कॅब ड्रायव्हरला मारणाऱ्या ताईंचा प्रॉब्लेम पण समजून घ्या राव !
लखनऊ मधला एक व्हिडियो जोरदार व्हायरल होतोय. तो नाही का? त्या पोरीनं त्या ड्रायव्हरला धु धु धुतला तो व्हिडिओ. आता तर तो व्हिडिओ प्रत्येकाच्या स्टेट्सवर दिसतोय. आणि स्टेट्सच्या खाली एक कॅप्शन पडतंय.
वो लडका था इसलिए शांत थे सब, अगर वो लड़की होती तो सब बोल पड़ते
मार खाल्ला न भावड्यानं. खरं कालपासन तर ते पोरग टीव्हीवर झळकतय. म्हणजे आपण सगळेच त्याचा आवाज बनलोय. व्हाट्सअप स्टेट्स असो इन्स्टा असो फेसबुक असो ट्विटर असो सगळीकडं पठ्याचाच व्हिडिओ आहे. आता त्या मारेकरी ताईंवर तर एफआयआर पण दाखल झालीय म्हणे.
आणि मग त्या ताई बोलल्या. त्यांना नक्की काय प्रॉब्लेम होता ते त्या बोलल्याचं.. ऐकून घ्यायला पाहिजे राव आपण. ताई म्हणतायत की, ट्रॅफिक सिग्नलचा दिवा लाल झाल्यानंतरही कॅबवाला तो दादा वेगाने गाडी चालवत होता. तिच्या संरक्षणासाठी तिने कॅब चालकाला मारहाण केली होती.
थोड विस्तारानं सांगता का म्हणल्यावर, ताई चालूच झाल्या. ऐक्कच ना…
मला हार्टचा प्रॉब्लम आहे. किडनीचा प्रॉब्लम आहे. ब्रेनचा प्रॉब्लम पण आहे. मी नेहमीप्रमाणं रस्त्यावर वॉकिंगसाठी गेली होती. अवधच्या चौकात पोहोचले तर तिथं मी बघितलं कि सिग्नल रेड झाला होता. पण तरी गाड्या जातच होत्या. ट्राफिक पोलिसांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. अशातच तो माणूस भरधाव गाडी उधळत आला. मला वाटलं आता हा मला उडवेलच. पण मग दैव बलवत्तर म्हणून मी वाचले.
त्यानंतर या कॅब ड्रायव्हरच्या मित्रांनी मला ३०० मीटर पर्यंत मारत नेलं. ताईनं आपले छोटे छोटे माराचे डाग पण दाखवलेत.

बिचारीचा चष्मा तुटलाय. मार खाऊन तिचा चेहरा लालेलाल झालाय. मी मार खात होते तेव्हा पोलीस बघत उभे राहिलेले. CCTV मध्ये ट्रैफिक लाइटमुळे मला मारलेल दिसत नाहीये. वरुन ताई म्हणतायत की, आजपर्यंत मला खूप जणांनी मारलंय, मी खूप मार खाल्लाय, पण आता मार खाणार नाही, मारणार सगळ्यांना. बाब्बोव..काय स्वॅग आहे ताईचा…
झालं, मग भिडू पोचले त्या कॅबवाल्याला विचारायला, की भावा का मारलं तू तिला?
तर भावड्या म्हणला तुम्ही व्हिडिओ बघून नाही का आला? राव त्या पोरीनं मला एवढं मारलंय एवढं मारलंय की, दोन मिनिटांत तिनं मला २२ कानपाडात मारल्या. माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवरुन ६०० रुपये काढून घेतलेत, माझा फोन तोडला. हे कमी की काय म्हणून पोलिसांनी मलाच अटक केली. रात्रभर लॉकअप मध्ये ठेवलं. माझे भाऊ मला शोधायला आले तर त्यांना पण अटक केलं. आणि सकाळी आमच्याकडून १० हजार घेऊन सोडलं.
आता सोशल मीडियावर ताईंनी केलेली मारामारी दिसल्यावर मला मारलं म्हणून रडून राहिली बे ही…
या दोघांचं ऐकलं आता पोलिसांचं ऐका..
या प्रकरणात इंस्पेक्टर आणि पीएसआय यांच्यात भांडण लागली आहेत. इंस्पेक्टर म्हणतोय पीएसआयने या प्रकरणात लाच घेतलीय. तर पीएसआय म्हणतोय, इंस्पेक्टरला माहिती होती तरी त्याने गाडी सोडायला लावली. म्हणजे प्रकरण हायलाईट झालं तर बळीचा बकरा मलाच बनवणार.
सगळ्यांचं ऐकून भिडू डोकं सैरभैर झालंय. कोणाला कोणाचा पत्त्याच नाही. असो ताई म्हणते मी मार खाल्ला. पण आपण पाहिलंच असेल मार कोणी खाल्ला ते. निदान तो व्हिडिओ बघून तर त्या भावावरच विश्वास ठेवायला लागतोय.
हे ही वाच भिडू
- एखादी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्या खरेपणाचा तपास कसा करतात?
- चार्ली आणि हॅरीचा हा व्हायरल व्हिडीओ साडे पाच कोटींना विकला गेलाय
- आणि मोदींना धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी सिंगरचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला.
कॅब ड्रायव्हर ला मारणाऱ्या ताईंचा…..
हा तुमचा लेख खूपच मस्त आहे.
सीसीटीव्ही प्रूफ असताना वेगळे काय बोलणार?
ती ताई आणि ते पोलिस यांना शिक्षा होणे अपेक्षित आहे.
ताईला अटक,
आणि
त्या पोलिसांना निलंबन व शिक्षा!
🖕🖕👆
धन्यवाद बोल भिडू.👍👍👍