BMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.

आजकालच्या काळानुसार प्रत्येकाचं स्टेट्स सिम्बॉल म्हणजे दारात एक फोरव्हीलर असावी ..मग ती धूळखात का पडेना पण पाहिजेच !

यात गैर की नाही प्रत्येकाला वाटतं आयुष्यात इतका पैसा कमवायचा कि, मेट्रो सिटीमध्ये फ्लॅट नाही तर बंगला आणि त्याच्याबाहेर एक अलिशान गाडी, हे शक्यच झालं नाही मिडल क्लासच्या रांगेत बसायचं एक तरी कार असावीच असा समज असतो.

त्यातल्या त्यात श्रीमंतांना वाटतं कि आपल्याकडे एक तरी BMW असावी..

अलिशान, महागड्या गाड्या म्हणलं कि आपल्याला २-३ नावं समोर येतात ती म्हणजे, BMW,ऑडी, मर्सिडीज..पण अशा गाड्यांची स्वप्ने पाहण्याच्या भानगडीत सामान्य माणसे तरी पडत नाहीत कारण थोडक्यात आपल्या पप्पांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला असली थेरं परवडत नाहीत. 

असं म्हणतात की माणसांची स्वप्नं मोठी असली कि ती खरी व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्हीही कधीना-कधी BMW घ्यालच पण त्याआधी त्या गाडीबद्दल किंव्हा तिच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती असावी लागेल..

चला तिच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया …

BMW हि जर्मनची एक फेमस कंपनी आहे. आज या कंपनीच्या ब्रांच भारतासहित युएस, फ्रांस, रशिया, साउथ आफ्रिका, कॅनडा, जपान आणि चीनमध्ये आहेत.

परंतु बीएमडब्ल्यू प्रसिद्ध होण्यामागे एक काळा इतिहास आहे.

कारण या इतिहासाचा सबंध नाझी जर्मनी तसेच हिटलर सोबत जोडला गेलाय..तो कसा सविस्तर पाहूयात ..

तर BMW ची कहाणी सुरु होते १९१६ मध्ये.. बीएमडब्ल्यूची निर्मिती १९१६ मध्ये फ्रान्झ जोसेफ पोप यांनी केली होती. आणि या टेक्सस्टाईल कंपनीची मालक म्हणजे ग्युंथर फॅमिली !

या कुटुंबाचा इतिहास फार मोठा आहे, ज्याची सुरुवात ग्युंथर क्वान्ड नावाच्या व्यक्तिपासून झाली.

तेंव्हा नेमकाच हिटलर चा उदय झाला होता. जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा त्यावेळी जर्मन सैन्यासाठी सैनिकी गणवेश देण्याची जबाबदारी ग्युंथर क्वांड्टची होती. तो थेट जरी हिटलर आणि नाझी सैन्याला समर्थन देत नसला तरी अप्रत्यक्षपणे देतच होता. तो आपल्या गणवेशाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आणि तेथील अनेक कारखाने त्याने विकत घेतले. आणि स्वतःचे साम्राज्य तो वाढवीत होता. 

तेवढ्यात १९२९ च्या काळात ग्युंथरचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले ते जोसेफ गोबेल याच्या सोबत. हा जोसेफ म्हणजे हिटलर चा प्रोपगंडा मिनिस्टर होता. 

परंतु ग्युंथरने आपल्या बायकोचे दुसरे लग्न स्वतः लावून दिले..कमाल आहे ना ?

तुम्हांला वाटेल तो किती उदार मनाचा होता , तर असं नाहीये त्याने डोकं लावलं कि, जर्मनीमध्ये हिटलरचा रणनीतीकार  आपल्या संपर्कात आला तर, आपल्या कंपनीला त्याचा फायदा होईल असा उद्देश त्यामागे होता. आणि त्याच्या या डोके लावल्यामुळे त्याला अपेक्षित असा फायदाच झाला.

१९३० च्या दशकात जिथं हिटलर जर्मनीचा सर्वोच्च नेता बनला आणि ग्युंथरने इतर उद्योजकांप्रमाणेच, जर्मन नाझींना दुसर्‍या महायुद्धात स्वतःच्या कारखान्यातून शस्त्रे पुरवली.

कंपनी जर्मन वायुसेनेमध्ये वापरल्या जाणार्‍या विमानांच्या इंजिनची निर्मिती करायची. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर नाझीं गेले आणि अनेक कारखान्यांवर बॉम्बहल्ला झाला आणि काही सोव्हिएत सरकारने कारखाने ताब्यात घेतले. ग्युंथरला अमेरिकेने अटक केली, कारण तो नाझींना शस्त्रे पुरवायचा. परंतु सखोल चौकशीनंतर पुरावे न सापडल्यामुळे त्याची सुटका झाली.

इतकेच नव्हे तर त्याच्या कंपनीला मोटारसायकल आणि कार बनविण्यावरही बंदी घालण्यात आली होती पण असे असूनही त्यांनी हार ,मानली नाही आणि मग कंपनीने स्वयंपाकघरातील वस्तू आणि सायकली सारख्या बऱ्याच गोष्टी बनवायला सुरुवात केली. जर्मनीच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावणाऱ्या ग्युंथरला  व्यवसाय चालविण्यास परवानगी दिली. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला या भीषण परिस्थितीत पुन्हा उभे करण्यासाठी त्याच्या सारख्या लोकांची आवश्यकता होती.

१९४७ मध्ये बीएमडब्ल्यूने पुन्हा एकदा मोटारसायकल बनविण्याची परवानगी मिळवली आणि १९४८ मध्ये आर २४ मॉडेलची मोटारसायकल सुरू केली. मात्र, अजूनही गाड्या बनविण्यावर बंदी होतीच,

परंतु त्यांच्या वशंजांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या वाईटकृत्यांची माफी मागत, स्वतःचे माफीनामे सरकारला सादर केले. आणि  शेवटी १९५१ मध्ये ही बंदी उठविण्यात आली आणि त्यानंतर बीएमडब्ल्यूची कार ५०१ सुरू करण्यात आली. पण बीएमडब्ल्यूची गाडी खूप महाग होती, ज्यामुळे कंपनीची मोटारसायकलच १९५४ पर्यंत बीएमडब्ल्यूच्या कमाईचा मेन सोर्स बनली.

परंतु काही काळानंतर कंपनीने ऑटोमोबाईल उत्पादन पुन्हा सुरू केले आणि बीएमडब्ल्यूने तयार केलेल्या पहिल्या कारला “डिक्सी” असे नाव देण्यात आले.‎

त्यानंतर १९३६ मध्ये बीएमडब्ल्यूने ३२८ स्पोर्ट्स कारची निर्मिती केली, ज्याने इतके यश मिळवले कि तिला त्या शतकाची सर्वात यशस्वी कार म्हणून नामांकित करण्यात आले होते. इथून पुढे कंपनीने बीएमडब्ल्यूची सिरीज काढणे सुरु केले आणि प्रत्येक गाडीने तितकेच यश मिळवले हे म्हणायला हरकत नाही.

प्रगती करत करत कंपनीने साल २००० पर्यंत आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल बाजारात बीएमडब्ल्यू, एमआयएनआय आणि रोल्स रॉयस मोटारगाड्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.  आणि २०१३ पर्यंत त्यांनी इलेक्ट्रिक कार देखील आणली.

अशाप्रकारे बीएमडब्ल्यूचा काळा इतिहास खूपच कमी लोकांना माहिती आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.