पाकिस्तानच्या विभाजनाचा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो

१६ डिसेंबर भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशीच भारताने पाकिस्तानला युद्धात हरवले होते. यामुळे बांग्लादेशची निर्माती झाली होती.

भारत पाकिस्तान हे युद्ध ३ डिसेंमबला सुरु झाले होते. १६ डिसेंबरला हे युद्ध संपले. यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. आणि बांग्लादेशची स्थापना झाली. या दिवशी पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल नियाजी यांच्या ९३ हजार सैनिकांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केलं होत.

इतिहासात पाहायला गेलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या तरी एका देशाच्या लष्कराने आत्मसर्पण केलं. भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाई समोर पाकिस्तानचा निभाव लागू शकला नाही. अवघ्या १३ दिवसात पाकिस्ताने भारता समोर गुढघे टेकले होते.

या सगळ्या परिस्थिती अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावून आला होता.

भारत पाकिस्तानच्या १९७१ च्या युद्धा दरम्यान एक वेळ अशी आली होती की, अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला आला होता. अमेरिकेने जपान शेजारी असलेल्या त्यांच्या नौसेनेच्या लढाऊ युद्ध नौकेला बंगालच्या खाडीत पाठवले होते. अशा प्रकारे अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला आली होती.

अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातील संबंध चांगले नव्हते. तर दुसरीकडे याच काळात पाकिस्तानचे आणि अमेरिका या दोन देशाचे संबंध चांगल्या होते. तसेच अमेरिका पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा करत होते.

पाकिस्तानच्या नौदलाकडे पीएनएस गाझी ही देखील अमेरिकेने दिलेली अत्याधुनिक पाणबुडी होती.ही पाणबुडी भारताची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आली होती. मात्र, याच पाणबुडीला भारतीय नौदलाने विशाखापट्टणमजवळ बुडवून पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले होते.

अमेरिकेच्या नौदलाच्या सातव्या फ्लीटमध्ये अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू युएसएस एंटरप्राइझ आणि इतर विमान वाहक नौकांचा समावेश होता. हा ताफा त्यावेळी जगातील सर्वात शक्तिशाली नौदल ताफ्यांपैकी एक मानला जात होता. यूएसएस एंटरप्राइझमध्ये इंधन न भरता जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास करण्याची क्षमता होती.

ते भारताच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतपेक्षा खूप मोठे होते. बांग्लादेशात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा ताफा बंगालच्या उपसागरात पाठवण्याचे अमेरिकेने सांगितले होते. मात्र नंतर लक्षात आले की, या युद्ध नौका पाठवण्या मागचा अमेरिकेचा उद्देश हा पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध लढणाऱ्या भारतीय सैन्यावर दबाव आणणे हा होता.

अमेरिकेने नौदल भारताच्या विरोधात उतरत असल्याचे पाहून रशिया मदतीला आला

अमेरिका आपलं नौदल पाकिस्तानच्या मदतीला पाठवत असल्याचे समजल्या नंतर भारताने रशियाकडे ( तेव्हाचा सोव्हियत संघ) मदत मागितली होती. तसेच युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत आणि रशिया दरम्यान मैत्री करार केला होता.

अमेरिकेने नौदल बंगालच्या खाडीत येत असल्याचे पाहून लगेच रशिया भारताच्या मदतीला धावून आला. रशियाने भारताच्या मदतीसाठी पॅसिफिक महासागरातून हिंदी महासागरात आपल्या आण्विक क्षमतेच्या  पाणबुड्या आणि युद्ध नौका पाठवल्या.

पाकिस्तानच्या लष्कराने गुढघे टेकले

पाकिस्तानला मदत करण्यासाठी अमेरिकेच नौदल बंगालच्या उपसागरात पोहोचण्याआधीच १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली. याच बरोबर अमेरिका आणि अजून काही देशांनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात उपस्थित केला होता.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युद्धबंदीचा प्रस्ताव आणून अमेरिकेने पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाने या प्रस्तावाला व्हेटो देऊन भारताला मदत केली. याच कारणामुळे रशिया हा भारताचा सदाबहार मित्र मानला जातो.

१९७१ च्या युद्धामुळे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानचे तुकडे होऊन बांग्लादेशची स्थापना झाली होती. आज तोच दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

– हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.