जगभरात सर्वांधिक कमाई करणारे १० भारतीय सिनेमे.. यात एकाच डिरेक्टरचे ३ सिनेमे आहेत

पिक्चर आला की पिक्चर पाहिला आणि विषय संपला असं कधी होत नाय. लोकांना ॲक्टर लोक, त्यांचे गॉसिप्स, सिनेमाचा रिव्यू आणि रॅंकिंग, सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्या सगळ्यातही लय इंट्रेस्ट असतो.

म्हणून म्हटलं आज तुम्हाला सांगूया, भारतातल्या अशा १० सिनेमांबद्दल जे जगभरात हिट आहेत आणि भारतातल्या ह्या १० पिक्चर्सनी जगभरात सगळ्यात जास्त कमाई करून हवा केलीये.

दहाव्या नंबरवर आहे संजू सिनेमा

Screenshot 2022 04 16 at 7.09.36 PM

संजू हा पिक्चर बॉलीवुड गाजवलेल्या संजय दत्तवरचा बायोपिक आहे. २९ जून २०१८ साली हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी ह्यांनी केलंय. ह्या सिनेमात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूरने काम केलंय, शिवाय सिनेमात विकी कौशल, सोनम कपूर, परेश रावल यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचं बजेट ९६ करोड रुपये होतं आणि सिनेमाने ५८६ करोंड रुपये गल्ला जमवला.

नवव्या नंबरवर येतो सुलतान

Screenshot 2022 04 16 at 7.09.59 PM

सलमान खानचा सुलतान हा पिक्चर ६ जुलै २०१६ साली आला. ह्या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर ह्यांचं होतं, आणि प्रोड्यूस केला आदित्य चोप्राने. तर पिक्चरमध्ये सलमान खान सोबतच अनुष्का शर्मा आणि रणदीप हूड्डा ह्यांनीही काम केलं. सुलतान सिनेमाने आत्तापर्यंत १४५ करोंड बजेटमध्ये ६२३ करोड रुपये कमावले.

आठव्या नंबरवर येतो बाहुबली 1

Screenshot 2022 04 16 at 7.10.30 PM

१० जुलै २०१५ साली आलेल्या ह्या सिनेमाने ६५० करोंड कमावले आणि सिनेमाचं बजेट १८० करोड रुपये होतं. हा सिनेमा तामीळ आणि तेलगू भाषेत बनवला गेला, आणि नंतर सिनेमाचं इतर भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. ह्या सिनेमात प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना आणि राम्या कृष्णन अशा भन्नाट कलाकारांनी काम केलय आणि दिग्दर्शन केलंय राजामौली यांनी.

लिस्ट मधला सातवा पिक्चर आहे Robot 2.0

Screenshot 2022 04 16 at 7.10.59 PM

Robot 2.0 म्हणजे आत्ता पर्यंतची सगळ्यात बिग बजेट फिल्म आहे. सिनेमाचं बजेट ५०० करोंड आहे तर कमाई आहे ८00 करोड रुपयांची. सिनेमात रजनीकांत, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय आणि एमी जॅकसन यांनी काम केलय.

२९ नोव्हेंबर २०१८ साली आलेला आणि सायन्सवर आधारीत असलेला हा सिनेमा एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे.

सहाव्या नंबरावर आहे आमीर खानचा PK हा सिनेमा

Screenshot 2022 04 16 at 7.11.18 PM

ह्या सिनेमात आमीर खानची ॲक्टिंग वाखाणली गेली. सिनेमाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी होते तर निर्मिती सिद्धार्थ कपूर यांची होती. १९ डिसेंबर २०१४ साली आलेल्या ह्या सिनेमात आमीर खान सोबतच अनुष्का शर्मा, संजय दत्त, बोमन ईरानी आणि सुशांत सिंह राजपूत हे कलाकार होते. सिनेमाचं बजेट ८५ करोंड इतकं होतं तर सिनेमाची कमाई ८५४ करोंड एवढी झाली.

लिस्टमध्ये पाचव्या नंबरवर आहे सीक्रेट सुपरस्टार पिक्चर.

Screenshot 2022 04 16 at 7.11.55 PM

सीक्रेट सुपरस्टार म्हणजे आमीर खानचा अजून एक जगभरात गाजलेला आणि यशस्वी ठरलेला सिनेमा. १९ ऑक्टोबर २०१७ साली आलेल्या सीक्रेट सुपरस्टार पिक्चरने बॉक्स ऑफिसवर, तब्बल ९६६ करोड रुपयांचा गल्ला जमवला. सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन ने केलं होतं आणि निर्मिती आमीर खान आणि किरण राव यांची होती.

लिस्टमधला चौथा पिक्चर आहे आपल्या सल्लूभाईचा बजरंगी भाईजान

Screenshot 2022 04 16 at 7.12.23 PM

सलमान खानच्या मोस्ट सक्सेसफुल सिनेमांमध्ये बजरंगी भाइजान ह्या सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ह्या सिनेमाने आत्तापर्यंत ९६९ करोड रुपयांची कमाई केलीये आणि ह्या सिनेमाचं बजेट होतं ९० करोड रुपये.

१७ जुलै २०१५ साली आलेल्या बजरंगी भाईजानची निर्मिती स्वतः सलमान खान, रॉकलिन वेंकटेश आणि कबीर खान यांनी केली होती तर दिग्दर्शन कबीर खान यांचं होतं. सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत सलमान खान, हर्षाली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि करीना कपूर खान होते.

तिसऱ्या नंबरवर येतो तो नुकताच येऊन हीट झालेला RRR हा सिनेमा.

Screenshot 2022 04 16 at 7.12.44 PM

२५ मार्चला हा सिनेमा रिलीज झाला आणि ह्या पिक्चरने आत्ताच तब्बल १०५० कोटी कमावलेत. हा ही सिनेमा तेलगू भाषेतला असून डायरेक्शन राजामौली यांचं आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या RRR मध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनाही कास्ट केलंय. सिनेमाचं बजेट होतं ५५० कोटी रुपये.

RRR च्या जागतिक मार्केटचं बोलायचं तर, हा पिक्चर भारतातच नाही तर परदेशातही हवा करतोय. RRR इंग्रजी, पोर्तुगीज, कोरियन, तुर्की, स्पॅनिश, जपानी आणि चीनी भाषेत रिलीज झाला. शिवाय @indianfilmsrussia_students, या इंस्टाग्राम पेजनुसार RRR पिक्चर रशियामध्ये जवळपास ५६ शहरांमध्ये रिलीज झाला.

खास म्हणजे ज्युनियर एनटीआर हा जपानमध्ये खूप फेमस आहे त्यामुळे त्याचे पिक्चर आले रे आले कि त्याचे जपानी फॅन्स ते बघायला जातात. शिवाय यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मिडल ईस्टमध्येही हा पिक्चर मोठ्या स्क्रीनवर रिलीज झालाय. आणि या सगळ्या देशांमध्ये, RRR ने एकूण ७५ कोटींची कमाई केलीये.

लिस्ट मधलं दुसरं नाव आहे ते बाहुबली 2 सिनेमाचं

Screenshot 2022 04 16 at 7.13.07 PM

बाहुबली 2 सिनेमाने १८१० करोड रुपयांची कमाई केलीये. बाहुबली 2 सिनेमाचं बजेट होतं २५० करोड रुपायांचं. बाहुबली 1 प्रमाणेच बाहुबली 2 हाही सिनेमा पहिले तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये बनवला गेला आणि नंतर ह्या सिनेमाचं इतर भाषांमध्ये डबिंग केलं गेलं.

ह्या पिक्चरने कित्येक रेकॉर्ड बनवले नी कित्येक रेकॉर्ड मोडले. २८ एप्रिल २०१७ साली रिलीज झालेल्या बाहुबली 2 चा डायरेक्टर राजामौलीच आहे आणि बाहुबली 1 आणि 2 ह्या दोन्ही सिनेमांची स्टारकास्ट जवळपास सेम आहे.

आणि आता लिस्ट मधलं पहिलं नाव आहे दंगल सिनेमाचं.

Screenshot 2022 04 16 at 7.13.30 PM

दंगल पिक्चरने कमाई केलीये तब्बल २०२४ करोड रुपयांची आणि ह्या पिक्चरचं बजेट होतं ७५ करोड रुपयांचं. २३ डिसेंबर २०१६ साली रिलीज झालेल्या ह्या सिनेमाचा निर्माता, आमीर खान होता तर लेखन, दिग्दर्शन केलेलं नितीश तिवारी यांनी.

दंगल हा भारतातला सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा तर होताच पण तुम्हाला सांगून पटणार नाही ते म्हणजे दंगलने सगळ्यात जास्त कमाई चीनमध्ये केली. या सिनेमात स्वतः आमीर खान, साक्षी तनवर, सानिया मल्होत्रा, फातीमा साना शेख, झायरा वासिम आणि सुहानी भटनागर अशी स्टार कास्ट होती.

आता तुम्हाला ह्यातले काही सिनेमे डीझरविंग वाटतील काही ओवररेटेड वाटतील तो भाग वेगळा पण ही होती जगभरात जास्तीत जास्त कमाई करून हवा केलेल्या १० भारतीय सिनेमांची नावं.

हे ही वाचा 

Leave A Reply

Your email address will not be published.