मालेगाव बॉम्बस्फोटपासून सुरवात झालेला सायकल बॉम्बने आतापर्यंत शेकडो भारतीयांचा जीव घेतलाय

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २००८ मधील अहमदाबाद बॉम्बस्फोट आणि समाजवादी पक्ष (एसपी) यांच्यातील संबंध जोडत दहशतवाद्यांनी सपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलवरच बॉम्ब पेरले होते असं लॉजिक लावलं. त्याआधीच अहमदाबाद बॉम्बस्फोट ३८ जणांना फाशी दिल्यानंतर सायकल बॉम्ब पुन्हा चर्चेत आला होता.

पहिला सायकल बॉम्बस्फोट करण्यात आला होता मालेगावात. 

२००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात सायकलींचा प्रथम बॉम्ब कॅरियर म्हणून वापर करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटामध्ये माजी RSS प्रचारक सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्व गटावर मालेगाव या  मुस्लिमबहुल शहराला लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, स्फोटातील गुन्हेगारांनी ८ सप्टेंबर २००६ रोजी वेगवेगळ्या सायकलींवर दोन बॉम्ब बांधले आणि ते मालेगावात ठेवले.

हुजीने केलेले गोरखपूरमधले तीन  सायकल बॉम्बस्फोट

त्यानंतर २२ मे २००७ रोजी गोरखपूरमध्ये सायकलवर ठेवलेले तीन बॉम्बस्फोट झाले होते, त्यात तीन जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या आरोपाखाली डिसेंबर २०२० मध्ये, लोकल न्यायालयाने कथित HuJI ऑपरेटीव्ह मोहम्मद तारिक कासमी याला दोषी ठरवले आणि हल्ल्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

इंडियन मुजाहिदीनने सलग तीन शहरांना रक्तबंबाळ केले होते 

२३ नोव्हेंबर २००७ रोजी वाराणसी, लखनौ आणि फैजाबाद येथील न्यायालयांजवळ दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान बॉम्बस्फोटांची मालिका झाली. या स्फोटातील पाच बॉम्ब ज्यात १५ जणांचा मृत्यू झाला, ते सायकलींनाच लावले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचा दावा नंतर तपासकर्त्यांनी केला.

जयपूरमध्ये इंडियन मुजाहिद्दीनमध्ये घडवलेला पहिला बॉम्बस्फोट 

१३ मे २००८ रोजी जयपूरमध्ये आठ ठिकाणी सायकलला बांधलेले नऊ बॉम्बस्फोट झाले आणि ७१ जणांचा मृत्यू झाला. आयएमने विविध मीडिया हाऊसना ईमेल पाठवून जबाबदारी स्वीकारलेली हा पहिलाच स्फोट होता.

३८जणांना फाशी झालेला अहमदाबादचा बॉम्बस्फोट 

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या २२ बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील अनेक बॉम्ब सायकलवर बसवलेले असल्याचे आढळून आले. IM ने जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या कथित सदस्यांना शुक्रवारी ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

पुण्यातपण झाला होता बॉम्ब फोडण्यासाठी सायकलचा वापर 

१ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात बॉम्बवाहक म्हणून सायकलींचा वापर करण्यात आला. चार कमी-तीव्रतेच्या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला आणि संशयित IM कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर, IM ने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हैदराबादच्या दिलसुखनगर मार्केटमध्ये बॉम्ब पेरण्यासाठी दोन सायकल वापरल्या. यामध्येअठरा लोक मारले गेले होते.

सायकलच का वापरतात?

पहिले कारण म्हणजे  जगात कोठूनही सायकल मिळवणे सोपे आणि स्वस्त आहे. तसेच सायकलच्या वापराने जास्त पुरावेही मागे राहत नाहीत. तसेच सायकलमध्ये हलकीशी सुधारणा करून  स्फोटाचा प्रभाव वाढवता येतो. या सर्व करणामुळॆ सायकलचा बॉम्बस्फोटासाठी वापर होत आला आहे.

जगात पहिला सायकल बॉम्बस्फोट कुठे झाला होता?

सायकल बॉम्बची पहिली नोंद झालेली घटना १९३९ची आहे, जेव्हा आयरिश रिपब्लिकन आर्मीने सायकलच्या टोपलीत एक बॉम्ब ठेवला होता ज्याचा स्फोट झाला आणि युनायटेड किंगडममधील कोव्हेंट्रीमध्ये पाच लोक ठार झाले.

त्यानंतर, १९७०, १९८० आणि १९९० च्या दशकात यूके आणि जर्मनीमध्ये आणि संपूर्ण २१व्या शतकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराक, रशिया आणि स्पेन, इतर देशांमध्ये सायकल बॉम्बचा वापर करून रक्तपात घडवण्यात आला आहे. 

हे 

Leave A Reply

Your email address will not be published.