चार्ली आणि हॅरीचा हा व्हायरल व्हिडीओ साडे पाच कोटींना विकला गेलाय…

२००७ मध्ये चार्लीने हॅरीच बोट चावलं होत आणि हॅरीने बोंब मारली होती…

काही आठवतंय का? यु ट्यूब वर शोधायला जाऊ नका काढलाय तो तिथनं..

राव हॅरी म्हणत नव्हता का,

“ओह, चार्ली! ओह! चार्ली बिट माय फिंगर!”

आठवलं का आता… तर या दोन पठ्ठ्यांनी आपला लहानपणीचा हा व्हिडिओ तब्बल ७,६०,००० डॉलर्स (५,५३,७७,७८० रुपये) ला विकलाय..

२००७ चा “चार्ली बिट माय फिंगर” हा इंटरनेट वरचा सर्वात व्हायरल व्हिडिओ 3fmusic नावाच्या कंपनीने ७,६०,००० डॉलर्स (५,५३,७७,७८० कोटी रुपये) ला लिलावात खरेदी केलाय.

इथ प्रश्न पडतो कि असं काय आहे त्या व्हिडिओत?

हा व्हिडिओ ब्रिटनमधला आहे. ५५ सेकंदांच्या या व्हिडिओ मध्ये एक लहान मूल, ज्याचं नाव चार्ली आहे आपल्या हॅरी नावाच्या भावाला बोटाला चावतो. हॅरी आपल्या भावाच्या तोंडावर बोट ठेवतो क्षणाचाही विलंब न लावता हे बाळ त्याच्या बोटाला कडकडून चावत. लहान भावाच्या चावण्यान हॅरी कळवळतो आणि ओरडून म्हणतो,

“ओह, चार्ली! ओह! चार्ली! इट रिअली हर्ट !”

ते ऐकून बाळ हसत. पुढं हॅरी म्हणतो,

“चार्ली बिट मी. ऍण्ड दॅट रिअली हर्ट, चार्ली, ऍण्ड इट्स स्टील हर्टींग”.

व्हिडिओत दिसणारी ही भावंडं हॅरी आणि चार्ली चांगलीच मोठी झाली आहेत. हॅरी १७ तर चार्ली १५ वर्षांचा झाला आहे.

२००७ मध्ये शूट केलेल्या या व्हिडिओला यूट्यूबवर ८८३ दशलक्षाहून जास्त व्हिव्ज मिळाले. अलीकडेच एनएफटी या डिजिटल ब्लॉकचेनद्वारे या व्हिडिओचा लिलाव केला गेला.

यात सांगितलेल्या टर्म्स प्रमाणे, व्हिडिओच्या विक्रीनंतर, व्हिडिओ कायमस्वरूपी यूट्यूब वरून काढून टाकला जाईल आणि व्हिडिओ विकत घेतलेल्या मालकास एक्स्क्लुजिव्ह ऍक्सिस मिळेल.

डेव्हिस-कॅर कुटुंबाने जेव्हा एनएफटी द्वारे हा व्हिडिओ विकायचा निर्णय घेतला तेव्हा तुफान बोली लावण्याचा कार्यक्रम झाला. यात 3fmusic ने सर्वाधिक बोली लावून हा व्हिडिओ विकत घेतला.

१४ वर्षांपूर्वीच्या या जुन्या व्हिडिओला विकत घेतल्यानंतर 3fmusic आता व्हिडिओच्या अनुषंगाने कोणता पण कंटेंट तयार करू शकेल.

बघा ! टाइमपास म्हणून चावताना केलेला व्हिडिओ एवढे पैसे देऊन गेला. आपली भारतीय टुकार पोर तर एखाद्याचा चावून तुकडाच काढतील, असो तर याठिकाणी आम्ही पण शंकरपाळ्याचा व्हिडीओ एक दोन कोटीला विकला जावा ही अपेक्षा ठेवून आहोत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.