अजूनही बड्या देशांचं मत आहे की कोरोना विषाणू चीन ने लॅबमध्ये निर्माण केलाय..?

जवळपास एक वर्ष उलटून गेले आणि अजूनही संपूर्ण जग कोरोना विषाणूलालढा देत आहे. अवघ्या  एका विषाणूमुळे सगळं जग ठप्प झालं परंतु एक प्रश्न मात्र अजून सुटला नाही, तो म्हणजे हा कोरोना विषाणू नेमका माणसांमध्ये कसा संक्रमित झाला ?

हे एक नैसर्गिक संकट आहे कि मानवाने निर्माण केलेला विषाणू आहे ?

संपूर्ण जगभर हा विषाणू पसरवणे हा एक पूर्वनियोजित कट होता की,

‘ऍक्सीडेन्टल लॅब लिक’?

चीनमधल्या वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार झाला आणि तो हेतुपूर्वक जगभर पसरवला असं मध्यंतरी बऱ्याच चर्चा चालू होत्या. परंतू सर्वांनी याला एक कॉन्सेपरेन्सी थिएरी म्हणुन दुर्लक्ष केले. पण या कोस्पेरेन्सी थेअरीला फक्त चर्चेपुरतं मर्यादित न ठेवता त्याचा सखोल तपास झालाच पाहिजे असं अमेरिकेने आता मनावरच घेतलंय.

त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना आदेश दिला कीं, या सर्व प्रकरणाचा तपास करून 90 दिवसात त्याचा अहवाल सादर करावा.

पुन्हा एकदा चर्चेत आलेली हि ‘लॅब लीक थेअरी’ काय आहे ?

२०२० मध्ये जेव्हा या थेअरी बद्दल बोललं जात होतं तेव्हा त्याला फारसं गांभीर्याने कोणत्याच देशाने घेतले नव्हते. पण तेव्हा एकच नेते असे होते ज्यांनी या थेअरीला वारंवार समोर करून स्वतःच्या अपयशाचे खापर चीनच्या डोक्यावर फोडत होते.

तेव्हा वैज्ञानिकांनी या थेअरी प्रकरणाला विरोध केला होता खरा परंतु आता तेच वैज्ञानिकांचा गट म्हणतोय की या थेअरीला आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही त्यामुळे याचा तपास झालाच पाहिजे.

२००२ मध्ये एक सार्स नावाचा एक आजार फैलावत चालला होता.

जंगली वटवाघुळं यांच्यात हा व्हायरस सापडला होता. त्यांच्यापासून तो व्हायरस सिविट नावाच्या प्राण्यात पसरला. त्यानंतर हा सिविट प्राण्याला विक्रीसाठी मांस बाजारात आणले गेले, माणसांच्या संपर्कात आलेला हा बीटा व्हायरस सगळीकडे पसरत गेला.

चीनने सांगितल्याप्रमाणे वूहानच्या याच मांस बाजारातून कोरोना विषाणूही पसरला गेला. जेंव्हा संक्रमित होणारया विषाणूवर संशोधन करण्यात आले तेंव्हा समोर आले कि कोरोना आणि बीटा विषाणूशी 96 टक्के मिळताजुळता आहे. त्यामुळे हा हि एक तर्क लावला जातोय की,

कोरोना हा विषाणू वाईल्ड लाइफ शी सबंधित आहे.

पण पुन्हा हा एक तर्क असाही समोर आला आहे की,

सुरुवातीला कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांचा आणि या मांस बाजाराचा काहीही सबंध नव्हता.

आता वळू या सर्वात मोठ्या लॅब थेअरी कडे, 

म्हणजेच लॅब थेअरी. चीनने सार्स व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा बांधली आणि त्याच लॅब मधून  व्हायरस लीक होण्याची शक्यता अमेरिकेच्या बायोसेफ्टी एक्सपर्ट्सनी व्यक्त केली. आणि ह्याच बद्दल शहानिशा करण्यासाठी गेल्या जानेवारी महिन्यात जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

परंतु ही चौकशी अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचली नसल्यामुळे आता बायडन यांनी आता  ९० दिवसांची मुदत या टीम ला दिली आहे.

त्यांनी त्यांच्या सिक्रेट मिशनला दिलेल्या सूचनांनुसार,

ही टीम चीनमधील विविध लॅबमध्ये चौकशी करेल ज्यात वूहानच्या लॅबचा हि समावेश आहे. अमेरिका सरकारने म्हणले आहे कि, या चौकशीदरम्यान चीन सरकारने आवश्यक ती मदत आणि कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीपासूनची माहिती आणि कागदपत्रे, रेकॉर्ड्स पुरवावे ते आपल्या सर्वासाठी महत्वाचे आहे.  

पण यामुळे बायडन यांच्यावर अशी टीका होतेय की,

या प्रकरणाची अमेरिकन संसद आणि परराष्ट्र मंत्रालय करत असलेली चौकशी थांबवून ते आता स्वतःच या प्रकरणी चौकशी करून घेण्यासाठी हट्टाला पेटलेत तसेच चीन सरकारबाबत संशय निर्माण करून या संकटाची जबाबदारी ते चीन सरकार आणि WHO वर टाकत आहेत.

WHO ने केलेल्या तपासात काय आढळले ?

WHO ची एक वैज्ञानिकांची एक टीम जानेवारी महिन्यात वूहान शहरात राहायलाही गेले होते, त्यांच्यासोबतच चीनी वैज्ञानिक देखील होते. ४ आठवड्यांचा अभ्यास करून त्यांनीही तोच निष्कर्ष समोर ठेवला की, वटवाघूळ प्राण्यांपासून हा विषाणू माणसात संक्रमित झाला आहे.

या चौकशीबाबत चीन सरकारने प्रतिक्रिया दिली आहे की,

याधीही WHO ने आणि चीनी संशोधकांनी याबाबत चौकशी केली असून सर्वांचा एकच निष्कर्ष आहे जो जगाच्या समोर आहे. अमेरिका यात राजकारण करीत असून या महामारीचा संपूर्ण दोष चीनवर ठेवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत.

यात भारताचे काय म्हणणे आहे ? 

या प्रकरणाबद्दल भारत परराष्ट्र मंत्रालयाने आपले म्हणणे जाहीर केले कि,  कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतचा तपास करण्यासाबंधीचा  World Health Organization चा हा निर्णय अगदी योग्य आहे, आता तपासाची पुढील योजना कशी असेल हे पाहणे खूप महत्वाचे आहे कारण आपल्याला एका निष्कर्षपर्यंन्त पोहचणे गरजेचे आहे. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.