बहुमत असताना NTR सरकार उधळवलं, साहेब थेट 181 आमदारांना घेवून दिल्लीत ठाम मांडून बसले..

कॉंग्रेसी नेत्यांकडून होणार असणारा अपमान, दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास, तेलगु अस्मिता हे मुद्दे घेत आंध्रप्रदेश मध्ये देलगु देशम पक्षाची स्थापना झाली. तेलगु फिल्म इंडस्ट्रीतले नावाजलेले अभिनेते नंदमूरी तारक रामराव या पक्षाची स्थापना केली. 

NTR म्हणून ते दक्षिणेत फेमस होते. मात्र पक्ष स्थापनेपूर्वी फिल्म मधील करियर संपत आल्याची चर्चा होत होती.  काही लोक त्यांना संपले म्हणून बोलले जाऊ लागले. मात्र, ८०च्या दशकात  करिष्मा व्हावा तशी आंध्रामध्ये NTR नावाचं वादळ निर्माण झालं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात NTR आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

२९ मार्च १९८२ साली देलगू देशम पक्षाची स्थापन झाली. 

१९८३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या प्रयत्नातच तेलगू देशम पक्षाला दणदणीत यश मिळालं होत. २८९ जागा असणाऱ्या विधानसभेत २०१ जागा मिळवून NTR यांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेतलं होत. काँग्रेस विरोधावरच हा पक्ष उभा राहिला होता. 

ठाकूर रामलाल यांना आंध्रप्रदेशाच्या राज्यपाल पदी नेमण्यात आले. 

ठाकूर रामलाल हे गांधी घराण्याच्या जवळचे समजले जात होते. त्यांनी दोन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. १९७७ मध्ये ठाकूर यांच्या गळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री पद मिळालं. मात्र, त्यांचे सरकार जास्त दिवस चालले नाही.

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यामुळे ठाकूर रामलाल यांना पाय उतार व्हावे लागले होते. 

तर ठाकूर यांना मुख्यमंत्री पदाची दुसरी संधी १९८० मध्ये मिळाली. मात्र, १९८२ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

यानंतर १९८३ मध्ये रामलाल ठाकूर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदी पाठविण्यात आले होते. 

जानेवारी १९८३ मध्ये NTR यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात NTR हार्टच्या ऑपरेशनसाठी अमेरिकेत गेले होते.        

त्यातच ठाकूर रामपाल NTR यांचे सरकार कशा प्रकारे अडचणीत येईल याची वाट पाहत होते. आणीबाणी नंतर परत एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. त्यामुळे काही काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांच्या जवळ जाण्याची चढाओढ लागली होती. 

NTR अमेरिकेला गेल्याने ठाकूर रामलाल यांना वाटले की, इंदिरा गांधी यांना खुश करण्याची संधी आली आहे. राज्यपाल ठाकूर यांनी NTR यांचे सरकार मधील वित्त मंत्री असणाऱ्या एन भास्कर राव मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यासाठी राज्यपालांनी आमदारांची ओळख परेड सुद्धा घेतली नव्हती. 

आपल्याला काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंबा असल्याचा दावा एन भास्कर राव यांनी केला होता. मात्र २८९ सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेत काँग्रेसचे फक्त ६० आमदार होते. 

NTR अमेरिकेत असल्याने तेलगू देशम पक्षाचे कार्यकर्ते या गोंधळामुळे बुचकळ्यात पडले होते. त्यांना जे काही सुरु आहे ते समजत नव्हते. अशा वेळी दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, भाजप जनता दल असे १७ विरोधी पक्ष एकत्र येत लोकशाही वाचवा चळवळ सुरु केली. राज्यभरात काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत होते. 

NTR अमेरिकेतून परत आले. विरोध म्हणून यांनी काळ्या कलरचे कपडे घालायला सुरुवात केली. राज्य सरकार बरखास्त केल्याचा विरोधात यात्रा काढण्याचा निर्णय NTR यांनी घेतला. या यात्रेला धर्म युद्ध असे नाव दिले. 

८ महिन्यापूर्वीच हे NTR यांचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी आंध्रप्रदेश मध्ये NTR यांची लोकप्रियता शिखरावर होती. NTR यांच्या यात्रेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. तसेच NTR यांनी आपल्या १८१ आमदारांना सोबत घेत दिल्लीत मोठे आंदोलन केले. NTR व्हील चेअरवर बसून हे आंदोलन करत होते. यामुळे जनसमानसात काँग्रेसची प्रतिमा मालिन होत होती. 

यामुळे राज्यपाल रामलाल ठाकूर यांना रातोरात काढून टाकण्यात आले. त्यांच्या ऐवजी आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून शंकर दयाल शर्मा यांना पाठविण्यात आले. त्यानंतर केंद्रातील काँग्रेस सरकारने एन. भास्करा राव यांना राजीनामा द्यायला लावला. एन राव यांचे सरकार ३१ दिवस चालले.

शर्मा यांनी परत  NTR यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. इंदिरा गांधी खुश होतील म्हणून ठाकूर रामलाल यांनी NTR चे सरकार पडण्याचा  निर्णय घेतला होता. मात्र यामुळे इंदिरा यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.