बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या ५०-५० फॉर्मुल्याची प्लॅनिंग करतंय
पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वादळ सुरुये. निवडणुकीला जेमतेम १५ चं दिवस उरलेत. अश्यात उमेदरवारी, रॅली, प्रचार, आश्वासनांची यादी, राजकारण असा सगळाच गोंधळ सुरुये. या दरम्यान जवळपास सांगल्याच पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलाय.
म्हणजे आम आदमी पक्षाकडून भागवत मान सिंग यांना उमेदवारी देण्यात आलीये, भाजप अजून तळ्यात मळ्यातचं सुरुये, कारण पक्षानं पक्षानं राज्यात अनेक छोट्या मोठ्या पक्षांसोबत युती केलीये अश्यात सगळ्यांची विचार विनियम करूनच पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा तर पक्षानं आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आणि पक्षांतर्गत भांडण थांबवण्यासाठी नवीन खेळ खेळणार असल्याचं म्हटलंय.
म्हणजे पंजाब काँग्रेसमध्ये चरणजीत चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. कारण दोन्हीही तिथे बडे आणि महत्वाचे चेहरे आहेत. नवज्योतसिंग सिद्धू हे शीख समुदायाचा चेहरा आहे तर चन्नी यांचा दलित चेहरा वापरून काँग्रेसने राज्यात पहिल्यांदाच दलित कार्ड खेळलंय. त्यामुळे पक्षाला जरा तरी सहानुभूती मिळालीये. त्यामुळे पक्षाला ती गमवायची नाहीये. त्यामुळे पक्षाला या दोन्ही नेत्यांना अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पद देणार असल्याचं जाहीर केलंय.
मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला मुख्यमंत्री कोण होणार, हे पक्षाचे आमदार ठरवतील. कारण पंजाब निवडणुकीतील व्होटबँकेचे गणित असं काही आहे की, काँग्रेस कोणाचेही नाव घेऊन धोका पत्करू शकत नाही. तरी पंजाबमध्ये काँग्रेस ६ तारखेपर्यंत आपला मुख्यमंत्री चेहरा जाहीर करणार असल्याचं समजतंय. त्यासाठी राहुल गांधी लुधियानात येणार आहेत. व्हर्च्युअल रॅलीद्वारे ते दुपारी २ वाजता लुधियाना येथून मुख्यमंत्रिपदाची घोषणा करतील. राहुल यांच्या व्हर्च्युअल रॅलीचे पंजाबमधील ११७ विधानसभा जागांवर थेट प्रक्षेपण केले जाईल.
आता आपण जर चरणजीत चन्नी यांच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं तर, चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री न केल्यास काँग्रेस थेट ३२% दलित व्होट बँक गमावेल. काँग्रेसने चन्नी यांची बाजू सोडल्यास दलितांमध्ये चुकीचा संदेश जाईल. केवळ मते मिळवण्यासाठी काँग्रेसने चन्नी यांना तात्पुरता मुख्यमंत्री बनवल्याचा शिक्का पक्षावर बसेल. त्यात काँग्रेस आता चन्नी यांच्या फक्त १११ दिवसांच्या कामावर मतं मागत आहे.
तर नवज्योत सिद्धू यांच्या बाजूने विचार केला तर पंजाबमध्ये काँग्रेससाठी नवज्योत सिद्धू हा मोठा चेहरा आहे. सिद्धूवर बाजी लावून काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्र्याची खुर्ची हिसकावून घेतली. एवढंच नाही तर सिद्धूच्या सांगण्यावरूनचं अनेक जागांवर तिकिटे देण्यात आली. त्यात नवज्योत सिद्धूकडे दुर्लक्ष केल्यास पंजाबमधील १९% जाटशिख व्होट बँकेचे थेट नुकसान होईल. पंजाबमध्ये केवळ दलितांवर डाव खेळत असल्याचा संदेश काँग्रेसला द्यायचा नाही. त्यामुळे सर्वाधिक ६९ जागा असलेल्या माळवा भागात काँग्रेसचे मोठे नुकसान होईल.
महत्वाचं म्हणजे काँग्रेसला भीती आहे की, जर सिद्धू मुख्यमंत्री चेहरा बनले नाहीत तर ते अचानक असे पाऊल उचलू शकतात ज्यामुळे मधल्या निवडणुकीत काँग्रेसची अडचण होईल. डीजीपी आणि अॅडव्होकेट जनरल न बदलण्याच्या मुद्द्यावरून सिद्धू यांनी यापूर्वीच राजीनामा देऊन काँग्रेस हायकमांडच्या तोंडच पाणी पळवलंय. अशा स्थितीत निवडणुकीत पक्षाचे नुकसान होणार असून, विरोधकही या मुद्दय़ाला बराच रोखून धरतील,अशी पक्षाला भीती आहे.
आता पंजाबचं जातीय समीकरण पाहिलं तर, राज्यात एकूण लोकसंख्येच्या ३८.४९ टक्के हिंदू आहेत, ३१.९४ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहेत, १९ टक्के जटसिख आहे तर १०.५७ टक्के इतर जातीचे लोक आहेत. अश्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदू व्होटबँकेत काँग्रेसची मोठी अडचण होतेय. त्यांचा मोठा हिंदू चेहरा सुनील जाखड प्रचारापासून दूर आहेत.
कारण पक्षात ४२ आमदार असूनही काँग्रेसने जाखड यांना हिंदू असल्याने मुख्यमंत्री केले नाही, असा मुद्दा चर्चित आला होता. त्यामुळे पंजाबला हिंदू समुदायात आपला जम बसवणं अवघड आहे. त्याचवेळी शहरांमध्ये कॅप्टन आणि भाजपची युती काँग्रेससाठी हिंदू व्होट बँकेलाही हानी पोहोचवू शकते. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेससाठी दलित आणि जाटशिख व्होट बँक आवश्यक आहे, अशा परिस्थितीत चन्नी-सिद्धू जोडीवर बाजी खेळणं काँग्रेसची मजबुरी बनलीये.
आणि अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानंतर, नवज्योत सिद्धू आणि चरणजीत चन्नी आपल्या समर्थक उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, जेणेकरून ते आधी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस पूर्ण जोर लावणार आहे.
हे ही वाच भिडू :
- सिद्धूने फिल्डिंग लावली होती पण पंजाबचे नवीन कॅप्टन बनले चरणजितसिंह चन्नी .. !
- पंजाबमध्ये चर्चाय, नवज्योतसिंग सिद्धू आणि केजरीवाल जवळ येत आहेत
- वाराणसीतल्या या जत्रेमुळं अख्या पंजाबची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे