अफगाणिस्तानात हा गुरुद्वारा होता म्हणून शेकडो भारतीयांना आसरा मिळालायं

अफगाणिस्तानात परस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीये. एकमागून एक करत तालिबानने अखेर काबुलवर ताबा मिळवलाय. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढल्यानंतर तिथले रहिवासी देखील देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. काबूल विमानतळावर एकच गोंधळ सुरु आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख कुटुंबांनाही त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागलीये. अशा परिस्थिती अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधले करते परवान गुरुद्वारा या लोकांसाठी आश्रय स्थान बनलेय. माहितीनुसार ३०० हुन अधिक हिंदू आणि शीख या गुरुद्वारात मदतीची वाट बघत थांबलेत. 

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी दावा केला की,

‘जवळपास ३२० हिंदू आणि शीखांनी काबूलमधील करते परवान गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे, ज्यात ५० हिंदू आणि २७० पेक्षा जास्त शीख समुदायाचे लोक आहेत. अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदूंसह अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत ते काबुल गुरुद्वारा समितीच्या अध्यक्षांच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काबुल मधली ही गुरुद्वारा तिथल्या भागातील मुख्य गुरुद्वारांपैकी एक आहे. खरं तर असं म्हंटल जात कि,  १५ व्या शतकात गुरु नानक यांनी काबूलला भेट दिली. काही सुरुवातीच्या खत्री शीखांनी व्यापारी हेतूने अफगाणिस्तानात वसाहती स्थापन केल्या आणि त्यांची देखभाल केली.

१९ व्या शतकात अफगाणिस्तानात अनेक कारवायांदरम्यान ब्रिटीश साम्राज्याच्या सैन्यात शिखांनी देखील काम केले.

१९४७ मध्ये भारताच्या विभाजनानंतर, नवीन स्वतंत्र पाकिस्तानच्या पंजाबमध्ये छळाला कंटाळून शिखांनी अफगाणिस्तानात स्थलांतर केलं, ज्यामुळे शीख लोकसंख्या वाढली.  

मोहम्मद जहीर शाहच्या राजवटीत म्हणजेच १९८० च्या काळात शीख समाज समृद्ध झाला. याच दरम्यान कबूलमधल्या करते परवान गुरुद्वारेची स्थापना करण्यात आली.

दरम्यान, १९८० च्या दशकात सोव्हिएत -अफगाण युद्धा दरम्यान अनेक अफगाण- शीख भारतात पळून गेले, पुढे नजीबुल्लाह राजवटीत १९९० च्या अफगाण गृहयुद्धात आणि  १९९२ साली जलालाबादच्या लढाईत देशभरातील शीख गुरुद्वारे मंदिरे नष्ट झाली. यातले काबूलमधला करते परवान गुरुद्वारा फक्त सुरक्षित राहिला.

२००८ पर्यंत अफगाणिस्तानात अंदाजे २५०० शीख समुदायाची लोकं होती.

तालिबानच्या राजवटीत अल्पसंख्यांक असणाऱ्या शिखांना छळले जायचे आणि त्यांना jizya टॅक्स भरण्यास भाग पाडले जायचे.  मृतांच्या अंत्यसंस्काराची शीख प्रथा तालिबान्यांनी प्रतिबंधित केली होती आणि स्मशानभूमीची तोडफोड केली होती. याव्यतिरिक्त, शीखांना स्वतःची ओळख पटवण्यासाठी पिवळे चट्टे किंवा बुरखे घालणे आवश्यक होते. 

अफगाणिस्तानात १९७९ पासून जनगणना झालेली नाही. तरी २०१३ च्या अंदाज्यानुसार १२०० कुटुंब म्हणजे ८००० शीख समुदायाची लोकं असल्याचे समजते.  यांनतर २०१९ मध्ये हि संख्या १००० कुटुंब तर २०२० मध्ये ही संख्या ७० ते ८० कुटुंबावर येऊन पोहोचली.

ही सगळी कुटुंब काबुल,  जलालाबाद या भागात राहतात आणि करते परवान गुरुद्वारा ही एकमेव गुरुद्वारा या भागात आहे. 

सध्या, अफगाणिस्तानातील गंभीर परिस्थतीत पाहता इतर देशांनी अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची तयारी सुरु केलीये.  भारतानेही आतापर्यंत २१० भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुखरूप परत आणलंय. मात्र अजूनही मोठया संख्येने भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकून आहेत.

हे ही वाचं भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.