टेलिग्राफ असुद्या किंवा 4G, 5G नेहमीच सुरुवात कोलकात्या पासूनच झाली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील १३ शहरांमध्ये 5 G सेवेचे उदघाटन करण्यात आले. यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.

यातील कोलकता शहरात हे महत्वाचं ठरत कारण म्हणजे टेलिग्राफची सुविधा असुद्या पहिला मोबाईल कॉल याच शहरापासून सुरुवात झाली आहे. 5G सर्व्हिस देशातील १३ शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. त्यापैकी एक म्हणजे कोलकता. ब्रिटिश काळापासून कोलकात्याचा महत्व काय होत हे जाणून घेऊ.

ब्रिटिशांना सुद्धा या शहाराबद्दल विशेष प्रेम होत. इथूनच त्यांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली. हे शहर अनेकवर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या केंद्रबिंदू होत. कम्युनिष्ठाच गड पण हे शहर राहिलं आहे.

सिटी ऑफ पॅलेस, आनंदी शहर, देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा कोलकत्या ओळखलं जात.

आज जरी आपण मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा असेल पण कधी काळी कोलकत्ता शहर देशाचे आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जात होते. तज्ज्ञांच्या मते कोलकाता शहर २ हजार वर्ष जून आहे. दिल्ली सल्तनत, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश येण्यापूर्वी कोलकता शहर ट्रेडिंग हब होते. महाभारतात सुद्धा या शहराचा उल्लेख आढळतो. या शहराचं नाव कालिकता होत. ब्रिटिशांनी याला कलकत्ता नाव दिलं.

१६९० मध्ये जॉब चोरनॉक नावाचा इस्ट इंडिया कंपनीचा एक एजेंट सुतानुती गावात पोहतात. चोरनॉक या भागात इस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी सुरु करण्याच्या तयारीत होता. यासाठी कालिकता, सुतानाती आणि गोविंदपूर या गावातील जमीनदारापासून जागा इस्ट इंडिया कंपनी भाड्याने घेते. 

कंपनीने १६९९ पासून या शहराचा विकास करायला सुरुवात केली. 

यानंतर हळू हळू इस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज वाढवला सुरुवात केली. तर १७७२ मध्ये कंपनीने कोलकात्याला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची राजधानी केली. यानंतर ब्रिटिशांचा दबदबा या शहरावर वाढत गेला. तसेच कंपनी कोलकत्ता मध्ये औद्योगिक कंपन्या जाळे उभा केले. 

कोलकात्याचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वैलेस्ली हे शहरातील वास्तू आकर्षक असायला हव्यात यासाठी आग्रही असतात. सिटी ऑफ पॅलेस म्हणून कोलकात्याला विकसित करतात. याच काळात बंगाल मध्ये सामाजिक सुधारनेला सुरुवात होत होती. 

याच काळात कोलकत्ता आर्थिक राजधानी म्हणून उदयास येत होती. 

कोलकत्ता हे शहर ब्रिटिश येण्यापूर्वी सुद्धा ट्रेंड कॅपिटल होतेच. ब्रिटिशांनी इथं अनेक कारखाने उघडले त्यामुळे हे शहर अधिक विकसित होत गेले. तसेच बंगालची राजधानी कोलकता केल्यानंतर ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याने मुर्शिदाबाद वरून सगळे सरकारी कार्यालये कोलकत्ता येथे आणले. 

तसेच ब्रिटिशांतर्फे भारतात पहिली जॉईंट स्टोक बँक सुरु करण्याचा विचार करण्यात आला तेव्हा कोलकता हे शहर निवडण्यात आलं. १८०६ मध्ये बँकेची स्थापना कोलकात्यात करण्यात आली. पुढे १८४० मध्ये या बँकेची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. तसेच कोलकात्यात   

तेव्हाच्या बंगाल मध्ये बांग्लादेश,ओडिसा आणि आसामचा काही भाग यात सामील होता. ब्रिटिश काळात सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांनी पैकी ४० ते ६० टक्के कंपन्या ऐकट्या बंगाल मध्ये होत्या. तर मुंबईत १५ टक्के तेवढ्याच कंपन्या होत्या.

भारताचं पाहिलं पोस्ट ऑफिस, पहिली इलेकट्रीक लाईट याच बरोबर पहिले उच्च न्यायालय सुद्धा याच शहरात सुरु करण्यात आले. अमेरिकेच भारतातील पाहिलं दूतावासात ऑफिस सुद्धा कोलकात्यात सुरु झालं होत. याच कारण म्हणजे तो पर्यंत कोलकात्यात मूलभूत सुविधा सुरु झाल्या होत्या. 

१८५० मध्ये देशातील पहिली टेलिग्राफचची सुविधा सुद्धा कोलकत्ता येथून सुरु झाली. १८५१ साली इस्ट इंडियाने वापरला सुरुवात केली होती. त्यानंतर देशभरात ही सुविधा सुरु झाली.

१८८१च्या सुरुवातीला इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेडने कोलकाता, मुंबई, चेन्नई णि अहमदाबाद येथे टेलिफोन एक्सचेंज उघडले. २८ जानेवारी १८८२ रोजीला ९३ लोकांना ही सेवा देण्यात आली होती. तर मोबाईलवरून पहिला फोन २१ जुलै १९९५ ला करण्यात आला. तो सुद्धा कोलकात्यातून करण्यात आला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी केंद्रीय मंत्री सुखराम यांना फोन केला होता.    

अलीकडची गोष्ट म्हणजे भारतात  ३G, ४G ची सुरुवात सुद्धा कोलकता शहरातून झाली.  

कधी काळी देशाची आर्थिक राजधानी कोलकत्याची मागे पडण्याची कहाणी  

विसाव शतक सुरू झाल्यानंतर कोलकात्यात राजकीय गोंधळ वाढत गेला. त्यामुळे आर्थिक बाबतीत हे शहर मागे पडत गेलं. यामुळे कोलकाता हे आर्थिक राजधानी जास्त काळ राहू शकत नाही. हीच संधी साधत मुंबईची वाटचाल आर्थिक राजधानी कडे होत जाते.

 याची अनेक कारणे सांगितली जातात खरी सुरुवात होते ते १९१२ पासून. ब्रिटिशांनी राजधानी  कोलकाता वरून हलविण्यात आली. यामुळे शहराचे महत्व हळूहळू कमी होत जाते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी मुंबई हा मिलिटरी बेस म्हणून वापर करण्यात येत होत. मोठे जहाज मुंबई पोर्ट मध्ये चांगल्या प्रकारे पोहचत होत्या. कोलकात्याला ही सोय नव्हती.

देशात रेल्वे ही सगळ्यात आधी सुरुवात झाली होती. त्यामुळे देशाच्या डेक्कन आणि पंजाब भागाशी जोडले गेले. मोठे बँकर मुंबईत राहत होते ते कोलकात्यात सगळे ब्रिटिश बँकर राहत होते. स्टॉक एक्सचें, कॉटन मार्केट, सराफा बाजार मोठा होता तर कोलकात्यात फक्त तागाच मार्केट होत. कोलकाता स्टॉक एक्सचेंज हे मुंबई पेक्षा खूप लहान होते. 

१९३७ आरबी आयच मुख्यलाय कोलकाता पासून मुंबई शिफ्ट केलं जात. दुसऱ्या महायुद्धाचे वेळी जपानच्या आर्मी चे लक्ष कोलकाता शहर होते.अशा अनेक कारणामुळे कधी काळी भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या कोलकात्याने आपले स्थान गमवावे लागले. 

गालिब ने कोलकात्याच्या प्रेमात होता. त्यांच्या दोन ओळीतून गालिब यांना कोलकत्या बद्दल किती प्रेम होत हे कळून येईल.  

कलकत्ते जो जिक्र किया तू ने हम-नशी

एक तिर मेरे सीने मे मारा की हाए –हाए 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.