तिच्या क्युट दिसण्यामुळेच तिला “सर्वाधिक रेप सीन देणारी हिरोईन” म्हणून ओळख प्राप्त झाली. 

रेप सीन, एकेकाळी हिरोचा बदला घेण्यासाठी वापरण्यात येणारं महत्वाचं अस्त्र. हिरो ऐकत नाही तर त्याच्या बहिणीला उचलून आणा. हिरोईन ऐकत नाही तर तिच्या बहिणीला उचलून आणा. काहीही झालं असेल तर हिरोची बहिणचं. एकेकाळी हिंदी सिनेमा बलात्काराच्या सीन शिवाय पुर्ण होत नसे.

तेव्हा हिरो किंवा हिरोईच्या बहिणीच्या वाट्यालाच असा रोल येत असे. अशा या अभागी बहिणीचाच रोल आयुष्यभर वाट्याला आलेली हिरोईन म्हणजे, 

नाजिमा.  

नाजिमा हि साठ आणि सत्तरच्या काळातील सहाय्यक अभिनेत्री होती. तिने वयाच्या २२ वर्षांपासून ते २७ वर्षांपर्यन्त फक्त एकाच पिक्चरमध्ये लिड रोल केला होता. ती प्रत्येक पिक्चर हिरो किंवा हिरोईनच्या बहिणीचाच रोल करायची. या मागे तिचं क्यूट दिसणं हे सर्वात महत्वाच कारण सांगितलं जात. नाजिमा सुंदर असण्या बरोबरच क्यूट दिसायची. तिझा तो इनोसन्सपणा पाहूनच तिला डॉयरेक्टर छोट्या बहिणीचा रोल देत असत.

असे रोल मिळल्यामुळेच कथेची गरज म्हणून ती जवळपास सर्वच पिक्चरमध्ये रेपचा सीन देत गेली. 

रेप सीन देणं तिच्यासाठी गरजेचं होतं.

सिनेप्लॉट नावाच्या १९६८ साली आलेल्या साप्ताहिकामध्ये नाजिमाची मुलाखत छापण्यात आली होती. यात ती म्हणते मला कधीतरी लिड रोल मिळेल या आशेवर मी पिक्चर स्वीकारते. मात्र मला पुन्हा बहिणीचाच रोल मिळतो. माझ्याकडे करण्यासारखं दूसरं काहीच नसल्यानं मला या भूमिका करणं महत्वाचचं आहे. 

वयाच्या २७ व्या वर्षींच मृत्यू.

कधीतरी आपण लीड रोल करु या आशेवर जगणाऱ्या नाजिमाचा मृत्यू देखील करियरच्या चांगल्या काळातच झाला. वयाच्या २७ व्या वर्षीच तिला कॅन्सर असल्याचं निदान झाल. या अवस्थेत देखील ती पिक्चर करतच होत. 

मृत्यूनंतर रिलीज झालेले पिक्चर.   

नाजिमाचा मृत्यू झाला तो १९७५ साली. तिच्या मृत्यूनंतर रंगा खूष आणि सन्यांशी हे तिचे दोन पिक्चर रिलीज झाले.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.