ईस्ट इंडिया कंपनीने एका जमिनीच्या तुकड्यावर मद्रास शहर उभारलं…

चेन्नई शहर म्हणजे तामिळनाडूची राजधानी. आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरेमुळे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा या शहराला ओळखलं जात. ज्या शहराला आधी मद्रास नावाने ओळखलं जायचं. जवळपास ७० लाख लोकसंख्या असलेले हे शहर जगातलं ३१ वं सगळ्यात मोठं शहर मानलं जात.

तसं पाहिलं तर या शहराचा इतिहास ४०० वर्ष जुना मानला जातो, पण इतिहासाच्या दृष्टीनं ते २ हजार वर्ष जून आहे. असं म्हंटल जात कि, दुसऱ्या शतकात हा चोल साम्राज्याचा भाग होता. तोडाईमंडलम प्रांतात मद्रास पट्टणम नावाचे एक छोटेसे गाव असायचे.

तर, १६३९ साली ईस्ट इंडिया कंपनीने विजयनगरचा राजा वेंकटरायकडून चंद्रगिरीमध्ये जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आणि आधुनिक मद्रासचा जन्म झाला. येथेच सेंट फोर्ट जॉर्ज बांधले गेले जे शहरातील महत्वाचे केंद्रबिंदू होते. या भागावर वेंकटपती यांचे राज्य होते, जे या भागाचे नायक होते. त्याने ब्रिटिश व्यापाऱ्यांना तेथे कारखाना आणि गोदाम बांधण्याची परवानगी दिली.

असे मानले जाते की शहराचे मद्रास हे नाव “माद्रे-डी-सॉइस” नावाच्या पोर्तुगीज सरकारी अधिकाऱ्याच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

अठराव्या शतकाच्या अखेरीस, ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण आधुनिक तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग जोडला आणि मद्रास प्रेसीडेंसीची स्थापना केली होती, ज्याची राजधानी मद्रास घोषित करण्यात आली. ब्रिटिश सरकारनं ते एक मोठे शहर आणि नौदल तळ म्हणून विकसित केले. विसाव्या शतकापर्यंत, मद्रास एक प्रमुख प्रशासकीय केंद्र बनलं.

१६८८ मध्ये इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ही नगरपालिका देशातली पहिली महानगरपालिका आहे. जनतेनं थेट मतदान करून महापौर आणि उप-महापौर निवडून द्यावा, ही सिस्टीम मद्रास मधून सुरु झाली. 

दरम्यान, मद्रास हे नाव पोर्तुगीज असल्याचे मानत १९९६ मध्ये तामिळनाडू सरकारने अधिकृतपणे ‘चेन्नई’ हे नामकरण केले.

पुढे हळू- हळू या शहरात वस्ती वाढली, ज्यामुळे उद्योगधंदे भरभराटीला आले आणि आज ते एक मोठं मेट्रोपोलियन शहर म्हणून ओळखलं जात. क्वालिटी ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात चेन्नईला भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून रेटिंग देण्यात आलंय.

चेन्नईमध्ये ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान, हार्डवेअर उत्पादन आणि आरोग्यसेवेशी संबंधित उद्योग आहेत. हे शहर भारतातील सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान उत्पादनांची दुसऱ्या क्रमांकाचं निर्यातदार आहे. चेन्नई आणि त्याच्या उपनगरांमध्ये ऑटोमोबाईल उद्योग विकसित झाला आहे. चेन्नई विभगाचा तामिळनाडूच्या जीडीपीमध्ये ३९ टक्के आणि देशाच्या ऑटोमोटिव्ह निर्यातीत ६० टक्के वाटा आहे. या कारणास्तव या शहराला दक्षिण आशियाचा डेट्रॉईट असेही म्हंटले जाते.

हे शहर जितकं जरी वेगाने धावणाऱ्या शहरांत गणलं जात असलं तर तिथल्या लोकांनी आपला आधुनिक वारसा अजूनही तसाच जपून ठेवलाय. चेन्नई शास्त्रीय नृत्य-संगीत आणि मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथल्या भागात हजरो वर्षांपूर्वीची मंदिर अजूनही जशीच्या तशीच आहेत. कारणं या शहरं आपला ऐतिहासिक वारसा जपून ठेवलाय.

इथल्या फिल्म इंडस्ट्रीला कॉलीवुड म्हणून ओळखलं जात.

हे शहर पर्यटनासाठीही विशेष प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वास्तूंबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध अश्या या शहराला अनेक विदेशी पर्यटक भेट देत असतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.