गांधी घराण्याची सगळी पोरं जिथं शिकलेत ते ‘डून स्कूल’ नेमकं आहे तरी काय

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाहिलंच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं.  इंदिरा गांधींच्या आणिबाणी बरोबरच संजय गांधी याचं हुकूमशहासारखं वागणं याच भांडवल करून जनता पार्टीच सरकार सत्तेत आलं होतं. आपल्या वागण्यामुळं आपल्या आईला सत्ता गमवावी लागली याची सल संजय गांधींच्या मनात होती. त्यामुळं काहीकरून हे मोरारजींच सरकार पडायचंच असं संजय गांधींनी ठरवलं होता. आता या कामात त्यांना विश्वासू माणसांची गरज होती. अश्यावेळी पहिलं नाव त्यांच्या मनात आलं ते म्हणजे त्यांचा द डून स्कूल या शाळेतील त्यांचा जिगरी ‘रॉली’.  संजय गांधींचं टार्गेट होतं जनता पार्टीचे नेते राजनारायण यांची सीक्रेट भेट.

सरकारी एजेंसीजना थांगपत्ता हि लागू नं देता रॉलीनं संजय गांधी आणि राजनारायण यांना कारमधणं दिल्ली फिरवून आणली.

या सीक्रेट भेटीमुळं पुढे जनता पार्टीमध्ये दुफळी माजली आणि पाहिलं बिगर काँग्रेसी सरकार पडलं.असं म्हणतात या सीक्रेट मिशनमध्ये ड्राइवर बनण्याचा फायदा रॉलीला मुख्यमंत्री बनण्यासाठीही झाला होता. 

हा रॉली दुसरा तिसरा कुणी नसून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ होते. 

बघा शाळेच्या मित्राचा फायदा मुख्यमंत्री होण्यात नाहीतर आमचे पण मित्र आहेतच. पुढे नवखे राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या डून स्कूल मधील शाळेतल्या मित्रांचाच गराडा होता.

 एवढा कि राजीव गांधी यांच्या किचन कॅबिनेटला ‘डून कॅबिनेट’ देखील म्हटलं जायचं. 

आपल्या काका आणि पप्पांच्या पाउलांवर पाउल टाकत राहुल गांधीही  काहीकाळ डेहराडूनच्या ‘द डून  स्कूल’ मध्ये शिकायला गेले होते.  टीम राहुलचा एकेकाळी भाग असलेले ज्योतिरादित्य सिंदिया, जतीन प्रसाद त्यांचा डून स्कूलच्या बॅकग्राऊंडमुळेच राहुल गांधीच्या जवळ गेले होते असं सांगण्यात येतं. आता प्रियंका गांधींचा मुलगाही ह्याच शाळेमध्ये शिकत असल्याचं कळतंय. 

नुसतं गांधी घराणंच नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग,नवीन पटनाईक,कमलनाथ हे आजी माजी मुख्यमंत्री ही या डून स्कूल मधून शिकलेत.

त्यामुळं बघू तरी हि शाळा नक्की आहे तरी कशी?

तर शाळेची स्थापना हि १९२७ मध्ये झाली. सतिश रंजन दास जे लॉर्ड आयरवीनच्या कॉउंसिलचे सदस्यही होते. त्यानं इंग्लंडमध्ये जश्या सर्वांगीण शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत तश्याच भारतात काढायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी १० लाख रुपये ही जमा केले होते . मात्र शाळेचं स्वप्न सत्यात यायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. पुढे इंग्लिश अधिकाऱ्यांनी शाळा बांधण्याचा काम पूर्णत्वास नेलं. 

डेहरडूनमध्ये  हिमालयाच्या कुशीत ही शाळा वसलेली आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये भारतातील टॉप शाळांमध्ये येणारी ही शाळा ‘बॉईज स्कूल’ आहे. ‘पोरांना पोरांसारखं वागता येणार नाही’असं कारण देत मुलींनाही शाळेत प्रवेश देण्याची मागणी शाळेच्या प्रशासनानं पुढं ढकललीय.  

आत तुमच्यापैकी काही जणांना आपली पण पोरं अश्या मोठ्या शाळेत घालावी असं वाटत  असेल तर एकदा शाळेची फी बघा.

तर सातवी आणि आठवी या दोन इयत्तांमध्येच शाळेत प्रवेश घेता येतो. मग पुढे  बारावीपर्यंत.

शाळेच्या वेबसाइटनुसार शाळेची एका वर्षाची फी आहे आहे फक्त आणि फक्त दहा लाख पंचवीस हजार. बाकी चार लाखचं डिपॉझीट आणि मग बाकीचा खर्च आहेच.

एवढी जास्त फी असल्यानं पाहिल्यापासूनच मोठयांची पोरं इथं शिकलेत. फक्त राजकारणीच नाहीत अनेक क्षेत्रातील मोठी लोकं याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एनडीटीव्हीचे प्रणव रॉय,  इंडिया टुडेचे अरुण पुरी,पत्रकार करण थापर यांचाही समावेश आहे. इतिहासकार रामचंद्र गुहा, द अनसुटेबल बॉय लिहणारे विक्रम सेठ, लेखक अमिताव घोष हे डून स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. भारताला ऑलीम्पिक मध्ये गोल्ड मिळवून देणारा अभिनव बिंद्रा हि याच शाळेत शिकलाय. आता यात अनेक यशस्वी उद्योजकांचाही समावेश आहे. यामधील काहीजणांनी कश्या शाळेतल्या ओळखीचा फायदा महत्वाची पदे मिळवण्यासाठी केला याच्या अनेक सुरस स्टोऱ्या ऐकायला मिळतात. तुम्हाला यातली एकादी माहीत असेल तर खाली कंमेंट जरूर सांगा.     

 

English School – The Doon School is an all-boys selective boarding school in Dehradun, Uttarakhand, India, which was established in 1935. It was envisioned by Satish Ranjan Das, a Kolkata lawyer, who prevised a school modeled on the British public school, but conscious of Indian ambitions and desires. The school admitted its first pupils on 10 September 1935, and formally opened on 27 October 1935, with Lord Willingdon presiding over the ceremony. The school’s first headmaster was Arthur E. Foot, an Englishman who had spent nine years as a science master at Eton College, England.

WebTitle : the Doon School where all gandhis went for their education.

Leave A Reply

Your email address will not be published.