ऑस्ट्रेलियाला अमेरिकेने बॉम्बर विमानं दिलेत, मग चीन का चिडलाय ?
अमेरिका आणि चीन या दोघांमधला वाद तैवान या विषयावरून अजून जास्त पेटलेला दिसतोय. आणि याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने आता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या सर्वाधिक शक्तिशाली आणि सर्वाधिक विनाशक अशा B52 Bomber आणि अनुवस्त्राने सज्ज अशा लढाऊ विमानांना तैनात केलेल आहे.
यामुळे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, चीन, तैवान यांच्यावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो ?
चीनचे अध्यक्ष म्हणून शी जिनपिंग तिसऱ्यांदा परत एकदा विराजमान झालेले आहेत तसं त्यांनी तैवान संदर्भात आक्रमक धोरण स्वीकारलेल दिसतंय. ते वारंवार तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत आहेत. अमेरिका मात्र तैवानच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील वाद पेटला आहे.
मागील महिन्यामध्ये अमेरिकेच्या नन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. त्यावेळेस सुद्धा चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले होते. अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीनुसार चीन तैवान या विषयाला धरून खूपच आक्रमक झाला आहे. या सुरक्षा एजन्सीला विश्वास आहे की 2025-26 येता येता चीन तैवान वरती आक्रमण तरी करेल किंवा तैवान गीळंकृत तरी करेल.
या अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे.
आता वरील नकाशा मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की अमेरिका हा तैवान पासून खूप दूर आहे आणि चीन पासून सुद्धा आणि मग कोणत्याही क्षणी तैवांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करता यावं म्हणून आता अमेरिकेने ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे B 52लढाऊ विमान ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अमेरिकेने ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि त्या मागचं कारण हेच आहे की कोणत्याही क्षणी कोणत्याही आगळीकेसाठी तयार राहावं.
आता या B 52 लढाऊ विमानाबद्दलची माहिती बघा,
सर्वात महत्त्वाचं याची रेंज त्या लढाऊ विमानाची एका उड्डानाची रेंज ही १४ हजार किलोमीटरची आहे. एकदा इंधन भरून हे विमान १४ हजार किलोमीटरचा प्रवास करू शकते. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर टोकापासून चीन पर्यंतचे अंतर हे सात हजार किलोमीटर पेक्षा कमी आहे. यामुळेच असा अंदाज व्यक्त केला जातो की, एकदा उड्डाण केले ही विमान जाऊन परत वापस ऑस्ट्रेलियामध्ये येऊ शकतात ते सुद्धा कोणत्याही अतिरिक्त इंधनाशिवाय.
यासोबतच ही विमान अणवस्त्रांसहित अटॅक करू शकतात.
अमेरिका ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागांमध्ये Tyndall Air Base मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करताना दिसत आहे यासाठी त्यांनी तब्बल एक बिलियन डॉलरची गुंतवणूक सुद्धा केलेली आहे. यावरून सरळ सरळ अमेरिका सुद्धा या मुद्द्याला धरून किती आक्रमक आहे हे दिसते आहे.
ऑस्ट्रेलिया मात्र या सर्व घडामोडी चीनला काउंटर करण्यासाठी करत नसल्याचे सांगत आहे. ऑस्ट्रेलियाचे म्हणणं असं आहे की, आम्ही पूर्वीपासूनचे मित्र आहोत आणि सध्या जी काही डेव्हलपमेंट होत आहे तो या मैत्रीचाच भाग आहे.
ऑस्ट्रेलियाने तर लॉकडाऊनसाठी चीनलाच जबाबदार धरलं होतं आणि चीनला कोळसा निर्यात करणं सुद्धा बंद करून टाकलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने चीन हाच कोरोनासाठी जबाबदार आहे आणि त्यांनी ती भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. त्यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे असणाऱ्या सॉलोमन बेटांवरती चीनने गस्त वाढवली आहे. ही गोष्ट ऑस्ट्रेलियाला बिलकुल आवडलेल नाही.आणि अशा परिस्थितीमध्ये जर का अमेरिका, ऑस्ट्रेलियाला मैत्री रूपाने का होईना जर का मदत करत असेल तर ऑस्ट्रेलियाला ते हवच आहे आणि त्यांना त्याची गरजच आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांचे संबंध ताणले जाण्याला अजून एक मोठं कारण आहे.
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी मध्ये चीनचे खूप सारे विद्यार्थी शिकतायेत आणि ऑस्ट्रेलियातील राजकारणामध्ये या विद्यार्थ्यांचा हस्तक्षेप वाढताना दिसतोय आणि या विद्यार्थ्यांद्वारे चीनच्या मीडियाचा सुद्धा हस्तक्षेप वाढताना दिसत आहे. जे ऑस्ट्रेलियाला आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांना अजिबात रुचलेलं दिसत नाही.
क्वाडच्या रूपाने भारत, ऑस्ट्रेलिया,अमेरिका,जपान यांचे संबंध वाढताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियातून चीनला प्रति वर्ष एक बिलियन डॉलर इतकं कोळसा निर्यात केला जात होता पण आता हे संबंध ताणले गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला एका नवीन मार्केटची गरज होती. जी गरज भारतात द्वारे पूर्ण होऊ शकते आणि याच्यामुळेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे संबंध दृढ होताना दिसतायेत.
भारत आणि चीन हे तर एकमेकांचे जवळपास असणारे शत्रू राष्ट्र आहेत. ऑस्ट्रेलिया आणि चीन यांचेही एकमेकांसोबत जुळत नाही. एका आणि चीन यांच्यातून विस्तव जात नाही. जपानेच सर्वात पहिल्यांदा चिनी आक्रमकता आणि चिनी विस्तारवाद ओळखून सगळ्यांना सावध करायला सुरुवात केली होती.
आता तैवानच्या निमित्ताने अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूच्या समुद्रातला वावर वाढवताना दिसते आहे जे की या क्षेत्रातील बॅलन्स मेंटेन करण्यासाठी फार गरजेचे आहे. अमेरिकेने नुकताच त्यांच्या अहवालामध्ये रशिया पाठोपाठ चीन हाच अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांसाठी सगळ्यात मोठा धोका असल्याचे सांगून चीनला थेट इशारा दिलेला आहे.
जगाची आर्थिक महासत्ता आणि लष्करी महासत्ता होण्याच्या चीनच्या महत्त्वकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीत, अमेरिकेला आपलं आर्थिक महासत्ता आणि लष्करी महासत्ता हे आढळतात कोणत्याही किमतीवरती टिकवायच आहे. आणि खरा वादाचा मुद्दा हाच आहे.
हे ही वाच भिडू
- देशाचे वांदे होऊ नयेत म्हणून पाकिस्ताननं, अमेरिका आणि चीन या दोन्ही दगडांवर पाय ठेवलाय
- बॉयकॉट चायना’चा नारा आजही हिट असला, तरी चीनकडून होणारी आयात ३१ टक्क्यांनी वाढलीये
- शी जिनपिंग यांच्याविरोधात बंड झाल्याच्या अफवा पसरल्यात, पण चीनचं राजकारण कसं चालतं ?