अडवाणींना स्लो-पॉयझन देतायेत
- लालूंचा तेजस्वी यादव IPL देखील खेळलाय पण..
- लालूप्रसाद यादव आणि भाजपा यांची युती शक्य आहे काय?