दुसऱ्या महायुद्धात कोरियन महिलांवरील अत्याचारांमुळे जपानला आजही मान खाली घालावी लागते

रशिया- युक्रेनच्या युद्धानं सगळं जग हादरलयं. रशियाच्या हल्लानं युक्रेनची राजधानी कीवसोबत बरीच शहरं उद्ध्वस्त झालीत. युक्रेनची जनता आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या जागी लपून बसलीये. बरीच जण देश सोडून गेलीत, तर बाकीची सुद्धा त्याचं मार्गावर आहेत.

पण  युक्रेनियन बॉर्डर गार्ड सर्व्हिसने १८ ते ६० वयोगटातील सर्व युक्रेनियन पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातलीये, जेणेकरून ते आवश्यक असल्यास सैन्यात सामील होऊ शकतील. तर महिला आणि लहान मुलांना आसपासच्या भागात जायला सांगितलय.

पण आम्ही सुद्धा देशासाठी काही देणं लागतो, असं म्हणतं काही महिलांनी सुद्धा बंदूका उचलल्यात.  पण या आधीच्या म्हणजे  दुसऱ्या महायुद्धात  महिलांचा वापर केला गेला पण सैनिक म्हणून नाही तर भूक भागवण्यासाठी…शरीराची भूक भागवण्यासाठी…

१९३९ ते १९४५ दरम्यान चा काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा. ३० देशांमधल्या या युद्धात अर्थात  जपान पॉवरफुल होता. जपानचे लाखो सैनिक युद्ध लढत होते, त्यामुळं तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या राशन-पाण्याची आणि दारूगोळ्याची सुद्धा सोय केलेली. पण गरज होती शरीराच्या भुकेची आणि त्यासाठी मुली नव्हत्या. लढाई वरून दमून आलेल्या सैनिकांची ही गरज भागवणं जपानला गरजेचं वाटलं.

मग काय संघटित जपाननं यासाठी सुद्धा मार्ग काढला. सैनिकांच्या शारिरीक गरजेसाठी त्यांनी मुली आणायचं ठरवलं पण जपानमधल्या नाही तर कोरिया, चीन आणि फिलीपीन मधल्या. जपान त्यामुलींना   पकडून त्यांना कम्फर्ट स्टेशन मध्ये डांबून ठेवायचे. जिथं त्या मुलींना सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलं जायचं.

विरोध करणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात येत

जवळपास ४०० मुलींना सुमारे ५ हजार जपानी सैनिकांची  शारीरिक गरज पूर्ण करायची होती.  म्हणजे १ मुलगी आणि ४० ते ५० जपानी सैनिक आणि विरोध करणाऱ्या मुलीला शिक्षा म्हणून सामूहिक बलात्कार केला जायचा तो सुद्धा सगळ्या मुली समोर, एवढेच नाही त्या मुलीला बंदुकीने मारहाण करून मारून टाकले जायचं, त्यासाठी गोळी वाया घालवली जात नव्हती.

चित्र एवढचं भयानक होत की, या  मुली गरोदर राहू नयेत म्हणून जालीम उपाय करण्यात येत होता. त्यांना दर आठवड्याला एक इंजेक्शन दिलं जायचं, ‘ नंबर ६०६’ नावाचं. या इंजेक्शनमध्ये एक केमिकल होतं, जे रक्तवाहिनीत मिक्स होऊन गरोदर राहण्यापासून थांबायचं.

जपानी सैनिकांकडून होणारा त्रास काय कमी होता, त्यात या इंजेक्शनचे साईड इफेक्ट भलतेचं, म्हणजे  आधीच मेलेल्या शरीराची भूक सुद्धा भरायची, आतड्यांच्या नुसत्या पिळ्या पडायच्या, २४ तास डोकेदुखी आणि शरिराच्या आतल्या भागातून रक्त पडायचं ते वेगळं.  एवढे सगळे ऐकून अंगावर काटा येतोय ना…..पण त्यावेळी जपानी सैनिकांची गरज भागवणं हे एवढंच टार्गेट होतं.

नवीन असलेल्या मुलींवर आधी बड्या अधिकाऱ्यांनी बलात्कार करायचे, मग त्या जुन्या झाल्या की खालच्या लेवलच्या सैनिकांकडं सोडलं जायचं, पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे रोज पन्नास पुरुषांची भूक भागवायची.

जपानी सैनिक दिवसभर युद्धाचा असलेल्या सगळा राग, सगळी चिडचिड या महिलांवर काढायचे,  कधी मारून हाणून तर कधी सिगारेटचे चटके देऊन रेप व्हायचा. या दरम्यान जर एखाद्या मुलीला लैंगिक आजार जडला की, तिला  रात्रीतून गायब केलं जायचं.

युद्धाच्या काळातल्या या अशा कथा आहेत, ज्या कधी पुसल्या जाणार नाहीत, सॅन फ्रान्सिस्को मधला तो कंफर्ट वुमनचा तो पुतळा आजही त्या घटनेचा साक्षीदार आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.