गावातल्या ३०० लोकांसमोर त्या दोघांना विष प्यायला लावून जाळून मारलं

सैराट पिक्चर यायच्या आधी आपल्या महाराष्ट्राला काय अख्या जगाला ऑनर किलिंगचे सीन माहीत होते. पण सैराट आल्यावर आपल्याला प्रेमप्रकरण आणि त्यांच्या हत्यांचं वास्तव समजलं.

पण तमिळनाडूत २००३ मध्ये असं बेक्कार हत्याकांड घडलं होत की संपूर्ण देश या घटनेने हादरला होता.

तब्बल १८ वर्षांनी या हत्याकांडाचा खुलासा झाला. यात १२ जणांना जन्मठेप तर एकाला फाशीची शिक्षा झाली. हे प्रकरण इतकं भयानक होत की विचारू नका.

या हत्याकांडाचा बळी होता एस मुरुगसन आणि डी. कन्नागी. मुरुगसन हा २००३ मध्ये नाही म्हंटल तरी २५ वर्षांचा होता. दलित असलेला मुरुगसन कष्टाळू होता म्हणूनच गरीब परिस्थितीवर मात करत केमिकल इंजिनिअर बनला. पण हाताला काही अजून जॉब नव्हता.

एक दिवस मुरुगसन कामानिमित्त अन्नमलाई युनिव्हर्सिटी मध्ये गेला होता. तिथंच शिकणाऱ्या कन्नगीवर त्याची नजर पडली आणि लव्ह ऍट फर्स्ट साईट झालं त्याला. कन्नागी त्याच युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होती. २२ वर्षांची कोवळी पोरगी ती. कॉमर्स शिकत होती.

मुरुगसन तिला बघण्यासाठी रोजच युनिव्हर्सिटी मध्ये येऊ लागला. आता कन्नागीच्या पुरत लक्षात आलं की मुरुगसन तिच्याकडे बघतो. झालं कन्नागीला पण मुरुगन आवडायला लागला. दोघ हळूहळू एकमेकांकडे आकर्षित होऊ लागली. प्रेम झालं.पण पुढं काय असा प्रश्न दोघांपुढं ही होता.

कारण होत कन्नागीची जात. कन्नागी वन्नीयार जातीची होती.

तिची जात दोघांच्या प्रेमाआड येऊ लागली. पण दोघांनीही ठरवलं काही ही होऊ दे हे प्रेम शेवटाला न्यायचं. म्हणजेच लग्न करायचं.

दोघांनी ५ मे २००३ ला सिक्रेट असं लग्न केलं. लग्न रजिस्ट्रेशन पध्दतीने केलं जेणेकरून कोणाला कळू नये. कारण मुरुगसनला जॉब नव्हता. एकदा का जॉब लागला की ते निवांत झाले असते. पण तसं काही घडलंच नाही.

कन्नागीच्या घरच्यांना ह्या दोघांच अफेअर तर समजलंच होत. पण त्या दोघांनी लग्न केलं हे ही त्यांना समजलं. त्यांना समजायला दोनेक महिने गेले असतील तोपर्यंत मुरुगसनला तिरूप्पूर मध्ये जॉब लागला होता. मुरुगसनने लागलीच कन्नागीला त्याच्या रिलेशन मधल्या पाहुण्यांकडे लपवून ठेवलं. पण सात जुलैला कन्नागीचे वडील दुराईसामी त्यांच्या लहाण्या मुलाला आणि त्यांच्या पाहुण्यापयांना घेऊन मुरुगसनकडे गेले. त्यांनी मुरुगसनला रोजच टॉर्चर करायला सुरवात केली.

कन्नागीच्या घरच्यांनी कन्नागीचा पत्ता सुद्धा शोधून काढला. कन्नागी आणि मुरुगसन घेईन हे सगळे लोक पुथुक्कोराईप्पेत्ताई गावात आले.

गावात तब्बल ३०० लोकांपुढं या दोघांना उभं करण्यात आलं. या दोघांना विष हातात देऊन विष पाजण्यात आलं. गावातला एक ही माणूस त्या दोघांच्या मदतीला आला नाही. त्या दोघांनी अक्षरशः मदतीसाठी इतकी याचना केली. पण लोक बघत बसले. याहीपेक्षा भयानक होत ते त्यांना जाळण्यात आल्याचं प्रकरण.

अख्या ३०० लोकांच्या गावासमोर या दोघांनाही जाळण्यात आलं.

पुरावे मिटवण्यात आले. पण गोष्टी लपत नसतात त्याप्रमाणे ही मुरुगसन आणि कन्नागीच्या हत्येचं प्रकरण बाहेरच आलं. सुरुवातीला या केसला सुसाईड करार देण्यात आला. पण नंतर केस सीबीआय कडे सुपूर्द करण्यात आली. सीबीआयने २००९ मध्ये ६९० पानांची चार्जशीट दाखल केली. या केस मध्ये जवळपास ८१ साक्षीदार होते. यातल्या ३६ लोकांनी आपली साक्ष फिरवली. सीबीआयने तपासाच्या आधारे १५ लोकांना पकडलं. त्यातले २ जण नंतर सुटले.

यातल्या कन्नागीचा भाऊ मारुदुपानदियन हा मुख्य आरोपी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. तर दुराईसामी म्हणजे कन्नागीच्या वडिलांसमेत ११ अन्य लोकांना जन्मठेप झाली. विशेष म्हणजे यात दोन पोलिस होते.

मुरुगसनच्या जातीला दोष देऊन या संपूर्ण ३०० लोकांच्या जमावाने जे अत्याचार मुरुगसन आणि कन्नागीवर केले त्याची गोष्ट आजही ऐकली तरी काळजाचा थरकाप उडतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.