देशातील पहिले सेक्सॉलॉजिस्ट जे गांधी आणि जिन्नांच्या जवळचे होते

वैज्ञानिक, आधुनिक अशा काळात सेक्स असे उच्चारले तरी आजू-बाजूचे पाच-पंचवीस चेहरे आपल्याकडे मारक्या बैला सारखे पाहतात. सेक्स, लैगिक समस्या बाबत जाहीरपणे बोलण्यात भारतीयांना फोबिया आहे.

ते तर स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनमधून ‘डॉक्टरी’ शिकून आले होते. देशातील मोठे-मोठे नवाब त्यांच्याकडून ‘टिप्स’ घेत असत.

डॉक्टरकी बरोबरच राजकारणातही त्यांचा हातखंडा होता. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षही होऊन गेलेत आणि जामिया मीलिया विद्यापीठच्या संस्थापकांपैकी एक होते.

डॉक्टर एम ए अन्सारी

मनुष्याच्या म्हातारपणाला मागे टाकून तारुण्य मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यात ते काही प्रमाणात यशस्वी सुद्धा ठरले. त्यांचे नाव दिल्लीतील एका रस्त्याला देण्यात आले आहे.

माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी आणि उत्तरप्रदेशचा कुख्यात बाहुबली नेता मुख्तार अन्सारी यांचा पाहुणा असल्याचे सांगण्यात येते.

एमए अन्सारी यांचे पूर्वज मोहम्मद बिन तुघलक यांच्या जमान्यात भारतात आले होते. हैद्राबाद येथे स्थायिक झाले. त्यांचे दोन भाऊ निजाम यांच्या दरबारात कामाला होते. मद्रास विद्यापीठातून त्यांनी आपली वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणसाठी लंडन येथे गेले.

१९०५ मध्ये लंडन मध्ये सर्जरी (शस्त्रक्रिया) ची पदवी मिळविली.

त्यांनतर ते लंडनच्या लॉक हॉस्पिटल मध्ये निबंधक म्हणून नियुक्त झाले. अशा प्रकारे नियुक्त होणारे एमए अन्सारी हे पहिले भारतीय डॉक्टर होते. त्यानंतर ते चेरिंग क्रॉस येथील हॉस्पिटल मध्ये सर्जन म्हणून रुजू झाले होते.

त्या दरम्यान अन्सारी यांनी लैंगिक संबंधा दरम्यान पसरणाऱ्या रोगावर (सिलफीस) एक संशोधनात्मक पेपर लिहला होते. पुढे त्या आधारावरचं सिलफीस रोगावर ब्रिटन मध्ये उपचार करण्याची पद्धत ठरविण्यात आली. त्यांनी लैगिक संक्रमांशी संबधित आजारावर बरेच काम केले आहे. अनेक मोठ्या व्यक्ती यांचे रुग्ण होते.

महात्मा गांधी आणि जिन्नाच्या जवळचे

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग शी संबंधित होते. त्या काळी खूप असे कमी नेते होते. जे की दोन्ही संघटनेशी जोडले गेले होते. त्यातील एक होते एमए अन्सारी. लंडन मध्ये शिकत असताना त्यांची मैत्री मोतीलाल नेहरू यांच्याशी झाली होती. त्यानंतर एमए अंसारी काँग्रेस मध्ये आले आणि त्यांचा दबदबा निर्माण झाला.

१९१६ मध्ये झालेला लखनऊ करारा दरम्यान त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यात अल्पसंख्याकांना अधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे १९२७ ला एमए अंसारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष निवडले गेले होते.

महात्मा दिल्लीत गांधी दिल्लीत आल्यावर दरवेळी अन्सारी यांच्या घरीच राहत होते. सायमन कमिशन विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनातही त्यांचं सहभाग होता.

अलिगड येथील जामिया मिलिया विद्यापीठाची स्थापना १९२० मध्ये करण्यात आली. एमए अन्सारी हे संस्थापकापैकी एक होते. त्यानंतर हे विद्यापीठ दिल्ली येथे नेण्यात आले त्यावेळी एमए अंसारी यांची कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

७०० लोकांचे ऑपरेशन करून जनावरांचे अंडकोष लावले होते

विसाव्या शतकाच्या सुरुवातील वृद्धांमध्ये कामवासना जागृत करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु होते. झेनोट्रांसप्लांटेशन पद्धत विकसित होत होती. ज्यात प्राण्याचे अवयव, टिशू, सेल मनुष्यामध्ये प्रत्यार्पण करण्यासाठी संशोधन सुरु होते.

एमए अन्सारी यांनी याचा पण अभ्यास केला. डॉ. सेर्गी वेरेनोफ, डॉ. युजीन स्टेनियाक यात नवीन संशोधन दरम्यान माणसांना जनावरांचा अंडकोष लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला.

डॉ. अन्सारी झेनोट्रांसप्लांटेशन बद्दल खूप अभ्यास केला आणि त्याचा उपयोग भारतात केला. आपल्या शेवटच्या १० वर्षाच्या तब्बल ७०० ऑपरेशन करून जनावरांचे अंडकोष माणसांना लावले. त्यात खेळाडू, सरकारी अधिकारी, राज परिवारातील सदस्य होते. यातील ४०० जणांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.

झेनोट्रांसप्लांटेशन करण्यात आलेल्यांमध्ये कामवासना जागृत करण्यात यशस्वी झाल्याचा दावा डॉ. अन्सारी यांनी केला होता. डॉ. अन्सारी यांनी लिहिलेलं ‘रिजनरेशन ऑफ मैन’ पुस्तक महात्मा गांधी यांना वाचायला दिले होते. महात्मा गांधी यांनी एका दिवसात हे पुस्तक वाचून संपविले. त्यानंतर त्यांनी अंसारी यांना विचारले की,

अशा पुरषार्थांचे काय महत्व कि जे दोन सेकंदांत संपून जाईल?

नवाबांच्या लैगिक रोगाची चिकित्सा एमए अंसारी करायचे

एमए अन्सारी यांचे भाऊ हे रुग्णांवर ग्रीक (युनानी) पद्धतीने इलाज करत होते. एमए अन्सारी हे इंग्लंड मधून शिकून आले होते. त्यावरूनच ते इलाज करत. अन्सारी यांनी गुप्तरोगांचा खूप अभ्यास केला होता. एमए अन्सारी यांनी १९१२ मध्ये तुर्की येथे रेडक्रॉसच्या वतीने चालू असलेल्या मोहिमेचे नेतृत्व केले होते.

भारतात आल्या नंतर त्यांना लाहोर येथील वैद्यकीय महाविद्यालाचा प्रिन्सिपल होण्याची विनंती करण्यात आली होती. ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली आणि कोलकत्ता येथे आपले रुग्णालय सुरू केले. त्यानंतर काही वर्षांनी ते दिल्ली येते स्थायिक झाले.

दिल्लीत वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यानंतर एमए अंसारी यांच्याकडे अलवर, रामपूर आणि भोपाळचे नवाब यांचे ते मुख्य चिकित्सक आले. त्यामुळेचं त्यांना मोठी कमाई करता आल्याचे सांगण्यात येते.

१९३६ मध्ये उन्हाळ्यात डॉक्टर अंसारी रामपूरचे नवाब यांचा इलाज करून मसुरीला परत येत होते. त्यावेळी त्यांना रेल्वे प्रवासात हृदयविकाराचा तीव्र झटका आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.