छोट्याशा टपरीवर चहा विकून हे जोडपं २६ देश फिरले आहे..!

फिरायला जायचं असेल तर सर्वात मोठ्ठा अडथळा असतो तो पैशांचा. पैसे नाहीत त्यामुळे बाहेरच्या देशात फिरायला जाता येत नाही हे आपलं कारण असत. चुकून पैशांची सोय झालीच तर वेळ नाही हे दूसरं आणि महत्वाचं कारण असत.

आत्ता हे दोन्ही गोष्टी देखील महत्वाच्या आहेत की नाहीत याच उत्तर आपणाला के आर विजयन आणि त्यांची पत्नी मोहना यांच्याकडे पाहून कळतं.. 

केआर विजयन आणि त्यांच्या पत्नी मोहना.

यातील गोष्टीतील केआर विजयन याचं मागच्या वर्षी म्हणजे 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे अगदी सर्वसामान्य जीवन जगत असताना त्यांनी फिरलेले देश. 

एखादा दुसरा देश किंवा एखादं दूसरं शहर नाही तर चहा विकून या जोडप्याने त्यांच्या आयुष्यात तब्बल 26 देश फिरून काढले. लहानपणी केआर विजनय यांच्या वडील त्यांना आजूबाजच्या ठिकाणी फिरायला घेवून जात.

Screenshot 2022 03 21 at 8.28.12 PM

धान्य विकून आलेल्या किरकोळ पैशातूनचं हा दौरा होत असे. त्यानंतर विजयन यांना हीच सवय लागली. विजयन यांनी साठवलेल्या पैशातून तरुणपणात हिमालयाची यात्रा केली.

पुढे विजयकुमार यांच लग्न झालं. त्यांच्या पत्नी मोहना आणि त्याचं लग्न झालं तेव्हा या जोडप्याने एकमेकांना आपल्या इच्छा विचारल्या तेव्हा जग फिरणं हेच दोघांच उत्तर होतं. आपल्या इच्छेप्रमाणेच आपणाला जोडीदार मिळाला हे पाहून खूष झालेल्या केआर विजयन यांनी थोडे थोडे पैसे साठवून आपली इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानंतर या जोडप्याने रोज ३०० रुपये परदेशवारीसाठी साठवायचे असा निर्णय घेतला. रोजचे ३०० रुपये साठवत यांना तीन वर्ष घालवली. या पैशातून त्यांनी भारत फिरायचा निर्णय घेतला. भारत फिरून झाल्यानंतर आत्ता जग पहायचं हा निर्णय त्यांनी घेतला. 

पून्हा पैसे साठवण्यास सुरवात केली. २००५ साली हे जोडपं पहिल्यांदा इराणला गेले.

Screenshot 2022 03 21 at 8.26.46 PM

 

त्यांनतर जॉर्डन, इंग्लड, पॅरिस, सिंगापूर, मलेशिया अशा वेगवेगळ्या देशांची यात्रा त्यांनी सुरू केली. आत्ता तुम्ही म्हणाल चहा च्या दूकानातून इतके पैसे मिळत असतील का? तर हे जोडपं कमी बजेटमध्ये देश फिरायचं. कमीत कमी खर्च करायचं. त्यासाठी तिथली संपूर्ण माहिती ते अगोदरच काढत व त्यादृष्टीने पैसे साठवत. कधी कधी ते कर्ज देखील घेत. आल्यानंतर पुन्हा आपल्या हॉटेलमध्ये दिवसरात्र राबून ते कर्ज फेडत असत. पुन्हा पैसे साठवण आणि पुन्हा दूसऱ्या देशाच्या शोधात निघणं हे त्यांच आयुष्य झालं होतं. 

दुर्देवाने गेल्या वर्षी विजयन यांचा मृत्यू झाल्याने हा प्रवास इथेच थांबला. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.