…जेव्हा सचिननं स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवलं होत.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर. ज्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहितेय. त्याच्या करियर सोबतच त्याच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड किस्सेही त्याने अनेकदा शेअर केले. क्रिकेटच्या मैदानावर क्रांती करणारा सचिन आपल्या पर्सनल आयुष्यात जरा शांत आणि भावूक स्वभावाचा आहे.

कधी कमी रन्स करून पॅव्हिलिओनमध्ये जातानाचा कॅमेरात टिपलेला त्याचा भावून चेहरा चाहत्यांनी आणि खेळाडूंनी अनेकदा पाहिलाय. सचिनचा असाच एक किस्सा वीवीएस लक्ष्मणने एका वृत्तसंस्थेशी बोलताना शेअर केला. जिव्हा सचिनने स्वतः एका खोलीत बंद केले होते. 

तर ही गोष्ट आहे १९९८ ची. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चेन्नईत टेस्ट मॅच सुरु होत्या. या टेस्ट मालिकेसाठी सचिनने खूप मेहनत घेतली होती. पण सामन्याच्या पहिल्या डावात सचिन फक्त ४ धावांवर आउट झाला.

मैदानावर सचिन बॅटिंग करायला आला तर त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा शेन वार्न बॉलिंग करत होता. मैदानावर आल्या -आल्या सचिनने पहिल्याचं बॉलवर चौकार मारला. त्याच्या या पहिल्याच बॉलावरच्या चौकारावर चाहत्यांनी उभं राहून एकचं जल्लोष केला. स्टेडियममध्ये बसलेला प्रत्येकजण ‘सचिन…. सचिन… ‘ असं ओरडत होता.

सचिनने याच उत्साहाने दुसऱ्या बॉलचा सामना करण्याची तयारी केली. शेन वॉर्नच्या बॉलवर मिड-ऑनवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना मार्क टेलरनं सचिननं मारलेल्या बॉलचा कॅच घेतला. 

सचिनला अवघे ४ रन करून दुसऱ्याचं बॉलवर मैदानातून परत जावं लागलं.

लक्ष्मणने सांगितले की, ‘अश्या पद्धतीनं आउट झाल्यामुळे सचिन इतका निराश झाला की, त्याने स्वतःला एका खोलीत बंद केले आणि रडू लागला.

सचिनने स्वतःला फिजिओच्या खोलीत बंद केले. जवळपास तासभर त्याने खोलीचा दरवाजा उघडलाचं नाही. दरम्यान जेव्हा तो खोलीच्या बाहेर आला. तेव्हा सचिनचे डोळे पाणावलेले आणि लाल होते. 

लक्ष्मण बोलताना म्हंटला की, ‘सचिन खूप भावुक झाला होता. तो ज्या प्रकारे आउट झाला होता, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले होते. ”

दरम्यान, या मॅचनंतर सचिनने पुढच्या मॅचसाठी आणखी जोमाने तयारी केली. आपल्या पहिल्या डावातील खेळीमुळे आऊट झालेल्या सचिनने दुसऱ्या डावात मात्र मैदानावर धुरळाच उडवला.  

लक्ष्मणने सांगितले, ‘या सामन्या दरम्यान सचिन आणि शेन वॉर्न पुन्हा आमनेसामने आले. वॉर्न लेग स्टंपच्या बाहेर खूप सॉफ्ट बॉलिंग करत होता. तेव्हा सचिनने त्याची चांगलीच धुलाई केली. त्याने मिड-ऑफ आणि मिड-ऑनच्या बाजूने मोठे हिट ऑफ केले. अशाप्रकारे सचिनने नाबाद १५५ धावा केल्या.

सचिनने आपल्या पहिल्या डावाची अख्खी कसर या दुसऱ्या डावात काढली

सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३२८ रन करून ७१ रनांची लीड घेतली होती. तर दुसऱ्या डावात भारताने जबरदस्त कामगिरी करत ४१८ रन केले होते. यात सचिनने नाबाद १५५ रनांची शानदार खेळी केली होती. 

आपल्या या कामगिरीसाठी सचिन तेंडुलकरला या मॅचमध्ये ‘मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील मिळाला.

लक्ष्मणच्या मते, शेन वॉर्न आणि सचिनमधला हा सर्वश्रेष्ठ सामना होता. 

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.