मुख्यमंत्रीपद कोणत्याही कारणावरून जावू शकते, बंगालमध्ये तर रसगुल्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलेल

किस्सा आहे १९६५ सालातला. पश्चिम बंगालमधला.

हो, त्याच पश्चिम बंगालमधला जे रसगुल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. पण याच रसगुल्ल्यांवर १९६५ साली प.बंगालमध्ये बंदी आणण्यात आली होती. या बंदीचा तितकाच जोरदारपणे विरोध देखील झाला होता आणि याच विरोधामुळे प.बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं सरकार गेलं होतं.

रसगुल्ल्यांवरील बंदीमुळे सरकार गेलेले प.बंगालचे मुख्यमंत्री होते गांधीवादी नेते प्रफुल्ल चंद्र सेन. बंगालच्या राजकीय इतिहासात ही घटना ‘रसगुल्ला क्रांती’ म्हणून प्रसिद्ध आहे.

प्रफुल्ल चंद्र सेन यांचं नाव बंगालच्या राजकीय इतिहासात अतिशय आदराने घेतलं जातं. बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आपल्या राजकीय जीवनावर सर्वाधिक प्रभाव असणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रफुल्ल चंद्र सेन यांचं नाव घेतात.

‘माय अनफॉरगटेबल मेमरीज’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की,

“तसं पाहता माझ्या राजकीय प्रवासात अनेक लोकांनी माझी खूप मदत केलीये, पण प्रफुल्ल दांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही”

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सोमनाथ बॅनर्जींनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एकंच पराभव बघितला होता. हा पराभव म्हणजे १९८४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याकडून जादवपूर मतदारसंघातून झालेला पराभव.

या निवडणुकीत बंगालचे मुख्यमंत्री राहिलेल्या प्रफुल्ल चंद्र सेन यांनी स्वतः रिक्षात बसून आपला प्रचार केल्याची आठवण देखील ममता बॅनर्जी यांनी लिहिलीये.

रसगुल्ल्यांवर बंदी का घालण्यात आली होती..? 

रसगुल्ल्यांवरील बंदीचा निर्णय बंगालच्या राजकीय इतिहासातील सर्वात अलोकप्रिय निर्णयांपैकी एक समजला जातो. प्रफुल्ल चंद्र सेन यांनी हा निर्णय घेतला होता तो राज्यातील दुग्धजन्य पदार्थांची आणि डेअरी उत्पादनांची कमतरता दूर करण्यासाठी.

त्याकाळी बंगालमध्ये दुग्धजण्य पदार्थांची फार टंचाई होती. रसगुल्ल्यांवरील बंदीमुळे नवजात अर्भकांना देखील मोठ्या प्रमाणात दुध मिळू शकेल, असा सेन यांचा होरा होता.

AJOY
अजोय मुखर्जी

सेन यांचा हा निर्णय मात्र लोकांच्या आणि राजकारण्यांच्या पचनी पडला नाही. विरोधातील डाव्या पक्षांचं तर सोडाच, त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षातूनच या निर्णयाला मोठा विरोध झाला. बंगाल काँग्रेसमधील सेन यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रामंकाचे नेते अजोय मुखर्जी यांनी देखील सेन यांच्याविरोधात बंड केलं आणि पक्षात फूट पडली.

अजोय मुखर्जी यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांना घेऊन ‘बांगला काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली. ‘बांगला काँग्रेस’ने १९६७ सालच्या विधानसभा निवडणुका डाव्या पक्षांसोबत आघाडी करून लढवल्या आणि जिंकल्यादेखील.

मुखर्जी यांनीच आरामबाग विधानसभा मतदारसंघातून सेन यांचा परभव केला आणि ‘बांगला काँग्रेस-डावी आघाडी’ सरकारचे ते मुख्यमंत्री बनले. त्या अर्थाने मुखर्जी हे बंगालमधील पहिल्या गैर काँग्रेसी सरकारचे मुख्यमंत्री बनले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.