इराकचा अतिरेकी बच्चनचा फॅन निघाला आणि हुसेन झैदी जिवंत सुटले…

ठार सिनेमावेडे लोकं बाकी आपल्या देशात भरपूर आहेत असं नाही तर परदेशातही आहेत. एका सिनेमाच्या कॅसेटमुळे एका क्राईम रिपोर्टरचा जीव वाचला होता, त्याबद्दलचा हा किस्सा. हा किस्सा पुढे मीडियामध्ये भरपूर चर्चेत आला होता. सिनेमाचा इम्पॅक्ट आणि सेलिब्रिटींची नाव किती महत्वाची आहेत ते या किस्स्यातून कळतं.

क्राईम रिपोर्टर हुसेन झैदी हे नाव साहित्यातलं आणि पत्रकारितेतलं मोठं नावं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, छोटा राजन, अरुण गवळी, अबू सालेम अशा अनेक लोकांचे इंटरव्हिव्ह हुसेन झैदी यांनी घेतले आहेत. मुंबई अंडरवर्ल्डवर डोंगरी ते दुबई, ब्लॅक फ्रायडे, भायखळा ते बँकॉक अशा अनेक पुस्तकांमध्ये हुसेन झैदी यांनी बारीकसारीक सगळी वर्णन आणि गुन्हेगारांचे प्रवास लिहिलेले आहेत. 

तर हुसेन झैदी यांचं अपहरण कस झालं आणि ते कसे वाचले हे बघूया. इराकमध्ये मोठी घटना घडली ती म्हणजे अमेरिकन सैन्याने सद्दाम हुसेनचा पाडाव केला. या घटनेच्या वेळी हुसेन झैदी इराकमध्ये होते. या घटनेची सगळी बारीकसारीक माहिती ते गोळा करू पाहत होते. सद्दाम हुसैनच्या जवळच्या नातेवाईकांना ते अजून डिटेलमध्ये या घटनेबद्दल विचारू पाहत होते.

या सगळ्या गडबडीत अचानक हुसेन झैदी यांचं अपहरण करण्यात आलं तेही इराकमध्येच. डोळ्यांवर काली पट्टी बांधून त्यांना एका गुप्त ठिकाणी नेण्यात आलं. इथं हुसेन झैदींचा जीव वाचवला तो अमिताभ बच्चनने ! ज्यावेळी हुसेन झैदी यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली गेली तेव्हा एक दाढीवाला पुरुष आणि एक क्लीन शेव्ह मधला पुरुष त्यांच्यासमोर उभे होते. क्लीन शेव्ह मध्ये असलेल्या माणसाचे केस भरपूर मोठे होते. 

त्या इसमाने हुसेन झैदींना विचारलं कि तू पाकिस्तानी आहेस का ? तेव्हा झैदी म्हणाले नाही मी हिंदी आहे, भारतातून आलो आहे. मग त्या किडनॅपरने अरबीमध्ये काहीतरी विचारलं पण झैदींना त्यातलं काहीच कळलं नाही. नंतर त्याने विचारलं कि तुला अमिषा बक्कन माहितीय का ? त्यावर झैदी म्हणाले मला फक्त अमिषा पटेल माहिती आहे.

यावर तो किडनॅपर चिडला आणि झैदींना शिव्या घालत म्हणला भारतातून आलाय आणि तु अमिषा बक्कनला ओळखत नाहीस ? तो रागाने दुसऱ्या खोलीत गेला आणि शक्ती ( १९८२ ) सिनेमाची कॅसेट घेऊन आला. त्याने ती कॅसेट झैदींच्या तोंडावर मारून फेकली. नंतर झैदींना जाणवलं कि तो माणूस शक्तीमधल्या अमिताभ बच्चनची कॉपी करत आहे.

यावर हुसेन झैदींना आनंद झाला आणि ते आनंदाने अमिताभ बच्चन म्हणून ओरडले. झैदींचा उत्साह बघून किडनॅपरला वाटलं कि झैदी आणि अमिताभ बच्चन मित्र आहेत कि काय. त्यावरून त्या किडनॅपरने हुसेन झैदींकडून एक चिठ्ठी लिहून घेतली कि ज्यावेळी मी मुंबईत येईन त्यावेळी तू मला अमिताभ बच्चनशी भेट घालून देणार. 

झैदींनी पटकन होकार दिला आणि त्या किडनॅपरने हुसेन झैदींना सोडून दिलं. अशा प्रकारे अमिताभ बच्चन या नावाने आणि शक्ती सिनेमाच्या कॅसेटने हुसेन झैदींचा जीव वाचवला होता. किडनॅपर लोकंसुद्धा बॉलिवूड फॉलो करतात  प्रचिती या घटनेवरून येते. हा प्रसंग हुसेन झैदींनीच एका मुलाखतीत सांगितला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.