जगातला सर्वात येडा राजा म्हणून थायलंडचा राजा पहिला येईल अन् दूसरा नंबर…..

थायलंड हा एक रहस्यमय आणि भारतीय संस्कृतीशी जवळचा देश आहे जो आपल्या पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

थायलंडचा राजा आता कोण आहे हे सर्वांनाच ठाऊक नाही. थायलंडमध्ये अजूनही राजशाही आहे आणि बर्‍याच जणांचा असा विश्वास आहे की रामापासून थायलंड राजेशाही जपून आहे. नेपाळने आमच्याकडं आयुध्या आहे म्हणण्याच्या आधी तिथं ह्या नावाचं शहर होतं. आणि आता तिथं आलेला राजा दहावा राम ह्यांच्यामुळं जनता त्रस्त झाली आहे.

या देशात असणारे रामराज्य बघून आपल्याला भोवळ येण्याची शक्यता आहे.

1942 पर्यंत या देशाला सियाम म्हटले जात असे. जो थाई राजवंश आज थायलंडवर राज्य करीत आहे त्याचा सध्याचा शासक, महावाचीरॉन्गकोर्न, त्यानुसार या घराण्यातला दहावा राजा आहे. तिकडं राजाला राम हाच शब्द वापरला जातो.

राजाविरोधात आंदोलन करणे काय, नुसते ‘ब्र’ उच्चारून विरोध केला, तरी त्या कृत्यासाठी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते. अगदी मोठमोठ्या लोकांनाही ह्याचा प्रसाद मिळालेला आहे.

राजा आणि तिथल्या सत्ताधारी व्यक्तीला विरोध हा गुन्हाच धरला जातो.

स्वत: लष्करी व्यक्ती म्हणून दहाव्या रामाने देशामध्ये सैन्य व्यवस्थेचे आणि लष्करशाहीचे समर्थन केले आणि संविधान दुरुस्त केले, ज्याद्वारे त्याने निवडणुकीस स्थगिती दिली. त्यामुळं सध्या जनता राजाच्या विरोधात पेटून उठली असून गेले कित्येक दिवस थायलंडमधील रस्त्यांवर लोकांचे आंदोलन सुरू आहे विशेषतः युवा वर्गाने या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन राजाच्या विरोधात बोलल्यानंतर होणारी शिक्षा तसेच लोकांची दडपशाही कमी करावी व राजाचे अधिकारही कमी करावेत अशी मागणी केली आहे.

राजाने स्वतः आपल्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांनी निर्धास्त व्हावे व त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी घोषणा केली असली तरी बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

या राजाचा इतिहासही मोठा रंजक आहे.

आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर देशाच्या नॅशनल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने महावाचीरॉन्गकोर्न याला राजा घोषित केला कारण तो एकमेव वारस होता. सिंहासनावर चढल्यानंतर नवीन राजाने राम हे राजवंश नाव स्वीकारले, परंतु त्याने आपले “सांसारिक” नावही कायम ठेवले,

आणि म्हणून त्याला दहावा राम राजा महावाचीरॉन्गकोर्न म्हणून ओळखलं जातं.

थायलंडचा मागील राजा भुमुबोल अदुल्यादेज राम नववा यांना लोकांमध्ये मोठा सन्मान होता, तो जवळजवळ देवाईतकाच आदरणीय होता. थायलँड तसेच आशियाई देशातील अनेक प्रसिद्ध नटनट्यांनी एकत्र येऊन विविध संगीतकारांनी सोबत येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी “द गिफ्ट” सिनेमादेखील बनवला होता आणि या जुन्या संगीतकार राजाला श्रद्धांजली वाहिली होती.

हे राज्य 70 वर्षापर्यंत चालले आणि त्या काळात देशात शांतता, स्थिरता आणि आर्थिक व्यवस्था मजबूत झाली. त्यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ, राष्ट्रीय सुट्टी दिली जाते आणि हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापासून राम नववा लोकांच्या मनात घर करून बसले. केवळ देशाच्या भरभराटीसाठीच नव्हे तर करिश्मा आणि वैयक्तिक आकर्षण यासाठीही ते एक महान राजा होते.

मग कारटं असं का निघालं?

पहिलं कारण, तो आधीपासूनच, जडणघडणीत एक भिन्न व्यक्ती आहे! त्याने आपले तरुणपण युरोपमध्ये व्यतीत केले आणि त्याचे विचार आणि मूल्य थाई परंपरापासून खूप वेगळे आहेत. त्यांला राजकारणात रस नव्हताच.

त्यामुळं हे नवीन माणूस जुन्या राजाची जागा घेऊ शकला नाही.

त्याच्याबद्दल बर्‍याच अफवा आणि गप्पा मारल्या गेल्या, अजूनही मारल्या जातात. त्यामध्ये बाहेरचे संबंध आणि विलक्षण घडामोडी यांपासून ते विरोधीपक्षांसह खासकरुन, फ्युमिपॉनचा मुख्य प्रतिस्पर्धी, थॅकसिन शिनावात्रा अशा लोकांना संपवण्यासाठी प्रयत्न करणे असल्या उद्योगात त्याचं नाव घेतलं जातं.

उदाहरणार्थ,

आपल्या कुत्र्यावरचा त्याचा जीव. त्याच्या माजी पत्नीसह कुत्र्याचे फोटो त्याच्या वाढदिवशी वायरल झाले होते. हे कुत्रं मेल्यावर त्याच्या सन्मानार्थ चार दिवस शोककळा आयोजित केली गेली होती. त्याने आपल्या कुत्र्यासोबत बायकोला एका ताटात जेवू घातलं होतं, त्याचा व्हिडीओ तिकडं चांगलाच गाजला होता.

त्यानं आपल्या कुत्र्याला नौदलाचा प्रमुख बनवलं होतं.

बँकॉकमधील प्राथमिक शाळेनंतर, तरुण राजकुमारांना युरोपमध्ये शिक्षणासाठी पाठविण्यात आले: प्रथम इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियात. महावाचीरॉन्गकोर्न याने ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमधून पदवी घेतली, लष्करी पायलटची खासियत मिळविली आणि नंतर त्याने सैन्यात चांगले करियर केले.

सुरुवातीला राजकुमार एक लष्करी गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत होता, नंतर बटालियनचे कमांडर बनले आणि काही काळानंतर शाही वैयक्तिक रक्षकांच्या रेजिमेंटची नेमणूक करण्यास सुरवात केली.

आपल्या वडिलांनी मिळवलेल्या संपत्तीचा 30 अब्ज वाटा महावाचीरॉन्गकोर्न उपभोगत आहे. या ग्रहावरील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी तो एक असून राजा बनण्याआधी तो जेव्हा जर्मनीमध्ये राहिला तेव्हा तेथे 10 दशलक्ष युरोमध्ये डांगडींग करायला त्यानं एक इमारत विकत घेतली होती.

ह्या दहाव्या राम महावाचिरलाँगकॉर्न त्याच्या ब्रेकप्स आणि बिघडलेल्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखले जाते: सिंहासनावर चढण्याआधी त्यानं तीन वेळा विवाह केला गेला, आणि बरीच लफडी केली. तो एवढा प्रेमळ होता की त्याला त्याच्या आयुष्यात अनेक समस्या भोगाव्या लागल्या आणि विविध स्त्रियांपासून तो सात मुलांचा पिता झाला.

महावाचीरॉन्गकोर्न नाद माणूस आहे. कोरोनाचा कहर देशात माजला असताना थायलंडचा राजा जनतेला वार्‍यावर सोडून निवांत जर्मनीला गेला.

तोही एकटा नाय गेला तर चार पत्नी, २०शाही सहयोगिनी आणि असंख्य नोकरचाकरासोबत! कोरोनाकाळात शाही हॉटेल जगभर बंद होते पण, या राजासाठी जर्मनीतले शाही हॉटेल उघडले गेले आणि हॉटेलचा एक मजलाच राजासाठी उपलब्ध केला गेला.

थायलंडमध्ये १९३२ सालांपूर्वी राजघराण्यासाठी काही विशेष सवलती होत्या त्यापैकीच एक म्हणजे राजा पत्नी सोडून इतर अनेक स्त्रियांना सहयोगिनी म्हणून दर्जा देऊ शकतो. या सहयोगिनी म्हणजे राजाच्या गुलामच!

तर १९३२ साली हा नियम मानवी आणि नैतिक मूल्यांचे स्मरण करून मोडित काढण्यात आला. पण, २०१४ साली पुन्हा हा नियम पुनःस्थापित झाला तो आपल्या राजासाठी. तर मुद्दा हा की, थायलंडमध्ये नव्हे तर जगभरात कोरोना, ‘लॉकडाऊन’मुळे कितीतरी लोक अन्नाला मोताद होत टाचा घासून मेले. कितीतरी लोक उपचाराअभावी तडफडत अवेळी मेले.

मात्र, या अशा जागतिक आपत्तीमध्ये थायलंडचा राजा मौजमजेसाठी कुटुंबासोबतच नाही, तर २० सहयोगिनींसोबत जर्मनीला गेला म्हणल्यावर जनता बोंबलणार नाही मग काय करील?

त्याची एक बायकू जुवाहिदा या परिस्थितीपासून समाधानी नव्हती, आणि ती आपल्या मुलांना घेऊन आपल्या इंग्लंडला पळून गेली होती. त्यानंतर, युवराजाबरोबर राजाच्या मुलांनी आपल्या मायदेशात परत येण्यास नकार दिला आणि सर्व राजकीय विशेषाधिकार व अधिकार गमावले.

फक्त राजाची मुलगी थायलंडला परतली – राजकुमारी सिरीवंनावारी. मॉडेल आणि डिझाइनर म्हणून काम करणाऱ्या राजकुमारीला बरेच लोकं मानतात.

राजाचे दुसरे लग्न नावाचे एक सामान्य बाईसोबत श्रीराममी सोबत झालेलं. इतर गोष्टींबरोबरच, भ्रष्टाचाराच्या योजनेत गुंतलेली नवीन पत्नी आणि तिचे नातेवाईक देखील एक घोटाळ्यात सापडले. त्यामुळं माजी पत्नीच्या नातेवाईकांनी राजाची निंदा केली आणि मग राजाने सगळा वचपा काढत त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.

आता एवढ्या घडामोडी घडत असताना थायलंडमधील जनतेला न्याय मिळतो का की जगभरात सुरु असलेल्या कितीक आंदोलनासारखे हे आंदोलन अर्थहीन ठरते हे पाहावे लागेल.

म्हणूनच म्हणतो जगातला सर्वात येडा राजा म्हणून सर्वात पहिला नंबर थायलंडच्या राजाचाच लागेल आणि दूसरा नंबर लावायचा झाला तर तो आपल्या लाडक्या कुत्र्याला पुढे करेल..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.